भारत, चीन आणि ब्राझीलला लक्ष्य करून रशियावर ५००% कर लादण्याचे विधेयक ट्रम्प यांनी केले मंजूर ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Trump 500 percent tariff Russia bill : जागतिक राजकारणात सध्या एकामागून एक मोठे धक्के बसत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी रशियाच्या विरोधात आतापर्यंतचे सर्वात कठोर पाऊल उचलले आहे. रशियाची युद्धयंत्रणा कमकुवत करण्यासाठी ट्रम्प यांनी ‘सँक्शनिंग रशिया ॲक्ट २०२५’ (Sanctioning Russia Act 2025) या द्विपक्षीय विधेयकाला मंजुरी दिली आहे. या विधेयकाचा सर्वात मोठा फटका केवळ रशियालाच नाही, तर रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या भारत, चीन आणि ब्राझील यांसारख्या देशांनाही बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अमेरिकेचे सिनेटर लिंडसे ग्राहम यांनी जाहीर केले की, ट्रम्प यांनी या विधेयकावर मोहोर उमटवली आहे. या कायद्यांतर्गत रशियातून अमेरिकेत येणाऱ्या सर्व वस्तू आणि सेवांवर किमान ५००% आयात शुल्क (Tariff) लादले जाईल. ग्राहम यांनी या विधेयकाला “इकोनॉमिक बंकर बस्टर” असे संबोधले आहे. हे विधेयक केवळ रशियाला रोखण्यासाठी नसून, रशियाकडून स्वस्त दरात कच्चे तेल आणि युरेनियम खरेदी करणाऱ्या देशांना शिक्षा देण्यासाठी वापरले जाणार आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Donald Trump: ‘जर आपण हरलो, तर ते मला सोडणार नाहीत!’; अमेरिकन रिपब्लिकन खासदार ‘असा’ करणार डोनाल्ड ट्रम्पचा गेम ओव्हर
भारतासाठी ही बातमी अत्यंत चिंताजनक आहे. अमेरिकेने यापूर्वीच भारतीय वस्तूंवर सुमारे ५०% कर लादला आहे, ज्यापैकी २५% कर हा थेट रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दलच्या दंडाच्या स्वरूपात आहे. नव्या विधेयकानुसार, जर भारताने रशियाकडून तेल खरेदी करणे पूर्णपणे बंद केले नाही, तर हे शुल्क ५०० टक्क्यांपर्यंत वाढू शकते. याचा थेट परिणाम भारताच्या निर्यातीवर आणि देशांतर्गत महागाईवर होईल.
Trump greenlights Russian sanctions bill, says US Senator Graham, that paves way for 500% tariff on countries importing energy from Moscow. The Senator points out that the bill will ‘incentivize’ China, India and Brazil to stop ‘buying the cheap Russian oil’ pic.twitter.com/mcZOyJJtcp — Sidhant Sibal (@sidhant) January 8, 2026
credit : social media and Twitter
डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘हाऊस जीओपी मेंबर रिट्रीट’मध्ये बोलताना सांगितले की, “पंतप्रधान मोदी माझे चांगले मित्र आहेत, पण सध्या ते माझ्यावर नाराज आहेत.” ट्रम्प यांच्या मते, अमेरिकेने लादलेल्या प्रचंड करामुळे भारताची आर्थिक कोंडी होत आहे. “मोदींना मला खुश करायचे आहे, त्यांनी रशियन तेलाची आयात काही प्रमाणात कमीही केली आहे, पण जोपर्यंत ते पूर्णपणे रशियाची साथ सोडत नाहीत, तोपर्यंत आम्ही कर कमी करणार नाही,” अशा कडक शब्दांत ट्रम्प यांनी आपली भूमिका मांडली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : World War: ‘शस्त्रे सोडली होती, पण आता पुन्हा उचलेन’ Maduro अटकेनंतर आता या’ देशाच्या राष्ट्राध्यक्षांचाही ट्रम्पला युद्धाचा इशारा
हे विधेयक अशा वेळी समोर आले आहे जेव्हा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की शांतता चर्चेसाठी अमेरिकन शिष्टमंडळाची भेट घेत आहेत. ट्रम्प यांचे जावई जेरेड कुशनर आणि विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ या वाटाघाटीत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. रशियावर आर्थिक दबाव वाढवून पुतिन यांना वाटाघाटींच्या टेबलावर आणणे, हा ट्रम्प यांचा मुख्य उद्देश असल्याचे दिसून येत आहे.
Ans: हे एक अमेरिकन विधेयक आहे ज्यामध्ये रशियातून आयात होणाऱ्या वस्तूंवर ५००% कर लावण्याची आणि रशियाकडून ऊर्जा खरेदी करणाऱ्या देशांवर (उदा. भारत, चीन) कठोर निर्बंध लादण्याची तरतूद आहे.
Ans: ट्रम्प यांनी सांगितले की, अमेरिकेने रशियन तेलाच्या मुद्द्यावरून भारतीय वस्तूंवर उच्च कर लादल्यामुळे पंतप्रधान मोदी त्यांच्यावर नाराज आहेत, मात्र त्यांनी भारताने तेल आयात कमी केल्याचे मान्यही केले आहे.
Ans: जर हे विधेयक अमलात आले, तर अमेरिकेला निर्यात केल्या जाणाऱ्या भारतीय वस्तूंवर प्रचंड कर लागेल, ज्यामुळे भारतीय कंपन्यांचे नुकसान होईल आणि व्यापारात घट होईल.






