
bangladeshi hindu girl shrabanti ghosh found dead in chittagong two suspects detained 2026
Shrabanti Ghosh death case Bangladesh : बांगलादेशातील (Bangladesh) अल्पसंख्याक हिंदू समुदायावरील अत्याचाराच्या बातम्या सातत्याने समोर येत असतानाच, आता चितगावमधून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. लालखान बाजार परिसरात राहणाऱ्या श्रावंती घोष या अवघ्या १२ वर्षांच्या मुलीचा मृतदेह तिच्या घरात संशयास्पद स्थितीत लटकलेला आढळला. ४ जानेवारी २०२६ रोजी घडलेल्या या घटनेमुळे स्थानिक हिंदू समुदायात दहशतीचे आणि संतापाचे वातावरण आहे. प्राथमिक तपासाअंती पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे.
श्रावंती घोष ही लालखान बाजार सरकारी प्राथमिक शाळेत चौथी इयत्तेत शिकत होती. तिचे वडील तपन घोष हे नोकरीनिमित्त घराबाहेर असतात, तर आई रोझी घोष एका कपड्याच्या कारखान्यात काम करतात. घटनेच्या दिवशी श्रावंती रात्री १० वाजेच्या सुमारास आपल्या आजोबांच्या घरून एकटीच राहत्या घरी आली होती. अर्ध्या तासानंतर जेव्हा तिचे आजोबा धाकट्या नातवाला घेऊन घरी पोहोचले, तेव्हा त्यांना घराचे दार उघडे दिसले. आत गेल्यावर श्रावंती छताला लटकलेल्या अवस्थेत आढळली.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Oil Politics: अमेरिका तिसऱ्या महायुद्धासाठी सज्ज! 500% कर अन् 7 देशांची उडाली झोप, Trumpने रशियासह भारताचेही वाढवले टेन्शन
श्रावंतीची आई रोझी घोष यांनी या मृत्यूवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. “माझ्या मुलीचे पाय बेडवर टेकलेले होते. जर तिने गळफास लावून आत्महत्या केली असती, तर पाय अधांतरी असायला हवे होते. ती केवळ १२ वर्षांची निरागस मुलगी होती, तिला आत्महत्येचा अर्थही माहीत नव्हता,” असे त्यांनी रडत रडत सांगितले. आईच्या या विधानामुळे या प्रकरणाला हत्येचे वळण मिळाले आहे. श्रावंतीच्या मानेवर काळपट डाग आढळले असून शरीरावर इतर कुठेही जखमा नाहीत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
-Barbarianism has crossed all limits in #Bangladesh
-This 12-year-old #Hindu girl child Shrabanti Ghosh was brutally raped & strangled in Chittograms
-Perpitrators committed heinous crime when she was alone with her little brother
-They hanged her body to stage a suicide in… pic.twitter.com/AwI0kwpR8n — Insightful Geopolitics (@InsightGL) January 7, 2026
credit : social media and Twitter
रॅपिड ॲक्शन बटालियन (RAB-7) चे कमांडर लेफ्टनंट कर्नल मोहम्मद तौहिद यांनी सांगितले की, पीडितेच्या आईच्या तक्रारीनंतर प्रदीप आणि अजय नावाच्या दोन शेजाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. घटनेच्या वेळी हे दोघेही इमारतीत उपस्थित होते. त्यापैकी एक संशयित पीडितेच्या शेजारील खोलीत तर दुसरा दुसऱ्या मजल्यावर राहतो. हे केवळ शेजारील भांडण होते की यामागे काही गंभीर गुन्हेगारी कृत्य आहे, याचा तपास आता पोलीस करत आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : World War 3: ब्रिटनच्या आकाशात ‘मृत्यूचे दूत’! विमानतळावर उतरली डझनभर सशस्त्र अमेरिकन विमाने; कोणता देश रडारवर?
या घटनेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर जगभरातील मानवाधिकार संघटनांनी आणि हिंदू संघटनांनी यावर तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही नेटकऱ्यांनी हा बलात्कार आणि हत्येचा प्रकार असल्याचा दावा केला आहे. मात्र, पोलिसांनी “आम्ही अद्याप शवविच्छेदन (Post-mortem) अहवालाची वाट पाहत आहोत,” असे सांगून अधिक भाष्य करणे टाळले आहे. शवविच्छेदनानंतरच श्रावंतीवर अत्याचार झाला होता का आणि तिचा मृत्यू गळा दाबल्यामुळे झाला की लटकल्यामुळे, हे स्पष्ट होईल.
Ans: श्रावंती चितगावमधील एका प्राथमिक शाळेत ४ थीत शिकणारी १२ वर्षीय हिंदू मुलगी होती. ४ जानेवारी २०२६ रोजी ती तिच्या घरात लटकलेल्या अवस्थेत मृतावस्थेत आढळली.
Ans: पोलिसांनी प्रदीप आणि अजय नावाच्या दोन शेजाऱ्यांना संशयावरून ताब्यात घेतले असून त्यांची रॅपिड ॲक्शन बटालियनकडून चौकशी सुरू आहे.
Ans: श्रावंतीचे पाय बेडवर टेकलेले होते आणि तिच्या मानेवर काळे डाग होते. आईच्या मते ही आत्महत्या नसून गळा दाबून केलेली हत्या आहे.