बांगलादेशात हिंदूवरील अत्याच्याराचे पडसाद परदेशात; लंडनमध्ये दिपू दासच्या हत्येविरोधात तीव्र निदर्शने (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
बांगलादेशात हिंदू अल्पसंख्याकांची परिस्थिती अत्यंत चिंताजनक होत चालली आहे. कट्टरपंथी गटांकडून ईशनिंदाच्या खोट्या आरोपांखाली हिंदूवर हल्ले केले जात आहे. त्यांची घरे जाळली जात आहेत, मालमत्ता जप्त केली जात आहे. बांगलादेश हिंदूंना धमक्या देण्याचे आणि त्यांच्या थेट हत्येचे प्रमाण वाढले आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर मावाधिकार संघटनांनी या सर्व प्रकारच्या हिंसाचारी घटनांना तीव्र निषेध नोंदवला आहे. तसेच वाढत्या हिंसाचाराबाबत तीव्र चिंताही व्यक्त केली आहे.
नुकतेच २७ वर्षीय हिंदू युवक दिपू दास याची निघृणपणे हत्या करण्यात आली होती. मयमनसिंह जिल्ह्यात भालुका येथे काम करणाऱ्या दिपू दास वर ईशनिंदाचा खोटा आरोप करत त्याला बेदम मारहाण करण्यात आली. यानंतर त्याच्या मतदेहाला लटकवून जाळण्यातही आहे. या संपूर्ण घटनेने जगाला धक्का बसला होता. शिवाय कट्टरपंथीय एवढ्यावरच थांबले नाहीत, यानंतर देखील २९ वर्षीय अमृत मंडल उर्फ सम्राटची मारहाण करुन हत्या करण्यात आली आहे. त्याच्यावर खंडणीचा आरोप करत त्याला ठार करण्यात आले आहे.
दरम्यान या हत्येनंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरुन तीव्र निषेध नोंदवला जात आहे. लंडनमध्ये बांगलादेश हाय कमिशन बाहेर बांगलादेशी आणि भारतीय हिंदूंनी निदर्शने केली आहेत. या निदर्शनांमध्ये हिंदूंवरील अत्याचार थांबवा, अल्पसंख्याकांना संरक्षण द्या अशा घोषणा देण्यात आल्या आहेत. बांगलादेश सरकारकडे याकडे गांभीर्याने पाहण्याची आणि आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.
या घटनेचे पडसाद भारतातही उमटले आहे. भारतातही विविध ठिकाणी बांगलादेशातील हिंदूवरील अत्याचाराविरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली आहे. दीपू दासला न्याय देण्याची मागणी केली जात आहे. सोशल मीडियावरुनहा याबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
#WATCH | Indian and Bangladeshi Hindu communities in London protest outside the Bangladesh High Commission in London against the killings of Hindus in Bangladesh pic.twitter.com/gNBz72GnDt — ANI (@ANI) December 27, 2025
Ans: बांगलादेशात हिंदूंवर ईशनिंदाचे खोटे आरोप कट्टपंथी गटांकडून केले जात आहे. तसेच त्यांची घरे जाळणे, मालमत्ता बळकावणे आणि हत्या करण्याचे प्रमाण वाढले आहे.
Ans: बांगलादेशातील हिंदूंवरील वाढत्या अत्याचाराबाबत आंतरराष्ट्रीय स्तरावर तीव्र निषेध केला जात आहे. ब्रिटन आणि भारतात याविरोधात निदर्शने सुरु आहेत. तर मानवाधिकार संघटनांनी देखील यावर चिंता व्यक्त केली आहे.






