
Brazil ex-president Bolsonaro arrested
डोनाल्ड ट्रम्प यांच्या मित्राला नजरकैद; ब्राझीलच्या सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय, नेमकं प्रकरण काय?
मीडिया रिपोर्टनुसार, जैर बोल्सोनारो यांना २७ वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा होणार असून त्यांच्यावर देशात सत्तापालटाचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. बोल्सोनारो यांच्या जवळच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सध्या त्यांना ब्राझीलची राजधानी ब्राझिलियातील पोलिस मुख्यालयात ठेवण्यात आले आहेत. ब्राझीलच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ही कारवाई करत असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
बोल्सोनारो यांचा २०२२ च्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत पराभव झाला होता. पण त्यांनी सत्तेत टिकून राहण्यासाठी सत्तापालटाचा प्रयत्न केला, असा गंभीर आरोप ब्राझीलच्या सर्वोच्च न्यायालयाने केला आहे. न्यायालयाने असेही सांगितले की, यापूर्वी त्यांच्यावर लावण्यात आलेल्या निर्बंधांचे त्यांनी उल्लंघन केले आहे. यामुळे त्यांना यापूर्वी नजरकैदतही ठेवण्यात आले होते.यामुळे संपूर्ण देशात मोठी खळबळ उडाली होती. बोल्सोनारो यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फोटाळून लावले आहेत. त्यांच्या अटकेमुळे सध्या देशभरात मोठा गोंधळ सुरु आहे.
याशिवाय बोल्सोनारो यांच्यावर सुप्रीम कोर्टावर हल्ला करण्याचा कट रचल्याचा देखील आरोप करण्यात आला होता. तसेच विद्यमान राष्ट्रपती लुला डी सिल्वा व न्यायमूर्ती मोरायस यांच्या हत्येची योजना त्यांनी आखली होती, असे सरकारी वकिलांनी म्हटले होते. याशिवाय लष्कराच्या मदतीने निवडणुकीच्या निकालात हस्तक्षेपण केल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे. हे सर्व सत्तेत टिकून राहण्यासाठी करण्यात आले असल्याचे सरकारी वकिलांनी म्हटले आहे.
ट्रम्प यांच्या जवळचे मानले जातात बोल्सोनारो
दरम्यान बोल्सोनारो हे ट्रम्प यांचे जवळचे मित्र मानले जातात. जेव्हा त्यांना नजरकैदेत ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते, त्यावेळी डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. ट्रम्प यांनी न्यायालयाच्या निर्णयाला राजकीय सूड म्हटले होते. अद्याप त्यांच्या अटकेवर ट्रम्पकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. पण सध्या ब्राझीलच्या राजकारणात मोठा गोंधळ सुरु आहे.
Trump-Mamdani एकाच टेबलावर; राजकीय मतभेद विसरुन करणार एकत्र काम?
Ans: ब्राझीलमध्ये माजी राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो यांना अटक करण्यात आली आहे.
Ans: ब्राझीचे माजी राष्ट्राध्यक्ष यांच्यावर देशात सत्तापालटाचा प्रयत्न आणि सध्याचे अध्यक्ष लुला दी सिल्वा यांच्या हत्येचा कट रचल्याच्या आरोपाखाली अटक करण्यातआ ली आहे.