भूकंपाच्या धक्क्याने पाकिस्तान पुन्हा हादरले (फोटो सौजन्य - iStock - फोटो प्रातिनिधिक आहेत)
पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.२ इतकी मोजण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वीही पाकिस्तानमध्ये जोरदार भूकंपाचे धक्के जाणवले होते. शुक्रवारी झालेल्या तीव्र भूकंपाच्या धक्क्यांची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.२ इतकी होती. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या मते, पाकिस्तानमध्ये दुपारी १:३७ वाजता भूकंप झाला.
भूकंपाचे केंद्र किती खोलीवर होते? असा प्र्श्न ज्यांना पडला असेल त्यांच्यासाठी ही माहिती आहे की, भूकंपाचे केंद्र जमिनीपासून १८० किलोमीटर खोलीवर होते. सध्या कोणत्याही प्रकारच्या नुकसानीची माहिती मिळालेली नाही. तथापि, भूकंपाचे धक्के जाणवताच लोक घराबाहेर पडले होते (फोटो सौजन्य – iStock)
एका आठवड्यात चार वेळा भूकंप
या आठवड्यात पाकिस्तानमध्ये पृथ्वी हादरण्याची ही चौथी वेळ आहे. यापूर्वी गुरुवारी ४.४ रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. मंगळवारी (२७ मे) संध्याकाळी ७:३० वाजता पाकिस्तानच्या फैसलाबाद विभागात ४.२ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. गेल्या महिन्यातही देशात अनेक भूकंप झाले आहेत, जे एकामागून एक आले आहेत. मे महिन्यात देशातील हा चौथा भूकंप आहे. या घटनांमध्ये कोणत्याही प्रकारचे नुकसान किंवा दुखापत झाल्याचे वृत्त नाही.
Earthquake : पुन्हा जाणवले भूकंपाचे धक्के, पाकिस्तान आणि ग्रीसमध्येही हादरली जमीन, मध्यरात्री घबराट
एएनआयने केले ट्विट
An earthquake with a magnitude of 4.2 on the Richter Scale hit Pakistan at 01:37 IST: National Centre for Seismology pic.twitter.com/bAEUOUMD5U
— ANI (@ANI) May 30, 2025
पाकिस्तानमध्ये भूकंपांची मालिका
१२ मे रोजी पाकिस्तानच्या बलुचिस्तानची राजधानी क्वेट्टा येथे ४.९ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. राष्ट्रीय भूकंप देखरेख केंद्र (NSMC) नुसार, क्वेट्टा आणि आसपासच्या भागात ४.९ रिश्टर स्केलच्या भूकंपाचे धक्के जाणवले. पाकिस्तान हा जगातील सर्वात भूकंपाच्या दृष्टीने सक्रिय देशांपैकी एक आहे, ज्यामध्ये अनेक प्रमुख भूगर्भीय फॉल्ट रेषा आहेत. परिणामी, पाकिस्तानमध्ये वारंवार भूकंप होतात आणि ते विनाशकारी असू शकतात.
भूकंपाच्या सलग धक्क्यांनी हादरली जमीन; अफगाणिस्तान, चीन, तुर्की व पाकिस्तानमध्ये भूकंप
पाकिस्तानमध्ये भूकंप का होतात?
पाकिस्तान हा हिमालयीन प्लेट आणि युरेशियन प्लेटच्या टक्कर क्षेत्रात येणाऱ्या देशांपैकी एक आहे. येथे अनेक गंभीर फॉल्ट रेषा (जसे की बलुचिस्तान फॉल्ट झोन, काराकोरम फॉल्ट) आहेत. या भागात पृथ्वीच्या टेक्टोनिक क्रियाकलाप जास्त आहेत, ज्यामुळे अनेकदा भूकंप होतात. पाकव्याप्त काश्मीरमध्ये २००५ मध्ये ७.६ रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता, ज्यामुळे ८०,००० हून अधिक लोक मृत्युमुखी पडले होते. २०१३ मध्ये ७.७ रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता, ज्यामध्ये शेकडो लोक मृत्युमुखी पडले होते.
पाकिस्तानमधील आपत्ती व्यवस्थापन प्रणाली (एनडीएमए) दरवर्षी नवीन आव्हानांना तोंड देते. जेव्हा पायाभूत सुविधा कमकुवत असतात, सुविधा मर्यादित असतात आणि माहितीचा अभाव असतो तेव्हा भूकंपासारख्या आपत्ती अधिक धोकादायक बनतात.