
jupiter closest to earth january 2026 opposition how to watch naked eyes
मुंबई, नवराष्ट्र न्यूज नेटवर्क: सौरमालेतील सर्वात मोठा आणि सर्वाधिक वजनशीर, ज्याचा व्यास पृथ्वीपेक्षा सुमारे ११ पट अधिक, ठोस पृष्ठभाग नसलेला आणि हायड्रोजन व हिलियम वायूंनी बनलेला असल्याने वायुग्रही ज्याच्या वातावरणात तपकिरी, पांढऱ्या आणि केशरी रंगांच्या भव्य पट्टया उठून दिसतात असा ‘वैज्ञानिक’ आणि सौरमालेचा ‘संरक्षक’ मानला जाणारा ‘गुरु’ (Jupiter) ग्रह सध्या पृथ्वीच्या अगदी जवळून घुटमळत आहे. आज शुक्रवारी गुरु ग्रह पृथ्वीपासून अंदाजे ६०० दशलक्ष किलोमीटर अंतरावर असेल. सौरमालेतील या महाकाय ग्रहाला न्याहाळण्याची ही दुर्मीळ संधी खगोलप्रेमींना मिळणार असून ही संधी पुन्हा तब्बल १३ महिन्यांनी मिळणार आहे. त्यामुळे ही संधी अजिबात घालवू नका, असे आवाहन खगोल अभ्यासक करत आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : World War 3: ब्रिटनच्या आकाशात ‘मृत्यूचे दूत’! विमानतळावर उतरली डझनभर सशस्त्र अमेरिकन विमाने; कोणता देश रडारवर?
आठवड्यात पृथ्वी, गुरु ग्रह आणि सूर्य एकाच रेषेत येत असल्याने यावर्षी गुरु ग्रह पृथ्वीच्या सर्वाधिक जवळ येणार आहे. परिणामी, हा विशाल ग्रह रात्रीच्या आकाशात यंदा सर्वाधिक तेजस्वी स्वरूपात दिसणार आहे. आज संध्याकाळी आकाशात पूर्व दिशेला अतिशय तेजस्वी असा गुरु ग्रह सहज ओळखता येईल. संध्याकाळी सुमारे ६ वाजून २० मिनिटांनी गुरु ग्रह उगवेल, तर ७.३० नंतर तो आकाशात बराच वर आलेला दिसेल, अशी माहिती खगोल अभ्यासक सुयोग देशमुख यांनी दिली.
🚨Major Cosmic Alignment🚨: January 10, Earth will line up with Jupiter and the Sun, placing us at our closest approach to Jupiter this year. The giant planet now shines at its brightest in the night sky. pic.twitter.com/WMkMrzlmwd — All day Astronomy (@forallcurious) January 6, 2026
credit : social media and Twitter
सूर्य आणि गुरु ग्रह यांची ऑप्पोसिशन अवस्था दर १३ महिन्यांनी एकदा येते. ९ जानेवारीला गुरु ग्रह पृथ्वीच्या सर्वात जवळ आला असून त्याचे अंतर साधारण ६०० दशलक्ष किलोमीटर इतके आहे. टेलिस्कोपमधून गुरुचे प्रमुख पट्टे आणि त्याचे चंद्र स्पष्टपणे पाहता येतात. मात्र, नुसत्या डोळ्यांनीही गुरु ग्रह अत्यत तेजस्वी दिसतो.
– सुयोग देशमुख, खगोल अभ्यासक
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Saudi Vs UAE : तेलासाठी पेटलं आखात! युएई घेणार सौदी अरेबियाचा बदला; 24 तासांत रियाधविरुद्ध तयार केले दोन वॉर फ्रंट
विशेष म्हणजे, सूर्य मावळेल तेव्हा गुरु उगवेल आणि गुरु डोक्यावर असेल तेव्हा सूर्य पृथ्वीच्या विरुद्ध गोलार्धात असेल. हीच खगोलीय स्थिती गुरु ग्रहाला रात्रीभर आकाशात प्रभुत्व गाजवण्याची संधी देते. म्हणूनच ही संधी खगोलप्रेमी, आकाश निरीक्षक आणि जिज्ञासू विद्याथ्यर्थ्यांसाठी पर्वणी ठरणार आहे. दुर्बीण असो वा नसो, आकाशाकडे नजर टाकायला विसरू नका.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.
Ans: नाही. गुरू ग्रह इतका तेजस्वी आहे की तो साध्या डोळ्यांनीही एखाद्या मोठ्या ताऱ्यासारखा स्पष्ट दिसतो. मात्र, त्याचे चंद्र पाहण्यासाठी साध्या दुर्बिणीची मदत होऊ शकते.
Ans: आज पृथ्वी ही सूर्य आणि गुरूच्या बरोबर मध्ये येत असल्याने दोन्ही ग्रहांमधील अंतर किमान असते, यालाच 'प्रतियुती' म्हणतात.
Ans: संध्याकाळी पूर्व दिशेला सर्वात जास्त चमकणारा, स्थिर प्रकाश असलेला (जो ताऱ्यांसारखा लुकलुकत नाही) ग्रह म्हणजे गुरू होय.