Russia Ukraine War : 'व्यर्थ चर्चा…' ; ट्रम्प यांनी पुतिनसोबतची बुडापेस्ट बैठक केली रद्द? काय आहे कारण? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Trump and Putin Meet : वॉशिंग्टन : एक मोठी बातमी समोर आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिरी पुतिन (Vladimir Putin) यांच्यासोबतची आगामी बैठक रद्द केली आहे. ही बैठकी बुडापेस्टमध्ये होणार होती, परंतु आता ती पुढे ढकलण्यात आली आहे. ट्रम्प यांनी स्वत: यामागाचे कारण स्पष्ट करत त्यांना वेळ वाया घालवायचा नसल्याचे म्हले आहे. सध्या त्यांच्या या निर्णयाने सर्वत्र खलबळ उडाली आहे. गेल्या तीन वर्षाहून अधिक काळ रशिया युक्रेन युद्ध सुरु असून हा निर्णय हे युद्ध थांबवण्याठीच्या प्रयत्नांना धक्का पोहोचवणारे आहे.
तालिबानला मान्यता देणार का भारत? काबूलमध्ये दुतावास पुन्हा सुरु झाल्याने चर्चांना उधाण
व्हाइट हाऊसने जारी केलेल्या अधिकृत निवेदनानुसार, डोनाल्ड ट्रम्प पुतिनसोबत व्यर्थ बैठक करु इच्छित नाहीत. त्यांना वेळ वाया घालवणारी चर्चा टाळायचा आहे. ट्रम्प यांनी हे विधान अशा वेळी केले आहे , जेव्हा रशिया आणि युक्रेन युद्ध (Russia Ukriane War) तीव्र होत चालले असून आंतरराष्ट्रीय स्तरावर हे थांबण्यासाठी मागणी केली जात आहे. मात्र अद्याप यावर कोणताही तोडगा निघालेला नाही.
शिवाय ट्रम्प आणि पुतिन यांची बैठक रद्द होण्यापूर्वी रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लाव्हरोव आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांचीही बैठकी रद्द करण्यात आली होती. या बैठकीत दोन्ही राष्ट्रांध्यक्षांच्या भेटीच्या तयारीवर चर्चा होणार होती. परंतु ही भेटही रद्द झाली. अमेरिकेने म्हटले की, रुबियो आणि लाव्हरोव यांच्या संवाद सुरु राहिला आणि यामुळेच ट्रम्प यांना पुतिन यांच्या तातडीने भेट घेण्याची आवश्यतचा नाही.
दरम्यान याच वेळी रशियाच्या क्रेमलिनच्या प्रवक्त्या दिमित्री पेस्कोव्ह यांनी देखील याबद्द माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, बैठकीसाठी कोणतेही वेळापत्रक निश्चित करण्यात आलेले नव्हते. सध्या यासाठी योग्य तयारीची आवश्यकता आहे. ट्रम्प यांनी गेल्या आठड्यात बुडापेस्टमध्ये पुतिनसोबत बैठक घेण्याचे जाहीर केले होते, परंतु आता ही बैठक स्थगित करण्यात आली आहे.
यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन यांनी अलास्कामध्ये भेट घेतली होती. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये युक्रेन युद्ध समाप्तावरी चर्चा झाली. पण बैठकीत कोणताही ठोस निकाल लागला नाही. यामुळेच ट्रम्प यांनी अलास्कामधील अयशस्वी बैठकीच्या पार्श्वभूमीवर अगामी चर्चा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परंतु ही बैठक स्थगित होणे युक्रेनसाठी धोकादायक ठरु शकते. सध्या रशिया आणि युक्रेन युद्ध तीव्र होत चालले आहे.
याशिवाय नुकतेच ट्रम्प यांनी युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की (Volodymyr Zelensky) यांची देखील भेट घेतली होती. यावेळी त्यांनी युक्रेनला रशियाच्या अटी मान्य करण्यास सांगितले. रशियाने युक्रेनच्या डेनबोस प्रदेशाची मागणी केली आहे. पण याला झेलेन्स्कींना नकार दिली आहे. सध्या या सर्व घडामोडी रशिया युक्रेन युद्ध थांबवण्याच्या प्रयत्नांना धक्का पोहचवणाऱ्या आहेत.
FAQs(संबंधित प्रश्न)
प्रश्न १. डोनाल्ड ट्रम्प यांनी का केली पुतिनसोबतची आगामी बैठक?
ट्रम्प यांच्या मते, पुतिनसोबत चर्चा करणे व्यर्थ वेळ घालवणे आहे आणि ट्रम्प यांना वेळ वाया घालवणारी कोणतीही चर्चा करायची नाही. यामुळे ट्रम्प यांनी पुतिनसोबतची बैठक रद्द केली आहे.
प्रश्न २. कुठे होणार होती ट्रम्प-पुतिन भेट?
ट्रम्प आणि पुतिन यांच्यात आगामी बैठक ही बुडापेस्टमध्ये होणार होती.
प्रश्न ३. रशिया युक्रेन युद्ध किती काळापासून सुरु आहे?
गेल्या तीन वर्षाहून अधिक काळापासून रशिया आणि युक्रेन युद्ध सुरु आहे.
America Shutdown : २२ दिवसानंतरही अमेरिकेत शटडाऊन ; सामान्यांच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम