Axiom-4 mission Launch Shubhanshu's space filling, Axiom-4 wrapped in space
Axiom-4 mission Launch Live Updates : आजचा दिवस भारताच्या अंतराळ इतिहासातील सुवर्णक्षण आहे. भारतीय वायुसेनेचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांनी अमेरिकेच्या स्पेसएक्स आणि अॅक्सिओम स्पेस यांच्या Axiom-4 (Ax-4) मोहिमेअंतर्गत अंतराळात झेप घेतली आहे. ही मोहीम भारतासाठी विशेष आहे. शुभांशू शुक्ला हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) जाणारे पहिले भारतीय ठरले आहेत.
या मोहिमेचे प्रक्षेपण अमेरिकेच्या फ्लोरिडा येथील नासाच्या केनेडी स्पेस सेंटरमधूमन करण्यात आले. या मोहिमेसाठी शुंभाशू शुक्ला आणि त्यांच्या टीमने स्पेसएक्सच्या फाल्कन-९ या रॉकेटने उड्डाण केले. या मोहिमेसाठी शुभांशू शुक्ला २९ मे रोजी उड्डाण घेणार होते. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे ही मोहीम लांबणीवर पडली होती. अखेर बुधवारी (२५ जून) शुभांशू शुक्ला यांच्यासह ४ अंतराळवीरांनी अवकाशात झेप घेतली आहे.
Nothing like a liftoff 🚀@Axiom_Space‘s #Ax4 mission, riding atop a @SpaceX Falcon 9 rocket, launched from @NASAKennedy at 2:31am ET (0631 UTC). pic.twitter.com/RuvVZ9shT6
— NASA (@NASA) June 25, 2025
#WATCH लखनऊ: भारतीय वायुसेना के ग्रुप कैप्टन और अंतरिक्ष यात्री शुभांशु शुक्ला की मां आशा शुक्ला अपने बेटे के लिए खुशी से भावुक हो गईं, जो #AxiomMission4 का हिस्सा है। pic.twitter.com/s2mSrJtWIt
— ANI_HindiNews (@AHindinews) June 25, 2025
Axiom-4 ही मोहीम भारतासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. राकेश शर्मा यांच्यानंतर शुभाशूं शुक्ला या मोहिमेचे प्रतिनिधीत्व करणार पहिले भारतीय ठरले आहेत. भारताच्या अंतराळातील वाढती ताकद आणि जागतिक सहकार्याचे प्रतीक म्हणून या मोहिमेकडे पाहिले जात आहे. या मोहिमेसाठी शुभांशू शुक्ला पायलट म्हणून काम पाहणार आहेत.
या मोहिमेत शुभांशू शुक्ला यांच्यासह इतर तीन आंतरराष्ट्रीय अंतराळवीर नासाच्या अंतराळवीर आणि Ax-4 मोहिमेच्या प्रमुख पेगी व्हिटसन, तसेच पोलंडचे स्लावोस उजनास्की-विस्निवेस्की आणि हंगेरीचे तिबोर काबू सहभागी झाले आहेत. ही मोहीम १४ दिवसांची असणार आहे. यांतर्गत चारही अंतराळवीर १४ दिवस अंतराळात राहून विविध वैज्ञानिक, जैववैज्ञानिक आणि अभियांत्रिक प्रयोग करणार आहेत. या मोहिमेदरम्यान शुभांशू शुक्ला अंतराळात भारतीय संस्कृतीच्या विविध कलाकृतींचे आणि योगासनांचे सादरीकरण करणार आहेत.
बातमी अपडेट होत आहे.