Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अमेरिकेत बिश्नोई गॅंगच्या दोन कुख्यात गुंडांना अटक; भारतात प्रत्यार्पणाची तयारी सुरु

Bishnoi gang member Arrested : भारताच्या दोन कुख्यात गुंडाना अमेरिका आणि जॉर्जियात अटक करण्यात आली आहे. भारताच्या सुरक्षा यंत्रणेला मोठे यश मिळाले आहे. या दोन्ही गुडांवर अनेक गुन्हे दाखल आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 09, 2025 | 02:42 PM
Bishnoi gang member Bhanu Rana, Venkatesh Garg India's wanted gangsters arrested in US, Georgia

Bishnoi gang member Bhanu Rana, Venkatesh Garg India's wanted gangsters arrested in US, Georgia

Follow Us
Close
Follow Us:
  • भारताच्या सुरक्षा यंत्रणेला मोठे यश
  • दोन कुख्यात गुंडांना अटक
  • बिश्नोई गॅंगशी आहे संबंध

International News in Marathi : नवी दिल्ली : एक मोठी बातमी समोर आली आहे. भारताच्या सुरक्षा यंत्रणेला मोठे यश मिळाले आहे. हरियाणा पोलिस आणि इतक काही संस्थांनी मिळून दोन कुख्यात गुंडांना अटक केली आहे. या दोन्ही गुंडांचा लॉरेन्स बिश्नोई (Lawrence Bishnoi) गॅंगशी संबंध असल्याचा सांगितले जात आहे.

अमेरिकेत लॉरेन्स बिश्नोईच्या जवळच्या गँगस्टर हॅरी बॉक्सरवर गोळीबार; गोदारा गँगने घेतली जबाबदारी

भारताच्या संरक्षण यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, वेंकटेश गर्ग याला जॉर्जियामधून तर भानू राणा याला अमेरिकेतून अटक करण्यातआली आहे. या दोघांच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. लवकरच त्यांनी भारतात डिपोर्ट केले जाईल.

परदेशात भारताचे अनेक गुंड

सध्या भारतातील अंदाजे दोन डझनपेक्षा जास्त गुंड परदेशात लपून बसलेले आहे. परदेशातून त्यांचा गुन्हेगारीचा सिंडिकेट चालवत आहे. यामध्ये गोल्डी बराड, कपिल सांगवान, अनमोल बिश्नोई, हैरी बॉक्सर, आणि हिमांशु भाऊ या कुख्यात गुंडाचा समावेश आहे. हे गुंड पोर्तुगाल, कॅनडा, अमेरिका, इंग्लंड आणि यूएई यांसारख्या देशात राहून भारतात गुन्हेगारीचे जाळे पसरवत आहे. सोशल मीडिया द्वारे त्यांच्या गटात लोकांची भरती केली जात आहे.

वेंकटेश गर्ग 

वेंकटेश गर्ग हा हरियाणाचा नारायणगडचा रहिवासी आहे. त्याच्यावर हत्या, लूटमार आणि खंडणी यांसारखे अनेक गुन्ह्यांची प्रकरणे दाखल करण्यात आली आहेत. वेंकटेश गुरुग्राम येथील बसपा नेत्याच्या हत्येच्या प्रकरणातही आरोपी आहे. या प्रकरणानंतर वेंकटेशने खोट्या पार्सपोर्टवर भारतातून पळ काढला होता आणि नंतर जॉर्जियात स्थायिक झाला. तपास यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, वेंकटेश जॉर्जियातून टोळीत शूटर्सची भरती करत होता. वेंकटेश गर्ग आणि कपिल सांवान दोघे मिळून आपला खंडणीचा व्यवसाय देखील चालवत होते.

भानू राणा

दुसरीकडे भानू राणा हा हरियाणाच्या करनालचा रहिवासी आहे. त्याचा कुख्यात बिश्नोई गॅंगशी संबंध असल्याची माहिती समोर आली आहे. राणा बिश्नोई गॅंगला शस्त्र पुरवठा करण्याचे काम करत होता. हरियाणा पोलिसांनी राणाला
बेकायदेशीर शस्त्र विकानाता रंगेहाथ अटक केली. राणाचे नेटवर्क हरियाणा, पंजाब आणि दिल्लीपर्यंत असल्याचे सांगितले जाते. त्याच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत.

भारताला या दोन कुख्यात गुंडाच्या अटकेमुळे मोठे यश प्राप्त झाले आहे. तसेच यामुळे परदेशातून भारतात चालवल्या जाणाऱ्या गुन्हेगारीला काहीसा आळा नक्कीच बसेल.

Lawrence Bishnoi : तुरुंगात लॉरेन्स बिश्नोईची मुलाखत कशी घेतली गेली? सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित केला प्रश्न

Web Title: Bishnoi gang member bhanu rana venkatesh garg indias wanted gangsters arrested in us georgia

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 09, 2025 | 02:25 PM

Topics:  

  • World news

संबंधित बातम्या

America Shutdown : अमेरिकेत शटडाऊनमुळे हवाई सेवेवर मोठा परिणाम ; दोन दिवसांत हजारो उड्डाणे रद्द
1

America Shutdown : अमेरिकेत शटडाऊनमुळे हवाई सेवेवर मोठा परिणाम ; दोन दिवसांत हजारो उड्डाणे रद्द

दहशतवादी म्हणून घोषित केलेल्याचे स्वागत करत आहे अमेरिका; ट्रम्पही घेणार भेट, काय आहे प्रकरण?
2

दहशतवादी म्हणून घोषित केलेल्याचे स्वागत करत आहे अमेरिका; ट्रम्पही घेणार भेट, काय आहे प्रकरण?

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अंगोलाच्या दौऱ्यावर ; भारत-आफ्रिकेतील भागीदारी मजबूत करण्याचा उद्देश
3

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अंगोलाच्या दौऱ्यावर ; भारत-आफ्रिकेतील भागीदारी मजबूत करण्याचा उद्देश

Pakistan संपणार! ‘हा’ देश करणार भयानक हल्ला? ISI सह सरकारची उडाली झोप
4

Pakistan संपणार! ‘हा’ देश करणार भयानक हल्ला? ISI सह सरकारची उडाली झोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.