Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नायजेरियात 40 शेतकऱ्यांची अमानुष हत्या; ‘या’ दहशतवाद्यांनी केला कहर

एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ईशान्य नायजेरियातील बोर्नो शहरात इस्लामिक दहशतवाद्यांनी हल्ला केला असून या हल्ल्यात 40 शेतकऱ्यांची अमानुष हत्या करण्यात आली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 14, 2025 | 01:33 PM
At least 40 farmers brutally killed in in northeast Nigeria by Islamic militants

At least 40 farmers brutally killed in in northeast Nigeria by Islamic militants

Follow Us
Close
Follow Us:

अबूजा: एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ईशान्य नायजेरियातील बोर्नो शहरात इस्लामिक दहशतवाद्यांनी ताबडतोब हल्ला केला. या हल्ल्यात 40 शेतकऱ्यांची अमानुष हत्या करण्यात आली आहे. बोर्नो राज्याचे गव्हर्नर बाबागाना उमरा जुलुम यांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्याची जबाबदारी बोको हराम गट आणि इस्लामिक स्टेटशी संबंधित त्यांच्या अन्न गटाने घेतली आहे. या गटांनी हा हल्ला डुम्बा भागत केला असून नारिकांना सैन्याने सुरक्षित क्षेत्रात राहण्याचे आवाहन नायजेरियाच्या सरकारने केले आहे.

बोर्नो राज्याचे गव्हर्नर जुलुम याचा तीव्र निषेध

बोर्नो राज्याचे गव्हर्नर जुलुम यांनी या हिंसाचाराच्या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. त्यांनी सशस्त्र दलांना या प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपींना कठोर शिक्षा करावी. त्यांनी म्हटले की, “बोर्नो राज्यातील नागरिकांना मी आश्वासन देतो की या हत्याकांडाची चौकशी केली जाईल. मी सशस्त्र दलांना निर्दोष नागरिकांच्या हत्येतील गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आवाहन करतो.”

जागतिक घडीमोडी संबंधित बातम्या- एलॉन मस्क बनणार TikTok चे नवे मालक? चीनचा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म विकण्याचा विचार

बोको हरमचा दीर्घकालीन संघर्ष

मिळालेल्या माहितीनुसार, बोको हरम या गटाने 2009 मध्ये नायजेरियामध्ये पश्चिमी शिक्षणाविरोधात लढा सुरू केला. या दहशतवादी गटाचा उद्देश देशात इस्लामिक शरीयात लागू करणे आहे. गेल्या 14 वर्षांपासून सुरू असलेल्या या संघर्षामुळे नायजेरियामध्ये मोठ्या प्रमाणावर हिंसाचारा झाला असून हा संघर्ष आता आफ्रिकेतील सर्वाधिक दीर्घकालीन उग्रवाद म्हणून ओळखण्यात येतो. संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीनुसार, या संघर्षात आतापर्यंत 35,000 नागरिकांचा बळी गेला आहे, तर 20 लाखांहून अधिक लोक विस्थापित झाले आहेत.

यापूर्वीही शेतकऱ्यांवर हल्ले

नोव्हेंबर 2024 मध्ये बोको हरमच्या संशयित सदस्यांनी तीन गावांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात 15 शेतकऱ्यांना ठार करण्यात आले होते. हा हल्ला कोशेबे, करकुट आणि बुलाबुलिन या गावांमध्ये झाला होता. ही गावे बोर्नो राज्यातील माफा परिसरात असून राजधानी मैदुगुरीपासून अवघ्या 15 किलोमीटर अंतरावर आहेत. शेतकऱ्यांना कापणी करत असताना लक्ष्य करण्यात आले होते.

चिबोक अपहरणाने जगाचे लक्ष वेधले

मीडिया रिपोर्टनुसार, 2014 मध्ये बोको हरमने चिबोक गावातून 276 शाळकरी मुलींचे अपहरण केले होते. या घटनेने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले होते आणि नायजेरियातील दहशतवादाचा प्रश्न आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवला होता. या हल्ल्यामुळे नायजेरियामधील सुरक्षिततेच्या स्थितीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सरकार आणि सुरक्षा दलांनी नागरिकांचे रक्षण करण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची गरज आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- सौदी अरेबियाला जाणं ठरणार डोकेदुखी; भारतीयांसाठी वर्क व्हिसा नियम केले कडक

Web Title: At least 40 farmers brutally killed in in northeast nigeria by islamic militants nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 14, 2025 | 01:32 PM

Topics:  

  • World news

संबंधित बातम्या

WarRecord: शांततादूताचा मुखवटा उतरला? ट्रम्पच्या एका इशाऱ्याने जगातील 13 वा देश हादरला; ओमानसह ‘या’ 5 देशांवर विनाशाचे संकट
1

WarRecord: शांततादूताचा मुखवटा उतरला? ट्रम्पच्या एका इशाऱ्याने जगातील 13 वा देश हादरला; ओमानसह ‘या’ 5 देशांवर विनाशाचे संकट

Andaman Tribes: 50,000 वर्षांपासून अलिप्त! अंदमानच्या ‘मृत्यूच्या बेटावर’ का गेला अमेरिकन तरुण? 1 वर्ष लपलेलं रहस्य अखेर जगासमोर
2

Andaman Tribes: 50,000 वर्षांपासून अलिप्त! अंदमानच्या ‘मृत्यूच्या बेटावर’ का गेला अमेरिकन तरुण? 1 वर्ष लपलेलं रहस्य अखेर जगासमोर

US-Iran Conflict : अब्बास बंदरावरील हल्ल्याने पेटला इराण; अमेरिकेला दिलं चोख प्रत्युत्तर, शांतता चर्चा अपयशी?
3

US-Iran Conflict : अब्बास बंदरावरील हल्ल्याने पेटला इराण; अमेरिकेला दिलं चोख प्रत्युत्तर, शांतता चर्चा अपयशी?

Eid al-Adha : इस्रायलच्या Eid al-Adha च्या शुभेच्छांवर इराणची टीका; म्हणाला, ‘कसाईसुद्धा…’
4

Eid al-Adha : इस्रायलच्या Eid al-Adha च्या शुभेच्छांवर इराणची टीका; म्हणाला, ‘कसाईसुद्धा…’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.