Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘Operation Searchlight’चा तो भयानक इतिहास! बांगलादेशने पाकिस्तानला का सुनावलं? तारिक रहमान यांच्या विधानाने इस्लामाबादमध्ये खळबळ

Bangladesh Genocide Day : बांगलादेश दरवर्षी २५ मार्च रोजी नरसंहार दिन साजरा करतो. १९७१ साली याच दिवशी, पाकिस्तानी सैन्याने 'ऑपरेशन सर्चलाइट'च्या नावाखाली निःशस्त्र नागरिकांची कत्तल केली होती.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Mar 25, 2026 | 10:28 AM
bangladesh genocide day tarique rahman operation searchlight pakistan army impact 2026

bangladesh genocide day tarique rahman operation searchlight pakistan army impact 2026

Follow Us
Close
Follow Us:
  • नरसंहार दिनाचे स्मरण
  • पाकिस्तानला इशारा
  • स्वातंत्र्याचा सशस्त्र लढा

Bangladesh Genocide Day 25 March : इतिहासाच्या पानात काही तारखा अशा असतात ज्या विसरणे कोणत्याही राष्ट्राला अशक्य असते. बांगलादेशसाठी २५ मार्च हा असाच एक दिवस आहे ‘नरसंहार दिन’ (Genocide Day). १९७१ च्या याच दिवशी पाकिस्तानी लष्कराने मानवतेला काळिमा फासणारे ‘ऑपरेशन सर्चलाइट’ राबवले होते. आज, इतक्या वर्षांनंतर बांगलादेशचे पंतप्रधान तारिक रहमान यांनी या जखमा पुन्हा ताज्या केल्या असून, पाकिस्तानच्या क्रूरतेचा पाढा जगासमोर वाचला आहे. त्यांच्या या विधानामुळे दक्षिण आशियातील राजकारणात पुन्हा एकदा नवे वारे वाहू लागले आहेत.

काय होतं ते ‘ऑपरेशन सर्चलाइट’?

२५ मार्च १९७१ ची ती मध्यरात्र बांगलादेशच्या (तत्कालीन पूर्व पाकिस्तान) इतिहासातील सर्वात भीषण रात्र ठरली. पाकिस्तानी सैन्याने लोकशाहीचा गळा घोटण्यासाठी आणि स्वातंत्र्याचा आवाज दाबण्यासाठी ढाका शहरावर चहूकडून हल्ला चढवला. ढाका विद्यापीठाचे वसतिगृह असो, पिलखाना असो किंवा राजारबाग पोलीस लाईन; पाकिस्तानी सैनिकांनी विचारवंत, शिक्षक, पोलीस आणि निष्पाप नागरिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. एकाच रात्रीत हजारो लोक मारले गेले. या क्रूरतेला पाकिस्तानने ‘ऑपरेशन सर्चलाइट’ असे गोंडस नाव दिले होते, पण प्रत्यक्षात तो एक संघटित नरसंहार होता.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : World War 3: ‘आम्ही जिंकलो!’ तेहरानच्या आकाशात अमेरिकन विमानांची गर्जना; ट्रम्प यांना इराणकडून मिळाली ‘खास’ भेट

तारिक रहमान यांचा पाकिस्तानवर शाब्दिक प्रहार

पंतप्रधान तारिक रहमान यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर या दिवसाचे वर्णन “बांगलादेशच्या इतिहासातील सर्वात लाजिरवाणा आणि क्रूर दिवस” असे केले आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, हे हत्याकांड पूर्वनियोजित होते. रहमान यांनी हुतात्म्यांना आदरांजली वाहताना सध्याच्या आणि भावी पिढीला या बलिदानाची आठवण करून दिली. विशेष म्हणजे, शेख हसीना यांच्या कार्यकाळात २०१७ मध्ये या दिवसाला अधिकृतपणे ‘नरसंहार दिन’ म्हणून मान्यता मिळाली होती, आणि आता तारिक रहमान यांनीही तोच वारसा पुढे नेत पाकिस्तानला आरसा दाखवला आहे.

March 25, 1971 is observed as Genocide Day. On the occasion of Genocide Day, 1 pay my deepest respect to all the martyrs. In the history of freedom-loving Bangladesh, 25 March 1971 remains one of the most disgraceful and brutal days. On that dark night, the Pakistani occupation… pic.twitter.com/ENyyvnz8Tw — Tarique Rahman (@trahmanbnp) March 24, 2026

credit – social media and Twitter

पाकिस्तान आणि आयएसआयसाठी धोक्याची घंटा?

गेल्या काही महिन्यांपासून, विशेषतः मोहम्मद युनूस यांच्या अंतरिम सरकारच्या काळात, बांगलादेश आणि पाकिस्तानमधील संबंध सुधारत असल्याचे चित्र होते. पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआयला ढाकामध्ये मोकळे रान मिळत असल्याची चर्चा आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू होती. मात्र, तारिक रहमान यांच्या या रोखठोक विधानामुळे पाकिस्तानच्या अपेक्षांना मोठा धक्का बसला आहे. तज्ज्ञांच्या मते, बांगलादेश आपला इतिहास आणि स्वातंत्र्य कधीही विसरणार नाही, हाच संदेश यातून दिला गेला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Strait Of Hormuz: ‘आम्ही या नाटकात नाही’ इस्रायलचा ट्रम्पला घरचा आहेर; अमेरिकेच्या ’15 कलमी’ चक्रव्यूहात अडकणार इराण?

प्रतिकाराची ती ठिणगी: ईस्ट बंगाल रेजिमेंट

रहमान यांनी केवळ अत्याचारांचीच आठवण करून दिली नाही, तर चित्तगॉंगमधील ८ व्या ईस्ट बंगाल रेजिमेंटच्या शौर्याचाही उल्लेख केला. याच सैनिकांनी पाकिस्तानी लष्कराच्या विरोधात बंड पुकारून सशस्त्र क्रांतीला सुरुवात केली होती. या ऐतिहासिक प्रतिकारामुळेच पाकिस्तानच्या योजना धुळीला मिळाल्या आणि नऊ महिन्यांच्या संघर्षानंतर १६ डिसेंबर १९७१ रोजी एका नवीन राष्ट्राचा ‘बांगलादेश’चा जन्म झाला.

💡

Frequently Asked Questions

  • Que: बांगलादेशमध्ये २५ मार्च हा दिवस का साजरा केला जातो?

    Ans: २५ मार्च १९७१ रोजी पाकिस्तानी लष्कराने केलेल्या भीषण नरसंहाराच्या स्मृतीप्रीत्यर्थ हा दिवस 'नरसंहार दिन' म्हणून पाळला जातो.

  • Que: 'ऑपरेशन सर्चलाइट' म्हणजे काय?

    Ans: पूर्व पाकिस्तानमधील लोकशाही चळवळ आणि स्वातंत्र्य लढा दडपण्यासाठी पाकिस्तानी लष्कराने राबवलेल्या लष्करी कारवाईचे नाव 'ऑपरेशन सर्चलाइट' होते.

  • Que: तारिक रहमान यांच्या विधानामुळे पाकिस्तान का अस्वस्थ आहे?

    Ans: अलीकडे दोन्ही देशांमधील संबंध सुधारत असताना, पंतप्रधानांनी थेट लष्करी अत्याचारांचा उल्लेख केल्यामुळे पाकिस्तानच्या मुत्सद्दी प्रयत्नांना धक्का बसला आहे.

Web Title: Bangladesh genocide day tarique rahman operation searchlight pakistan army impact 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 25, 2026 | 10:28 AM

Topics:  

  • Bangladesh
  • pakistan army
  • Tariq Rahman

संबंधित बातम्या

Foreign Policy: S Jaishankar आणि बांगलादेशच्या उच्चायुक्तांची भेट; Tarique Rahman Govt सोबत भारताची ‘बॅटिंग’ जोरात
1

Foreign Policy: S Jaishankar आणि बांगलादेशच्या उच्चायुक्तांची भेट; Tarique Rahman Govt सोबत भारताची ‘बॅटिंग’ जोरात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.