3 महिलांच्या बदल्यात इस्त्रायलला 90 पॅलेस्टिनींची करावी लागली सुटका; कोणी जिंकले युद्ध? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
जेरुसेलम: सुमारे 15 महिन्यांपासून सुरु असलेल्या गाझा युद्धानंतर संधर्षविराम जाहीर झाला आणि गाझामध्ये विजयाचा जल्लोष पाहायला मिळाला. गाझातील वेस्ट बॅंकमध्येबी अशाच प्रकारचा उत्साह दिसून आला. मिळालेल्या माहितीनुसार, संघर्षविरामाच्या पहिल्या दिवशी हमासने तीन महिला बंधकांची सुटका केली, तर या बदल्यात इस्रायलने 90 फिलिस्तिनी कैद्यांना मुक्त केले. इस्रायली सैन्य गाझातील नागरिकवस्तीतून माघारी परतले, आणि हमासने गाझामध्ये आपला प्रशासन पुन्हा सुरू केले.
हमास संघर्षविरामाचा विजयी
या कराराच्या पहिल्या टप्प्यात हमास 34 बंधकांना मुक्त करणार आहे आणि इस्रायल प्रत्येक बंधकाच्या बदल्यात 30 ते 50 कैद्यांची सुटका करणार आहे. हमासने हा संघर्षविराम आपल्या विजयाचा भाग म्हणून सादर केला आहे. मात्र, या युद्धामुळे गाझा पूर्णतः उद्ध्वस्त झाला आहे. जरी हमासने गाझामध्ये आपली सत्ता राखली असली, तरी त्याला आता उद्ध्वस्त झालेल्या शहराचे प्रशासन सांभाळावे लागणार असल्याचे म्हटले आहे. ना उत्पादन, ना रोजगार, ना शाळा, ना रुग्णालये- गाझाची परिस्थिती अत्यंत बिकट बनली आहे.
हमासची लीडरशिप संपुष्टात
या युद्धात हमासची टॉप लीडरशिप जवळपास संपुष्टात आली आहे. 50,000 हून अधिक फिलिस्तिनी मृत्युमुखी पडले असून 90,000 पेक्षा अधिक जखमी झाले आहेत. तरीसुद्धा, गाझामध्ये हमासचे लढाईचे नियोजन ब्लॉक वाइज पद्धतीने केल्यामुळे नेतृत्वाच्या अभावातही त्यांचे ऑपरेशन सुरू राहिले.
🇮🇱 NETANYAHU: “HAMAS WILL BE WIPED OUT!”
🇵🇸 HAMAS TODAY IN THE STREETS OF GAZA: pic.twitter.com/4sx5QEQLjG
— Jackson Hinkle 🇺🇸 (@jacksonhinklle) January 19, 2025
इस्रायली मिशन अयशस्वी?
गाझाच्या रस्त्यांवर हमासचे सैनिक पुन्हा दिसल्यामुळे इस्रायली पंतप्रधान नेतन्याहू आणि IDF (इस्रायली डिफेन्स फोर्स) यांचे मिशन अपयशी ठरल्याचे तज्ञांनी म्हटले आहे. लाखो लोकांचे बळी घेतल्यानंतर आणि मोठ्या प्रमाणावर बॉम्बफेक केल्यानंतरही हमासचा पराभव करता आला नाही. बंधकांच्या सुटकेसाठी सुरुवात झालेला हा संघर्ष इस्रायलसाठी अपेक्षित निकाल देऊ शकला नाही.
नेतन्याहू सरकारच्या अडचणी
नेतन्याहू यांनी गाझाच्या धोक्याचा कायमचा पराभव करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अमेरिकेच्या दबावामुळे त्यांनी संघर्षविराम मान्य केला आणि सैन्य माघारी बोलावले. यामुळे त्यांच्या सरकारवर फॉर राइट नेत्यांचा दबाव वाढला आहे, आणि सरकार पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हमास-इस्त्रायल युद्धाचा निकाल स्पष्ट करणे अद्यापही कठीण आहे. मात्र, या लढाईने इस्रायली सैन्य, मोसाद आणि अमेरिकन शस्त्रास्त्रांची प्रतिष्ठा धोक्यात आणली आहे. एका छोट्या प्रदेशातील मिलिशियाला 15 महिन्यांच्या युद्धानंतरही पूर्णतः संपवता न येणे, हा इस्रायलसाठी मोठा पराभव ठरला आहे.