Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Masood Azhar viral recording: भारताविरूद्ध सुरु आहे मोठं प्लॅनिंग; दहशतवादी मसूद अझहरच्या ऑडियो रेकॉर्डिंगमधून मोठा गौप्यस्फोट

पाकिस्तानमध्ये महिला दहशतवाद्यांचे नेटवर्क वाढवण्यासाठी, पाकिस्तानच्या प्रत्येक जिल्ह्यात जमात-उल-मोमिनतची शाखा उघडली जाई. संपूर्ण पाकिस्तानमध्ये जैशच्या महिला ब्रिगेडचा विस्तार केला जाईल.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Oct 27, 2025 | 02:14 PM
Masood Azhar,

Masood Azhar,

Follow Us
Close
Follow Us:
  • जैश-ए-मोहम्मद संघटनेने महिलांची भरती करण्यासाठी  नवा प्लॅन
  • भारतासह जगभरात दहशतवादी कारवायांचे ट्रेनिंग
  • महिला दहशतवाद्यांसाठी “दौरा-ए-तस्किया” नावाचा प्रारंभिक अभ्यासक्रम
Masood Azhar viral recording:   पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद संघटनेने महिलांची भरती करण्यासाठी एक नवा प्लॅन केला आहे. या प्लॅनअंतर्गत जैश-ए-मोहम्मद संघटना आता महिलांची भरती करणार असून या महिला भरतीसाठी नवा ऑनलाईन कोर्सही सुरू करणार आहे. ही बातमी अद्याप ताजी असतानाच आता जैशचा म्होरक्या आणि कुख्यात दहशतवादी मौलाना मसूद अझहरचा एक ऑडियो समोर आला आहे. या ऑडियो त्याच्या भाषणाचा असून या भाषणात तो महिलांना दहशतवादी कारवायांसाठी कसे तयार करणार, त्यांना कसे प्रशिक्षण देणार, यासंबंधीची माहिती देत आहे.

हिंदी वृत्तवाहिनी ABP Newsला मसूद अझहरच्या या भाषणाचे ऑडियो रेकॉर्डिंग मिळाले आहे. या वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, या भाषणात मसूद म्हणतो की, ज्याप्रमाणे माझी संघटना “दौरा-ए-तरबियत” नावाने पुरुषांना जिहादचे प्राथमिक प्रशिक्षण देते, त्याचप्रमाणे जैश-ए-मोहम्मद पहिल्या टप्प्यात बहावलपूरमधील मरकझ उस्मान-ओ-अली येथे “दौरा-ए-तस्किया” नावाच्या प्रशिक्षण कार्यक्रमासह जमात-उल-मोमिनत या महिला ब्रिगेडमध्ये सामील होणाऱ्या महिलांना प्रदान करेल.

Jaish-E-Mohammad : जैश-ए- मोहम्मदचा दहशतवादी बनण्यासाठी करावा लागणार कोर्स; मसूद अझहरने तयार केला अभ्यासक्रम

दरम्यान, जैश-ए-मोहम्मद गेल्या २० वर्षांपासून पुरुष दहशतवाद्यांना “दौरा-ए-तरबियत” नावाचा १५ दिवसांचा प्रारंभिक प्रशिक्षण कार्यक्रम देत आहे. हा प्रशिक्षण कार्यक्रम नव्याने भरती झालेल्या पुरुष दहशतवाद्यांचे ब्रेनवॉश करणे, भारताविरुद्ध जिहाद छेडणे स्वर्ग मिळविण्यासाठी आवश्यक आहे, याची प्रेरणा देण्यासारखे काम करते. जैश-ए-मोहम्मदचा नेता, दहशतवादी मसूद अझहर याने पुढील महिन्यात बहावलपूरमध्ये महिला ब्रिगेडमध्ये सामील होणाऱ्या महिला दहशतवाद्यांसाठी “दौरा-ए-तस्किया” नावाचा प्रारंभिक अभ्यासक्रम सुरू करण्याची घोषणा केली आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमात, महिलांना जिहादसाठी प्रवृत्त केले जाईल आणि मृत्यूनंतर स्वर्गाची स्वप्ने दाखवली जातात.

आपल्या २१ मिनिटांच्या भाषणात, मसूद अझहरने जैश-ए-मोहम्मदच्या महिला ब्रिगेडची स्थापना करण्यामागील कारणे देखील स्पष्ट केली. तो म्हणतो की, त्यांच्या मुख्यालयात दहशतवादी अभ्यासक्रमाचा पहिला टप्पा पूर्ण करणाऱ्या महिलांना “दौरा आयत-उल-निसाह” नावाचा दुसरा टप्प्यातील प्रशिक्षण दिले जाईल. या दरम्यान, त्यांना धार्मिक ग्रंथांमध्ये महिलांना जिहाद छेडण्याच्या सूचना कशा आहेत हे शिकवले जाईल.

जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या शत्रूंनी हिंदू महिलांना सैन्यात आणि महिला पत्रकारांना त्यांचा सामना करण्यासाठी तैनात केले आहे.” त्यामुळे आता जैशला देखील शत्रू महिलांचा सामना करण्यासाठी सुसज्ज करावे लागेल. जैश-ए-मोहम्मदचे पुरुष दहशतवादी जैश-ए-मोहम्मदच्या या महिला ब्रिगेडसोबत उभे राहतील. या महिला ब्रिगेडच्या महिला दहशतवादी जगभर इस्लामचा प्रसार करतील.

Russia Ukraine War : ‘व्यर्थ चर्चा…’ ; ट्रम्प यांनी पुतिनसोबतची बुडापेस्ट बैठक केली रद्द? काय आहे कारण?

महिला दहशतवादी त्यांच्या कुटुंबियांना फोन करणार नाहीत

पाकिस्तानमध्ये महिला दहशतवाद्यांचे नेटवर्क वाढवण्यासाठी, पाकिस्तानच्या प्रत्येक जिल्ह्यात जमात-उल-मोमिनतची शाखा उघडली जाई. संपूर्ण पाकिस्तानमध्ये जैशच्या महिला ब्रिगेडचा विस्तार केला जाईल. जिल्हा व्यवस्थापक म्हणून एका महिलेची नियुक्ती केली जाईल, जी तिच्या जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिलांना जैश-ए-मोहम्मदशी जोडेल. दहशतवादी मसूद अझहरने जैशच्या महिला ब्रिगेडमध्ये सामील होणाऱ्या महिलांवरही निर्बंध लादत संघटनेत सामील होणाऱ्या महिलांना त्यांच्या पती आणि कुटुंबातील सदस्यांव्यतिरिक्त इतर कोणत्याही पुरुषाशी मेसेंजरद्वारे कॉल करण्याची किंवा संवाद साधण्याची परवानगी दिली जाणार नाही.

दहशतवादी मसूद अझहरने जैश-ए-मोहम्मदच्या महिला ब्रिगेडची कमांड त्याची बहीण सादिया अझहरला दिली होती. त्यानंतर २ या महिला ब्रिगेडमध्ये दहशतवादी मसूदची दुसरी बहीण समायरा अझहर आणि पुलवामा दहशतवादी हल्ला करणारा आणि भारतीय सैन्याशी झालेल्या चकमकीत मारला गेलेला दहशतवादी उमर फारूकची पत्नी आफीरा फारूक यांचाही समावेश करण्यात आला. महिलांना जैश-ए-मोहम्मदमध्ये सामील होण्यासाठी प्रेरित करण्यासाठी ते दररोज ऑनलाइन वर्ग आयोजित करतील. एबीपी न्यूजच्या वृत्ताला दुजोरा देत, जैश-ए-मोहम्मदने एक नवीन पोस्टर जारी केले आहे. यात, दहशतवादी मसूद अझहरची बहीण, उम्मा मसूद, जिचे खरे नाव समायरा अझहर आहे, ती २५ ऑक्टोबरपासून आठवड्यातून पाच दिवस ऑनलाइन वर्ग आयोजित केले जातील. २१ ऑक्टोबरच्या पोस्टरमध्ये, जैश-ए-मोहम्मदने उम्मा मसूद उर्फ ​​समायरा अझहरचे नाव घेतले नव्हते.

ऑडिओ रेकॉर्डिंगमध्ये मसूद अझहरने म्हटले आहे की, ज्यांचे पती भारतीय लष्कराशी झालेल्या चकमकीत मारले गेल, अशा चार ते पाच महिलादेखील जमात-उल-मोमिनतमध्ये सामील झाल्या आहेत. या महिला दर महिन्याला जैशच्या महिला शाखेशी संबंधित महिला दहशतवाद्यांना प्रेरणा देतील. या विशेष मोहिमेचे नाव “शोभा-ए-दावत” ठेवले आहे. त्याने जैशच्या महिला दहशतवाद्यांना त्याचे पुस्तक “अ मुस्लिम सिस्टर” वाचण्याचा सल्लाही दिला आहे.

 

 

Web Title: Big planning against india big revelation from terrorist masood azhars audio recording

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 27, 2025 | 02:14 PM

Topics:  

  • Pakistan Attack
  • Terrorist Activities

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.