फोटो सौजन्य: सोशल मीडिया
गाझा: इस्त्रायल हमास-युद्ध आता वेगळे निर्णायक वळण घेत आहे. हमालसने केलेल्या दाव्यानुसार, त्यांच्या अल-कसाम ब्रिगेड सैनिकांनी उत्तर गाझातील बाट लाहिया शहरातील इस्त्रायलच्या भूदलाच्या युनिटवर हल्ला केला आहेत. हमासने दावा केला आहे की, या हल्ल्यांत 15 इस्त्रायली सैनिकांनी ठार करण्यात आले आहे. तसेच दुसरीकडे इस्त्रायलचे अध्यक्ष बेंजामिन नेतन्याहू यांना देखील अटक करण्यात आली आहे. यामुळे इस्त्रायलला मोठा झटका बसला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हमासने जबलिया कॅम्पच्या पश्चिमेकडील सफ्तावी भागाजवळ इस्रायलच्या मर्कावा रणगाड्यांवरही हल्ले केले आहेत. दुसरीकडे, इस्लामिक जिहादच्या अल-कुद्स ब्रिगेडनेही मोर्टार हल्ल्यांद्वारे इस्रायली सैनिकांना लक्ष्य केल्याचा दावा केला आहे. मात्र, इस्रायली लष्कराने याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
पंतप्रधान नेतन्यांहूंना अटक
दरम्यान, इस्रायलच्या पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यासाठी हा आणखी एक मोठा धक्का आहे. नेदरलँडच्या परराष्ट्रमंत्री वेल्डकॅम्प यांनी त्यांचा नियोजित इस्रायल दौरा रद्द केला आहे. आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाने (ICC) नेतन्याहू आणि माजी संरक्षण मंत्री योव गॅलंट यांच्यावर गाझामधील कथित युद्ध गुन्ह्यांशी संबंधित अरेस्ट वॉरंट जारी केल्यानंतर वेल्डकॅम्प यांनी हा निर्णय घेतला. वेल्डकॅम्प यांनी नेदरलँड्स ICC च्या निर्णयाचा आदर करत असल्याचे सांगितले आणि नेतन्याहू यांच्याशी सर्व अनावश्यक संपर्क तोडण्याची घोषणा केली. या घटनेमुळे नेतन्याहूंची आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्थिती अधिकच कमकुवत झाली आहे.
फोटो सौजन्य: सोशल मीडिया
इस्त्रायल-हमास युद्धात 44,000 हून अधिक लोकांचा बळी
इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाने आतापर्यंत 44,000 हून अधिक लोकांचा बळी घेतला आहे. गाझामधील आरोग्य अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या युद्धामुळे पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. 7 ऑक्टोबर 2023 रोजी हमासने इस्रायलवर मोठा हल्ला करत 1,200 इस्रायली नागरिकांना ठार केले आणि 250 हून अधिक लोकांना ओलीस धरले. या हल्ल्याच्या प्रत्युत्तरात इस्रायलने गाझावर व्यापक हल्ले सुरू केले. त्यामुळे गाझातील परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे.
नेतन्याहूंच्या अटक वॉरंटमुळे इस्रायलच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह
या युद्धामुळे लाखो लोकांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर संघर्ष थांबवण्यासाठी प्रयत्न सुरू असले तरी, परिस्थिती अद्यापही नियंत्रणाबाहेर आहे. नेतन्याहूंच्या अटक वॉरंटमुळे इस्रायलच्या नेतृत्वावर आणि त्यांच्या धोरणांवर मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे. या संपूर्ण घटनाक्रमाचा इस्रायल-हमास युद्धावर तसेच जागतिक राजकारणावर काय परिणाम होईल, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.