
Bangladesh Violence
अहवालानुसार, या घटनांमध्ये कट्टरपंथी जमावाकडून हिंदूंना मारहाण केली जात आहे, त्यांची हत्या केली जात आहे. घरे-दुकानांची तोडोफोड, जाळणे, मंदिरे उद्ध्वस्त करणे आणि पोलिसांकडून अटकेच्या घटनांचा समावेश आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या हिंसाचाराच्या घटनांमध्ये ३० हून अधिक जिल्ह्यात पसरल्या आहेत. यामध्ये रंगपूर, चांदपूर, चट्टोग्राम, दिनाजपूर, खुलना, कोमिल्ला, गाझीपूर आणि सिलहट यांसारख्या प्रदेशांचा सामावेश आहे. यामुळे देशभरातील हिंदूच्या असुरक्षिततेचे चित्र समोर आले आहे.
अहवालात दावा करण्यात आला आहे की, यापैकी अनेक प्रकरणांमध्ये ईशनिंदा आरोपांखील सोशल मीडियावरील पोस्ट आधारित आहेत. बनावट पोस्ट बनवून, हिंदूचे अकाऊंट्स हॅक करुन टाकल्याचे आणि त्यांची फॉरेन्सिक तपासणी देखील न करण्यात आले असल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे. अहवालानुसार, कट्टरपंथी गटांच्या दाबावाखाली पोलिसांनी देखील अनेक हिंदूंना ईशनिंदाच्या खोट्या आरोपांखाली अटक केली आहे. अटक झाल्यानंतरही हिंसाचार थाबंबलेला नाही. त्यांना मारहाण करण्यात आली आहे. यामुळे बांगलादेशच्या मानवाधिकार संघटनांनी हिंदूंना तातडीने संरक्षण देण्याची, हिंसक घटनांचा निष्पक्ष तपास करण्याची, दोषींवर कठोर कारवाईती आणि ईशनिंदाचा गैरवापर थांबवण्याची मागणी केली आहे.
या हिंसाचारात अल्पवयीन मुलांना, विद्यार्थींना आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांना मुख्यत: लक्ष्य करण्यात आले आहे. कॉलेज आणि विद्यापीठांमध्ये शिकणाऱ्यांना निलंबित करण्यात आळे आहे. त्यांना अटक, पोलिस रिमांडमध्ये ठेवण्यात आले असल्याचे HRCBMच्या अहवालात सांगण्यात आले आहे. बांगलादेशातील मानवाधिक संघटनांच्या मते, यातून कट्टरपंथी लोक हिंदूं अल्पसंख्याकांना दडपवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्यावर ईशनिंदा हत्याराचा वापर करुन सामिजक बहिष्कार टाकला जात आहे.
सध्या या सर्व परिस्थितीच आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील पडसाद उमटले आहे. लंडनमध्ये बांगलादेशातील हिंसाचाराविरोधा हाय कमिशन बाहेर तीव्र निदर्शने करण्यात आली आहेत. तसेच भारतातही बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराच्या घटनांचा तीव्र निषेध केला जात आहे. अनेक आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनांनी देखील याबाब चिंता व्यक्त केली आहे.
बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराचे पडसाद परदेशात; लंडनमध्ये दिपू दासच्या हत्येविरोधात तीव्र निदर्शने
Ans: बांगलादेशच्या अल्पसंख्याकांसाठीच्या मानवाधिकर काँग्रेस (HRCBM) च्या अहवालानुसार, दीपू दाससह आतापर्यंत गेल्या सहा महिन्यांत हिंदूंवरील हिंसक घटना ७१ नोंदवण्यात आल्या आहेत.
Ans: बांगलादेशच्या अल्पसंख्याकांसाठीच्या मानवाधिकर काँग्रेस (HRCBM) च्या अहवालानुसार, बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारामध्ये ईशनिंदाच्या नावाखाली खोटे आरोप, घरांची व मंदिरांची तोडफोड, पोलिसांकडून अटक, हत्या, मारहणा, सामाजिक बहिष्काराच्या घटना नोंदवल्या गेल्या आहेत.
Ans: मानवाधिकार संघटनांनी बांगलादेशातील हिंदूंना तातडीने संरक्षण देण्याची, हिंसक घटनांचा निष्पक्ष तपास करण्याची, दोषींवर कठोर कारवाईती आणि ईशनिंदाचा गैरवापर थांबवण्याची मागणी केली आहे.