• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • World »
  • 400 Kg Enriched Uranium Missing In Iran After Us Strike

400 kg enriched uranium missing : ‘इराणचे 400 किलो युरेनियम…’ अखेर उपराष्ट्रपती व्हान्स यांनी कबूल केलं सत्य

400 kg enriched uranium missing : अमेरिका आणि इस्रायलने इराणमधील अणुसुविधांवर हवाई हल्ले केल्यानंतर एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. काय आहे नेमक प्रकरण जाणून घ्या.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jun 25, 2025 | 11:41 AM
400 kg enriched uranium missing in Iran after US strike

इराणमधून ४०० किलो समृद्ध युरेनियम गायब! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर उघड झाली अणुशक्तीविषयक मोठी धक्कादायक माहिती ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

400 kg enriched uranium missing : अमेरिका आणि इस्रायलने इराणमधील अणुसुविधांवर हवाई हल्ले केल्यानंतर एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांनी खुद्द कबूल केले आहे की, इराणमधून ४०० किलो अत्यंत समृद्ध युरेनियम गायब झाले आहे. ही बाब केवळ पश्चिम आशियात नव्हे, तर संपूर्ण जगासाठी चिंतेची ठरू शकते, कारण या प्रमाणातल्या युरेनियमपासून १० अणुबॉम्ब तयार होऊ शकतात, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

अमेरिकेने कबूल केली ‘गायब युरेनियम’ची बाब

अमेरिकन वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत उपाध्यक्ष व्हान्स यांनी म्हटले की, “इराणच्या फोर्डो, नतांझ आणि इस्फहान या तीन प्रमुख अणुउद्योग स्थळांवर अमेरिकेने हल्ला केल्यानंतर, ४०० किलो युरेनियम गायब झाल्याचे निष्पन्न झाले आहे.” हे युरेनियम ६० टक्क्यांपर्यंत समृद्ध असून, अणुबॉम्ब तयार करण्यासाठी आवश्यक असलेला ९० टक्क्यांपर्यंतचा स्तर गाठायला फक्त काही आठवडे लागले असते, असे त्यांनी स्पष्ट केले.

व्हान्स यांनी म्हटले की, “या मोहिमेचा उद्देश फोर्डो अणुउद्योगस्थळ नष्ट करणे आणि इतर सुविधांनाही मोठ्या प्रमाणात नुकसान पोहचवणे हा होता. या हल्ल्यांमुळे इराणची आण्विक क्षमता आता मोठ्या प्रमाणात खिळखिळी झाली आहे.” मात्र, हे युरेनियम अचूक कुठे गेले याविषयी अजूनही गूढ कायम आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Axiom-4 mission Launch : आज राष्ट्रपुत्र शुभांशू शुक्ला इतिहास रचणार; 12 वाजता निघणार अंतराळ मोहीम

16 ट्रकची हालचाल आणि इस्रायलचा दबाव

एका वृत्तवाहिनीच्या माहितीनुसार इस्रायली गुप्तचर अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, हल्ल्यापूर्वी उपग्रह प्रतिमांमध्ये फोर्डो अणुस्थळाजवळ १६ ट्रक दिसले होते, जे सामग्री सुरक्षित स्थळी हलवत होते. हे ट्रक एका डोंगरात असलेल्या तटबंद सुविधेकडे वळताना दिसले, ज्यामुळे अमेरिका आणि इस्रायलमध्ये हल्ल्याची घाई झाली. या ट्रकसह संपूर्ण युरेनियम साठा, संशोधन उपकरणे आणि अणू साहित्य इस्फहानजवळील गुप्त भूमिगत केंद्रात हलवण्यात आले असावे, असा विश्वास अमेरिकन आणि इस्रायली गुप्तचर संस्थांना आहे.

Tonight, Iran still has 400kg of enriched Uranium. “Somewhere” The Ayahtollah Ali Khamenei is still in power. Iranians are on the street proclaiming Victory. The vast majority of its missile forces intact. And Israels “impregnable” defences dont look so impregnable anymore pic.twitter.com/UakqV9KMum — Chay Bowes (@BowesChay) June 24, 2025

credit : social media

IAEAची चिंता आणि इराणचा संभाव्य आक्रमक पवित्रा

अंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीचे (IAEA) प्रमुख राफेल ग्रोसी यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया देत फोर्डो साइटवर पुनः तपासणीची मागणी केली आहे. मात्र, इराणकडून ती मंजूर होण्याची शक्यता कमी वाटते. इराणने NPT (अण्वस्त्र प्रसारबंदी करार) मधून बाहेर पडण्याची धमकी दिली असून, त्याचा अणुकार्यक्रम पूर्णपणे ‘स्वतंत्र आणि कोणत्याही आंतरराष्ट्रीय दबावापलीकडे’ असेल, अशी भाषा वापरू लागला आहे. इराणचे उपपरराष्ट्रमंत्री तख्त रवंची यांनी थेट सांगितले की, “आम्हाला कोणीही आदेश देऊ शकत नाही. आमच्या सार्वभौमतेला जर धोका निर्माण झाला, तर आमचा अणुकार्यक्रम अधिक वेगाने पुढे जाईल.”

अमेरिकेचे बदलते दावे आणि गुप्तचर संस्थांवरील प्रश्नचिन्ह

या संपूर्ण घडामोडीत अमेरिकन गुप्तचर यंत्रणांची विश्वासार्हता देखील संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. हल्ल्यापूर्वी अमेरिकन गुप्तचर संस्थांनी इराण “सध्या अणुबॉम्ब विकसित करत नाही” असे सांगितले होते. परंतु आता तेच अधिकृत अधिकारी म्हणत आहेत की इराण “काही आठवड्यांत अणुबॉम्ब तयार करू शकतो.” यामुळे संपूर्ण हल्ल्याची वैधता, उद्देश आणि त्यामागील नियोजनावरच प्रश्न उपस्थित होत आहेत.

गायब युरेनियम – आंतरराष्ट्रीय सुरक्षा यंत्रणांसाठी नवीन डोकेदुखी

४०० किलो अत्यंत समृद्ध युरेनियम गायब झाल्याची बाब ही जागतिक सुरक्षेसाठी गंभीर चिंता बनली आहे. IAEA, अमेरिकन गुप्तचर संस्था, इस्रायली गुप्तचर विभाग आणि संयुक्त राष्ट्र संघ यांच्यासाठी ही बाब उच्चतम सुरक्षा अलर्टवर जाण्याइतकी गंभीर आहे. जर हे युरेनियम इराणने कोणत्या तिसऱ्या पक्षाकडे किंवा अज्ञात ठिकाणी हलवले असेल, तर ते भविष्यातील अणुहल्ल्याचा किंवा सौदेबाजीचा भाग म्हणून वापरले जाऊ शकते, अशी भीती व्यक्त होत आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Pakistani Major Moiz Abbas: विंग कमांडर अभिनंदन यांना पकडणारा पाकिस्तानी मेजर मुईझ ठार; TTPने घेतली जबाबदारी

400 किलो युरेनियम

अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांनंतर इराणमधून गायब झालेले ४०० किलो युरेनियम हे आंतरराष्ट्रीय राजकारण, सुरक्षा आणि कूटनीतीसाठी मोठे आव्हान आहे. या युरेनियमचा नेमका ठावठिकाणा लवकरात लवकर शोधणे, ही जागतिक संस्थांसमोरची सर्वात मोठी जबाबदारी आहे. इराणच्या अणुकार्यक्रमाबाबत अमेरिकेची भूमिका सुद्धा आता अंतर्विरोधाने भरलेली दिसत असून, या संपूर्ण प्रकरणावर लवकरच नवे वळण येण्याची शक्यता आहे.

Web Title: 400 kg enriched uranium missing in iran after us strike

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2025 | 11:41 AM

Topics:  

  • America
  • international news
  • Iran Vs America

संबंधित बातम्या

Germany lithium: भारताच्या ‘या’ मित्रराष्ट्राला सापडला 43 दशलक्ष टन लिथियम; ऊर्जा आणि तंत्रज्ञान क्षेत्रात वाढणार भागीदारी
1

Germany lithium: भारताच्या ‘या’ मित्रराष्ट्राला सापडला 43 दशलक्ष टन लिथियम; ऊर्जा आणि तंत्रज्ञान क्षेत्रात वाढणार भागीदारी

Chabahar Port : अमेरिकेची गहिरी चाल! थेट भारत-इराणमधील करारावरच घातला घाला; आता मोदी सरकार घेणार का माघार?
2

Chabahar Port : अमेरिकेची गहिरी चाल! थेट भारत-इराणमधील करारावरच घातला घाला; आता मोदी सरकार घेणार का माघार?

Rare Disease : जगातील सर्वात दुर्मिळ आजार ज्यात भीतीच मरते; ‘या’ दोन व्यक्तींनी जगाला सांगितली त्यांची अद्भुत कहाणी
3

Rare Disease : जगातील सर्वात दुर्मिळ आजार ज्यात भीतीच मरते; ‘या’ दोन व्यक्तींनी जगाला सांगितली त्यांची अद्भुत कहाणी

‘भारतीय उद्योजक PM मोदींवर… ; टॅरिफच्या मुद्यावरुन ट्रम्पच्या सहकार्याचे खळबळजनक विधान
4

‘भारतीय उद्योजक PM मोदींवर… ; टॅरिफच्या मुद्यावरुन ट्रम्पच्या सहकार्याचे खळबळजनक विधान

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Zodiac Sign: कालरात्री देवीच्या आशीर्वादाने मिथुन आणि धनु राशीसह या राशीच्या लोकांचा दिवस राहील चांगला

Zodiac Sign: कालरात्री देवीच्या आशीर्वादाने मिथुन आणि धनु राशीसह या राशीच्या लोकांचा दिवस राहील चांगला

PCB Chairman Mohsin Naqvi आशिया कप 2025 ची ट्रॉफी घेऊन पळाले की काय? नक्की प्रकरण काय…वाचा सविस्तर

PCB Chairman Mohsin Naqvi आशिया कप 2025 ची ट्रॉफी घेऊन पळाले की काय? नक्की प्रकरण काय…वाचा सविस्तर

Top Marathi News Today Live:  भारताच्या संघाने आशिया कप 2025 जिंकूनही ट्राॅफीशिवाय साजरा केला विजय! पहा Video

LIVE
Top Marathi News Today Live: भारताच्या संघाने आशिया कप 2025 जिंकूनही ट्राॅफीशिवाय साजरा केला विजय! पहा Video

Bigg Boss 19: ‘बिग बॉस’च्या घरातून आवेज दरबारचा पत्ता कट, चाहत्यांनी मेकर्सवर केले आरोप

Bigg Boss 19: ‘बिग बॉस’च्या घरातून आवेज दरबारचा पत्ता कट, चाहत्यांनी मेकर्सवर केले आरोप

सकाळी उठल्यानंतर नियमित करा ‘या’ काळ्या पदार्थाच्या पाण्याचे सेवन, महिनाभरात शरीरात दिसून येतील आश्चर्यकारक बदल

सकाळी उठल्यानंतर नियमित करा ‘या’ काळ्या पदार्थाच्या पाण्याचे सेवन, महिनाभरात शरीरात दिसून येतील आश्चर्यकारक बदल

IND vs PAK : भारताच्या संघाने आशिया कप 2025 जिंकूनही ट्राॅफीशिवाय साजरा केला विजय! पहा Video

IND vs PAK : भारताच्या संघाने आशिया कप 2025 जिंकूनही ट्राॅफीशिवाय साजरा केला विजय! पहा Video

Todays Gold-Silver Price: सोनं – चांदीच्या वाढत्या किंमतींना लागला ब्रेक, किंचीत घसरले भाव! जाणून घ्या सविस्तर

Todays Gold-Silver Price: सोनं – चांदीच्या वाढत्या किंमतींना लागला ब्रेक, किंचीत घसरले भाव! जाणून घ्या सविस्तर

व्हिडिओ

पुढे बघा
Nashik Flood : गोदावरीला महापूर अनेक दुकाने गेली पाण्याखाली, मोठे नुकसान

Nashik Flood : गोदावरीला महापूर अनेक दुकाने गेली पाण्याखाली, मोठे नुकसान

Kolhapur News :  नवरात्रोत्सवाच्या आजच्या सहाव्या माळेला करवीर निवासिनी आई अंबाबाईची थाटात पूजा

Kolhapur News : नवरात्रोत्सवाच्या आजच्या सहाव्या माळेला करवीर निवासिनी आई अंबाबाईची थाटात पूजा

Thane News : ठाण्यात बंजारा समाज आक्रमक, अनुसूचित जमातीत समावेशाची मागणी जोरात

Thane News : ठाण्यात बंजारा समाज आक्रमक, अनुसूचित जमातीत समावेशाची मागणी जोरात

Karjat : पावसामुळे कर्जत तालुक्यातील भातशेती भुईसपाट

Karjat : पावसामुळे कर्जत तालुक्यातील भातशेती भुईसपाट

NAGPUR : धम्मचक्रप्रवर्तन दिनानिमित्त शांती मार्च, प्रदर्शनी व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

NAGPUR : धम्मचक्रप्रवर्तन दिनानिमित्त शांती मार्च, प्रदर्शनी व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

NAGPUR: जनप्रतिनिधी म्हणून जबाबदारी पार पाडली, खासदार बर्वे यांचे स्पष्टीकरण

NAGPUR: जनप्रतिनिधी म्हणून जबाबदारी पार पाडली, खासदार बर्वे यांचे स्पष्टीकरण

Beed : पंधरा गावातील सर्वच नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली,जनजीवन विस्कळीत

Beed : पंधरा गावातील सर्वच नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली,जनजीवन विस्कळीत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.