Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Switzerland Glacier Collapse : हिमकडा कोसळला, अख्खं गाव मलब्यात बुडालं; तरीही बचावले गावकरी, पाहा भयावह VIDEO

स्वित्झर्लंडच्या आल्प्स पर्वतरांगांतील एका सुंदर गावावर निसर्ग कोपला. बिर्च हिमनदीतील कडा या गावावर कोसळला. लाखो घनमीटर बर्फ, दगड व गाळ एक क्षणात डोंगरावरून खाली आला आणि संपूर्ण ब्लाटेन गाव बघता बघता मलब्यात गायब झालं.

  • By संदीप गावडे
Updated On: May 30, 2025 | 06:09 PM
हिमकडा कोसळला, अख्खं गाव मलब्यात बुडालं; तरीही बचावले गावकरी, पाहा भयावह VIDEO

हिमकडा कोसळला, अख्खं गाव मलब्यात बुडालं; तरीही बचावले गावकरी, पाहा भयावह VIDEO

Follow Us
Close
Follow Us:

स्वित्झर्लंडच्या आल्प्स पर्वतरांगांतील एका सुंदर गावावर निसर्ग कोपला. बिर्च हिमनदीतील कडा या गावावर कोसळला. लाखो घनमीटर बर्फ, दगड व गाळ एक क्षणात डोंगरावरून खाली आला आणि संपूर्ण ब्लाटेन गाव बघता बघता मलब्यात गायब झालं. 29 मे रोजी स्वित्झर्लंडमधील व्हिलरनजीक ही दुर्घटना घडली. दृश्य इतकं भयावह होतं की गावातील उरलेली काही घरे देखील नंतर पुरात वाहून गेली. शास्त्रज्ञांनी यामागे हवामान बदलाचे दुष्परिणाम असल्याचे संकेत दिले आहेत.

Breaking: पाकिस्तानमध्ये पुन्हा भूकंप! झटक्यामुळे लोकांमध्ये पसरली दहशत

या घटनेमुळे संपूर्ण गावाचा नकाशाच बदलून गेला आहे. सुदैवाने, भूस्खलनाची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने मे महिन्याच्या सुरुवातीलाच 300 रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलवले होते. मात्र, 64 वर्षीय एक व्यक्ती अद्याप बेपत्ता असून मोठ्या प्रमाणात गाळ असल्यामुळे शोधमोहिमेला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे.

🚨 Switzerland: Blatten declares ‘special situation’ as glacier collapses 👀

More info below…pic.twitter.com/ZwaSruAcRe

— Volcaholic 🌋 (@volcaholic1) May 28, 2025

गंभीर बाब म्हणजे गाळ व दगडांचे मोठे ढीग जवळपास दोन किलोमीटर अंतरापर्यंत नदीच्या प्रवाहात अडथळा निर्माण करत आहेत. यामुळे लोंजा नदीचा प्रवाह थांबून मोठे जलाशय तयार झाले असून, पाण्याची पातळी ताशी 80 सेंटीमीटरने वाढत आहे. जर हे पाणी अचानक सखल भागात आलं तर आणखी एक मोठी दुर्घटना घडू शकते.व्हालेस कॅंटनचे सुरक्षा विभागप्रमुख स्तेफान गॅंझर यांनी सांगितले की, या संकटामुळे फर्डेन धरणाला देखील धोका आहे. मात्र, ते सध्या रिकामे करण्यात आले असून, अशा आपत्कालीन परिस्थितीत पाण्याचा झटका झेलण्यासाठी तयार आहे.

स्वित्झर्लंडच्या राष्ट्रपती करिन केलर-सटर यांनी आयर्लंडमधील उच्चस्तरीय चर्चासत्रातून आपला दौरा रद्द करून, या ठिकाणी शुक्रवारपासून भेट देणार असल्याचे जाहीर केले आहे. स्विस लष्कराने मदत कार्यासाठी 50 जवान, पाण्याचे पंप, खोदकाम यंत्रसामग्री सज्ज ठेवली आहे. गावातील गुरेढोरे देखील हेलिकॉप्टरच्या साहाय्याने हलवण्यात येत आहेत.

ब्लाटेन गावातील एक महिला म्हणाली, “मी काल सगळं गमावलं. मला आता काही बोलायचं नाही.” तिच्या डोळ्यांतील शून्यता गावाच्या उद्ध्वस्त अवस्थेला दर्शवत होती. दुसरीकडे, सांस्कृतिक अभ्यासक वर्नर बेलवाल्ड यांनी सांगितले की, “1654 साली बांधलेलं आमचं घर या गाळाखाली नाहीसं झालं आहे. आता तिथे काहीही उरलेलं नाही.”या दुर्घटनेमागे हवामान बदलाचे स्पष्ट संकेत आहेत, असे स्वित्झर्लंडच्या ग्लेशियर मॉनिटरिंग विभागाचे प्रमुख मॅथियस हुस यांनी सांगितले. त्यांनी नमूद केले की, “ज्या ठिकाणी शेकडो वर्षांपासून काहीच घडलं नव्हतं, तिथे आता अनपेक्षित घटना घडत आहेत. ही निसर्गाची चेतावणी आहे.”

दक्षिण कोरियात विमान दुर्घटना ; नौदलाचे पी-३ जेट कोसळल्याने उडाली खळबळ

ब्लाटेन गावावर आलेल्या या आपत्तीने केवळ निसर्गाच्या ताकदीची झलक दाखवली नाही, तर हवामान बदलामुळे येणाऱ्या संभाव्य संकटांचीही जाणीव करून दिली आहे. आता या भागात पुन्हा जीवन सुरळीत होईल का, हे येणारा काळच ठरवेल. पण सध्या संपूर्ण स्वित्झर्लंड एक दु:खद धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न करत आहे.

Web Title: Blatten village buried under ice and debris after glacier collapse in switzerland watch video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2025 | 05:35 PM

Topics:  

  • glaciers
  • Landslide News
  • Melting glaciers

संबंधित बातम्या

उंच उंच पर्वत, खळखळणारे धबधबे, हिरवीगार पठारं, पर्यटकांची पहिली पसंती; तरीही उत्तराखंडमधील ५ जिल्हे का आहेत धोकादायक?
1

उंच उंच पर्वत, खळखळणारे धबधबे, हिरवीगार पठारं, पर्यटकांची पहिली पसंती; तरीही उत्तराखंडमधील ५ जिल्हे का आहेत धोकादायक?

ढगफुटीत उद्ध्वस्त झालेलं उत्तराखंडमधील धराली गाव नक्की कसं आहे? लोखो पर्यटकांचं का आहे आवडतं ठिकाण?
2

ढगफुटीत उद्ध्वस्त झालेलं उत्तराखंडमधील धराली गाव नक्की कसं आहे? लोखो पर्यटकांचं का आहे आवडतं ठिकाण?

उत्तरकाशीतील दुर्घटनेत भारतीय सैन्याचे १० जवान बेपत्ता; हेलिपॅड, लष्करी छावणीचंही नुकसान
3

उत्तरकाशीतील दुर्घटनेत भारतीय सैन्याचे १० जवान बेपत्ता; हेलिपॅड, लष्करी छावणीचंही नुकसान

उत्तरकाशीत मोठी दुर्घटना; ढगफुटी नंतर गावावर कोसळली दरड, २० सेकंदात सर्वकाही उदध्वस्त
4

उत्तरकाशीत मोठी दुर्घटना; ढगफुटी नंतर गावावर कोसळली दरड, २० सेकंदात सर्वकाही उदध्वस्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.