At least 9 people killed by army in Ghana's AngloGold Ashanti mine
घाना: पश्चिम आफ्रिकेतील घाना देशात एक दुर्देवी घटना घडली आहे. घानाच्या अँग्लोगोल्ड अशांती प्रदेशातील ओबुआसी या सोन्याच्या खाणीत 9 जणांचा मृत्यू झाला असून 14 जण गंभीर जखमी असल्याची माहिती मिळालेली आहे. या कामगारांची निहत्था करण्यात आली असल्याचे म्हटले आहे. नॅशनल असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल मायनर्सच्या अध्यक्षांनी दिलेल्या माहितीनुसार, लष्कराने केलेल्या गोळीबारात या खाण कामगारांचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले.
माइनर्स असोसिएशनचे अध्यक्ष काय म्हणाले?
कोफी ॲडम्स यांनी सांगितले की, मरण पावलेले सर्व माइनर्स निष्पाप व निःशस्त्र होते. या घटनेपूर्वी कधीही माइनर्सच्या अशा कृतींवर कठोर कारवाई केली जात नव्हती. त्यांना फक्त इशारा देऊन थांबवले जात असे. मात्र, यावेळी परिस्थिती गंभीर बनली आणि नऊ खाण कामगांराचा बळी गेला. यामुळे माइनर्सच्या संघटनेने मोठा आक्रोश व्यक्त केला आहे.
लष्कराचे स्पष्टीकरण
नॅशनल असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल मायनर्सच्या आरोपानंतर घानाच्या लष्कराने देखील यासंबंधित एक निवेदन जारी केले आहे. या घटनेचे स्पष्टीकरण देताना लष्कराने, सुमारे 60 अवैध खाण कामगार स्थानिक बनावटीच्या रायफल्स आणि इतर शस्त्रांसह खाणीच्या सुरक्षेला धोका निर्माण करत होते. रात्री 11 च्या सुमारास या माईनर्सनी खाणीच्या सुरक्षित भागात प्रवेश केला आणि सेनेवर गोळीबार केला. या गोळीबाराच्या प्रत्युत्तरात 9 खाण कामगारांचा मृत्यू झाला, असे लष्कराने म्हटले आहे.
राष्ट्रपतींचे चौकशीते आदेश
या घटनेच्या पार्श्वभूमीवर घानाचे राष्ट्रपती जॉन ड्रामानी महामा यांनी या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांनी या घटने बद्दल शोक करत दुर्दैवी म्हटले असून, पीडित कुटुंबांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. तसेच, जखमींच्या उपचारांचा आणि मृतांच्या अंतिम संस्कारांचा खर्च एंग्लोगोल्ड अशांती कंपनीने उचलावा, असे आदेश दिले आहेत.
घटना जगभरात चर्चेत
घानातील सोने खाण व्यवसाय हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य भाग मानला जातो. मात्र, अशा घटनांमुळे देशातील खाण उद्योगाच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. खाण कामगारांना योग्य सुरक्षा देण्याची मागणी देखील करण्यात आली आहे. या घटनेनंतर स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेकांनी निषेध व्यक्त केला आहे. ही घटना फक्त माणुसकीला धक्का देणारी नव्हे, तर घानाच्या प्रशासन व सुरक्षेच्या धोरणांवरही प्रश्न निर्माण करते. आगामी चौकशीत खाण कामगारांच्या मृत्यू मागते सत्य उघड होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.