Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bibi Alive: नेतान्याहू यांचा ‘तो’ VIDEO आणि अफवांचा बाजार; इस्रायली पंतप्रधानांनी शत्रूला आपल्याच स्टाईलमध्ये कसं झापलं?

Netanyahu Death Rumors : इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी त्यांच्या मृत्यूच्या अफवांना खोडून काढत एक नवीन व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे ज्यामध्ये ते निरोगी दिसत आहेत आणि विनोदी पद्धतीने प्रतिक्रिया देत आहेत.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Mar 16, 2026 | 09:16 AM
benjamin netanyahu death rumors debunked cafe video marathi news

benjamin netanyahu death rumors debunked cafe video marathi news

Follow Us
Follow Us:
  • मृत्यूच्या अफवांना पूर्णविराम
  • बोटांचे रहस्य आणि ‘AI’ आरोप
  • नागरिकांना भावनिक साद

Benjamin Netanyahu Death Rumors 2026 : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू (Benjamin Netanyahu) यांच्या मृत्यूच्या बातम्यांनी जगभरात खळबळ माजवली होती. इराणने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात ‘बीबी’ (नेतान्याहूंचे टोपणनाव) यांचा अंत झाला, असे दावे ‘X’ (ट्विटर) वर वेगाने पसरले होते. मात्र, रविवारी १५ मार्च २०२६ रोजी नेतान्याहू यांनी एक असा व्हिडिओ पोस्ट केला, ज्याने केवळ या अफवाच संपवल्या नाहीत, तर त्यांच्या विरोधकांना आणि शत्रू राष्ट्रांना मिश्किल टोलाही लगावला. एका कॅफेमध्ये कॉफीचा आस्वाद घेत नेतान्याहू यांनी आपण पूर्णपणे सुदृढ असल्याचे जगाला दाखवून दिले आहे.

“मी कॉफीसाठी मरून गेलोय!”  नेतान्याहूंचा शब्दच्छल

व्हिडिओची सुरुवातच अत्यंत रंजक पद्धतीने होते. नेतान्याहू एका कॅफेमध्ये कॉफी ऑर्डर करताना दिसतात आणि म्हणतात, “मी कॉफीसाठी मरून गेलो आहे…” हा प्रत्यक्षात एक हिब्रू वाक्प्रचार आहे, ज्याचा अर्थ ‘मला कॉफी प्रचंड आवडते’ असा होतो. मात्र, त्यांच्या मृत्यूच्या बातम्या पसरवणाऱ्यांना टोमणा मारण्यासाठी त्यांनी या वाक्याचा खुबीने वापर केला. “लोक म्हणत आहेत की बीबी मरून गेलाय, पण मी तर इथे कॉफीचा आनंद घेतोय,” असे म्हणत त्यांनी आपल्या मृत्यूच्या बातम्यांची खिल्ली उडवली.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Iran Missile City: इराणकडे आहे अंडरवर्ल्ड मृत्यू पेरणाऱ्या क्षेपणास्त्रांचा गुप्त अड्डा; अमेरिकन नौदलासाठी ठरणार आव्हान

सहा बोटे की एआय (AI)? अफवांचा पर्दाफाश

नेतान्याहू यांच्या विरोधात सोशल मीडियावर एक विचित्र मोहीम राबवण्यात आली होती. १२ मार्च रोजीच्या एका पत्रकार परिषदेत नेतान्याहू यांच्या हाताला सहा बोटे दिसत असल्याचा स्क्रीनशॉट व्हायरल झाला होता. नेतान्याहू यांचा मृत्यू झाला असून इस्रायल ‘AI’ (कृत्रिम बुद्धिमत्ता) वापरून त्यांचे बनावट व्हिडिओ बनवत आहे, असा आरोप इराणी समर्थकांकडून केला जात होता. यावर उत्तर म्हणून नेतान्याहू यांनी व्हिडिओमध्ये आपले दोन्ही हात कॅमेऱ्यासमोर वर केले. “जर कोणाला शंका असेल आणि मोजायची हौस असेल, तर त्यांनी माझी बोटे मोजावीत,” असे म्हणत त्यांनी आपली १० बोटे मोजून दाखवली आणि ‘AI’ वादावर कायमचा पडदा टाकला.

אומרים שאני מה? צפו >> pic.twitter.com/ijHPkM3ZHZ — Benjamin Netanyahu – בנימין נתניהו (@netanyahu) March 15, 2026

credit – social media and Twitter

इस्रायली नागरिकांना धीर आणि इराणला इशारा

केवळ विनोद न करता, नेतान्याहू यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या देशातील जनतेला एक भावनिक आणि महत्त्वाचा संदेश दिला. “मला माझी कॉफी जितकी आवडते, त्यापेक्षा कित्येक पटीने जास्त प्रेम मी माझ्या नागरिकांवर करतो,” असे ते म्हणाले. युद्धाच्या सावटाखाली असलेल्या नागरिकांनी सुरक्षित ठिकाणांच्या जवळ राहून ताजी हवा घ्यावी आणि घाबरून न जाता दैनंदिन जीवन जगावे, असे आवाहन त्यांनी केले. त्याच वेळी, इराणने केलेल्या कुरापतींना इस्रायलचे सैन्य, मोसाद आणि सरकार अत्यंत कठोरपणे प्रत्युत्तर देत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : आखाती देशातील युद्धाने मोडले शेअर बाजारचे कंबरडे! गुंतवणूकदारांची धाकधूक कायम

निष्कर्ष: अफवांचे युद्ध आणि सत्याचा विजय

आधुनिक काळात युद्ध केवळ रणांगणावर नाही, तर ‘माहिती’ (Information War) आणि ‘सायबर’ क्षेत्रातही लढले जाते. नेतान्याहू यांचा हा व्हिडिओ म्हणजे शत्रूच्या सायबर युद्धाला दिलेले एक धोरणात्मक उत्तर आहे. इस्रायलचे नेतृत्व आजही खंबीर आहे आणि अफवा पसरवून देशाचे मनोबल खच्ची करता येणार नाही, हे नेतान्याहू यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: बेंजामिन नेतान्याहू यांच्या मृत्यूची अफवा का पसरली होती?

    Ans: सोशल मीडियावर इराणच्या हल्ल्यात नेतान्याहू यांचा मृत्यू झाल्याचा खोटा दावा करणारा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामुळे ही अफवा पसरली.

  • Que: नेतान्याहू यांच्या 'सहा बोटांच्या' वादाचे सत्य काय?

    Ans: नेतान्याहू हे 'AI' निर्मित असल्याचा दावा करण्यासाठी काही लोकांनी एडिटिंगचा वापर करून त्यांच्या हाताला ६ बोटे दाखवली होती, ज्याचा नेतान्याहू यांनी १० बोटे मोजून दाखवत पर्दाफाश केला.

  • Que: नेतान्याहू यांनी व्हिडिओमध्ये कोणता खास संदेश दिला?

    Ans: त्यांनी नागरिकांना धैर्याने राहण्यास सांगितले आणि इस्रायल इराणला चोख प्रत्युत्तर देत असल्याची ग्वाही दिली.

Web Title: Benjamin netanyahu death rumors debunked cafe video marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 16, 2026 | 09:16 AM

Topics:  

  • benjamin netanyahu
  • Israel
  • Video Viral

संबंधित बातम्या

आयटीवाल्यांना येईल कॉम्प्लेक्स! मुंबईत फिरून चहा विकणारा भाऊ करतोय महिन्याला ३० हजारांची बचत, नुकतीच काढलीये ‘व्हॅकेन्सी’
1

आयटीवाल्यांना येईल कॉम्प्लेक्स! मुंबईत फिरून चहा विकणारा भाऊ करतोय महिन्याला ३० हजारांची बचत, नुकतीच काढलीये ‘व्हॅकेन्सी’

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral
2

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या
3

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral
4

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.