शपथ घेण्यापूर्वी "मेक अमेरिका ग्रेट अगेन व्हिक्ट्री रॅली"त ट्रम्प यांचा जबरदस्त डान्स; VIDEO व्हायरल (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
वॉशिंग्टन: संयुक्त राज्य अमेरिकेच्या 47 व्या राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प आज 20 जानेवारी रोजी शपथ घेतील. शपथ घेण्यापूर्वी काल डोनाल्ड ट्रम्प यांनी एक खास ठरलेला क्षण घडवला. ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन व्हिक्ट्री रॅली’ मध्ये ट्रम्प यांनी मंचावर मोठा जल्लोष केला. सध्या त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहे. हा कार्यक्रम ट्रम्पच्या समर्थकांसाठी एक मोठा उत्सव बनला. या कार्यक्रमात ट्रम्पचे कुटुंबीय, सहकारी आणि देशभरातल्या अनेक दिग्गजांचा समावेश होता.
या रॅलीला “मेक अमेरिका ग्रेट अगेन विजय रॅली” असे नाव देण्यात आले होतेय या रॅलीदरम्यान ट्रम्पच्या समर्थकांमध्ये भरभरुन उत्साह पाहायला मिळाला. या रॅलीचे आयोजन कॅपिटॉल वन एरीना मध्ये करण्यात आले होते. यावेळी ट्रम्प यांच्या अध्यक्षपदी परत येण्याचा जल्लोष पाहायला मिळाला. कार्यक्रमात ठंड हवामान असूनही ट्रम्प यांनी हा क्षण डान्स करुन खास बनवला. जेव्हा बॅंडने “Y.M.C.A.” हे गाणं वाजवायला सुरुवात केली, तेव्हा ट्रम्प स्टेजवर जाऊन नाचले. त्यांचा डान्स त्यांच्या समर्थकांसाठी अत्यंत उत्साहजनक होते.
This is the wildest end to a political rally I’ve ever seen.
Trump ends with his rallying cry and then is joined on stage by The Village People and he dances with them. pic.twitter.com/tXFOsjCVhs— Brian Lilley (@brianlilley) January 19, 2025
“मेक अमेरिका ग्रेट अगेन विजय रॅली” मध्ये किड रॉक आणि ली ग्रीनवुड यांसारख्या प्रसिद्ध संगीतकारांनी आपली कला सादर केली. यामध्ये टेस्लाचे CEO एलॉन मस्क यांनी ट्रम्प प्रशासनात सरकारी दक्षता विभागाच्या प्रमुख म्हणून आपल्या नवीन भूमिकेविषयी भाषण दिले. त्यांचे भाषण आणि त्यांच्या मुलाच्या उपस्थितीमुळे ते उपस्थितांमध्ये चर्चेचा विषय बनले.
शपथ घेतल्यावर ट्रम्प कार्यकारी आदेशांवर स्वाक्षरी करणार
ट्रम्प यांनी आपल्या प्रशासनाच्या पहिल्या दिवशी अनेक कार्यकारी आदेशांवर स्वाक्षरी करण्याची योजना जाहीर केली आहे. या आदेशांमध्ये सीमा सुरक्षा, ऊर्जा धोरणे आणि DEI कार्यक्रमांचा समावेश असणार आहे. ट्रम्पने त्याच्या नितींचे पालन करण्याची ठाम योजना तयार केली आहे. शपथ ग्रहण समारंभाच्या ठिकाणी ऐतिहासिक क्षण घडणार आहे. या समारंभाचे आयोजन रोटुंडा मध्ये करण्यात आले आहे. 1985 नंतर पहिल्यांदाच ट्रम्प यांचा शपथविधी इनडोअर होणार आहे. हे समारंभ ट्रम्पच्या 2.0 युगाची सुरुवात दर्शवणारे असणार आहे.