होर्मुझची सामुद्रधुनी, अणुकार्यक्रम: युद्ध टाळण्यासाठी अमेरिकेने इराणला १५-कलमी योजना पाठवली, इस्रायलने म्हटले आम्ही चर्चेत नाही ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
US 15-point plan for Iran 2026 : गेल्या काही दिवसांपासून इराण आणि इस्रायल-अमेरिका (US-Israel Iran War) यांच्यात सुरू असलेल्या भीषण संघर्षामुळे जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहे. मात्र, आता या विनाशाच्या गर्तेतून बाहेर पडण्यासाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. अमेरिकेने इराणसोबतचे युद्ध कायमचे संपवण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि गुप्त ‘१५-कलमी’ योजना तयार केली आहे. विशेष म्हणजे, हा प्रस्ताव थेट न पाठवता पाकिस्तानच्या माध्यमातून तेहरानपर्यंत पोहोचवण्यात आला आहे.
या प्रस्तावातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा इराणच्या अणुकार्यक्रमाशी संबंधित आहे. अमेरिकेने मागणी केली आहे की, इराणने आपल्या भूमीवर सुरू असलेले युरेनियम संवर्धन तात्काळ आणि पूर्णपणे थांबवावे. तसेच, आतापर्यंत संवर्धित केलेले सर्व युरेनियम परदेशात हस्तांतरित करावे. या बदल्यात, इराणने रोखून धरलेली ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ (Strait of Hormuz) पुन्हा व्यापारासाठी खुली करावी लागणार आहे. ही तीच जागा आहे जिथून जगातील २०% कच्च्या तेलाची वाहतूक होते. इराणने हा मार्ग रोखल्यामुळे जागतिक स्तरावर पेट्रोल-डिझेलच्या किमती गगनाला भिडल्या होत्या.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : March 25 : इतिहासातील तो ‘काळा’ डाग आणि मानवतेचा हुंकार; गुलामगिरीचे चटके अन् बेपत्ता वीरांच्या बलिदानाची विदारक कहाणी
इराण हा प्रस्ताव का मान्य करेल? याचे उत्तर या योजनेच्या दुसऱ्या बाजूत आहे. जर इराणने या १५ अटी मान्य केल्या, तर अमेरिकेने इराणवर लादलेले सर्व आर्थिक निर्बंध उठवले जातील. इतकेच नाही, तर इराणला त्यांच्या ‘बुशेहर’ अणुप्रकल्पात नागरी वापरासाठी (वीज निर्मितीसाठी) अणुऊर्जा विकसित करण्यासाठी अमेरिका स्वतः मदत करणार आहे. या प्रस्तावात सर्वात दिलासादायक बाब म्हणजे, यात इराणमधील सत्तापालटाचा कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाही, ज्यामुळे इराणी नेतृत्वाचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
BREAKING: The US has sent Iran a 15-point plan to end the US-Israel war, a source told Reuters, with The New York Times reporting it was delivered via Pakistan, citing two officials. 🔴 LIVE updates: https://t.co/uc5N2KCV5i pic.twitter.com/vWF3uvnKzq — Al Jazeera English (@AJEnglish) March 24, 2026
credit – social media and Twitter
एकीकडे अमेरिका शांतीचा मार्ग शोधत असताना, त्यांचा सर्वात जवळचा मित्र इस्रायल मात्र या चर्चेत कुठेही दिसत नाहीये. इस्रायलचे संयुक्त राष्ट्रांतील राजदूत डॅनी डॅनॉन यांनी स्पष्ट केले की, “आम्ही या कोणत्याही चर्चेत सहभागी नाही.” इस्रायलचा असा विश्वास आहे की इराणवरील लष्करी हल्ल्यांमुळे बरेच काही साध्य झाले आहे आणि आता चर्चा करण्याऐवजी इराणची ताकद पूर्णपणे नष्ट करणे गरजेचे आहे. इस्रायलची ही भूमिका भविष्यात या शांती प्रस्तावात अडथळा ठरू शकते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Save Himalayas: हिमालयात दुप्पट वेगाने वितळतोय बर्फ; 2 अब्ज लोकांची तहान भागवणाऱ्या ‘आशियाच्या जलकुंभा’ला लागली गळती, वाचा कारण
जर हा १५-कलमी प्रस्ताव यशस्वी झाला आणि एक महिन्याचा युद्धविराम लागू झाला, तर जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा दिलासा मिळेल. कच्च्या तेलाच्या किमती कमी होतील आणि शेअर बाजारात पुन्हा तेजी येईल. मात्र, इस्रायलची नाराजी आणि इराणची संशयी वृत्ती पाहता, ही योजना प्रत्यक्षात कशी उतरते, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.
Ans: हा प्रस्ताव इराणसोबतचे युद्ध संपवण्यासाठी असून, यात अणुकार्यक्रम थांबवणे आणि होर्मुझची सामुद्रधुनी खुली करणे या मुख्य अटी आहेत.
Ans: अमेरिका आणि इराणमध्ये थेट संवाद नसल्यामुळे अमेरिकेने आपला हा अधिकृत प्रस्ताव पाकिस्तानच्या माध्यमातून इराण सरकारपर्यंत पोहोचवला आहे.
Ans: इस्रायलला वाटते की चर्चा करण्यापेक्षा लष्करी कारवाई करून इराणचे अणुप्रकल्प कायमचे नष्ट करणे हाच सुरक्षेचा एकमेव मार्ग आहे.






