ब्रॅम्प्टन शहरातील आंदोलकांवर ठेवले जाणार नियंत्रण ; कॅनडाच्या 'या' निर्णायाने खलिस्तानींना फुटला घाम
ओटावा: कॅनडामध्ये हिंदू समुदायांवर हिंसाचाराचे प्रमाण वाढले आहे. कही दिवसांपूर्वी कॅनडातील ब्रॅम्प्टन शहरात खलिस्तानी समर्थंकांनी मंदिंवर हल्ले करून मोठ्या प्रमाणात हिंसाचार घडवून आणला होता. यामुळे कॅनडातील भारतीय समुदायांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला. यानंतर भारतीय समुदायांवरील वाढते हल्ले लक्षात घेता कॅनडा सरकारने आता मोठा निर्णय घेतला आहे. कॅनडाच्या सरकारने कठोर पावले उचलत एक नवा कायदा लागू केला आहे.
मोठ्या प्रमाणात दंड आकारण्यात येणार
या कायद्याअंतर्गत ब्रॅम्प्टन शहरातील कोणत्याही धार्मिक स्थळाच्या 100 मीटरच्या आत कोणत्याही व्यक्तीला आंदोलन करता येणार नाही. कॅनडाच्या या निर्णयामुळे खलिस्तानींना घाम फुटला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, या कायद्यांतर्गत, ब्रॅम्प्टन शहरातील धार्मिक स्थळाच्या बाहेर किंवा त्यापासून 100 मीटरपेक्षा कमी अंतरावर जर एखाद्या व्यक्तीने आंदोलन केल्यास त्या व्यक्तीला 500 डॉलर ते 1 लाख डॉलर इतका दंड आकारण्यात येणार आहे. तसेच त्या व्यक्तीवर आणखी कठोर कारवाई करण्यात येईल.
मंदिरात खलिस्तानींचा हिंंसक अत्याचार
मिळालेल्या माहितीनुसार, या कायद्याअंतर्गत स्थानिक पोलिसही आंदोलकर्त्यांवर कारवाई करू शकतात. या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी ते कठोर पाऊले उचलतील.मीडिया रिपोर्टनुसार, 3 नोव्हेबंर रोजी कॅनडातील ब्रॅम्प्टन शहरातील हिंदू सभा मंदिराबाहेर खलिस्तानवाद्यांनी हिंसक आंदोलन केले होते. याशिवाय त्यांनी मंदिराच्या आवारमध्ये घुसून मारामारीही केली होती. या आंदोलकांमध्ये पोलिस अधिकाऱ्याचा देखील समावेश होत्या. त्या अदिकाऱ्यावर कठोर कारवाई करत त्याला पदावरून निलंबित करण्यात आले होते.
फोटो सौजन्य: सोशल मीडिया
खलिस्तांनींच्या या हिंसक अत्याचारामुळे भारत संतप्त झाला होता. भारताने या प्रकरणाचा कडाडून विरोध केला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील ट्विट करबन या घटनेचा निषेध केला होता. यामुळे कॅनडाने त्यानंतर, दबावाखाली, ब्रॅम्प्टन शहराच्या सरकारने धार्मिक स्थळांबाहेर निदर्शनांवर बंदी घालणारा कायदा बिनविरोध मंजूर केला.
निज्जर हत्येप्रकरणी कॅनडाचे नवीन वक्तव्य
निज्जर हत्या प्रकरणी कॅनडाचे नवे वक्तव्य समोर आले आहे. निज्जर हत्याकांडात भारत सरकारची कोणतीही भूमिका नाही, असे कॅनडाच्या सरकारने म्हटले आहे. यासोबतच कॅनडाने ‘द ग्लोब अँड मेल’चा दावाही फेटाळून लावला. यामध्ये निज्जर हत्याकांडात भारताचे सर्वोच्च नेतृत्व सहभागी असल्याचे म्हटले होते.
मात्र आता कॅनडाने आपला आरोप मागे घेतला असून, निज्जर हत्याकांडात भारत सरकारची कोणतीही भूमिका नाही, असे कॅनडाच्या सरकारने म्हटले आहे. यासोबतच कॅनडाने ‘द ग्लोब अँड मेल’चा दावाही फेटाळून लावला, ज्यात निज्जर हत्याकांडात भारताचे सर्वोच्च नेतृत्व सहभागी असल्याचे म्हटले होते.