Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 6 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतीय तरुणीही पडली Epstein च्या छळाला बळी? नव्या कागदपत्रांमधील खुलाशाने जगभरात खळबळ

Jeffrey Epstein Files : जेफ्री एपस्टीनच्या प्रकरणाने जगभरात खळबळ उडाली आहे. त्याच्या कृत्याला केवळ जगभरातील अनेक मुली बळी पडल्या आहेत. यामध्ये एका भारतीय तरुणीचाही समावेश असल्याचे नव्या कागपत्रांमध्ये सांगण्यात आले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 17, 2026 | 12:17 PM
भारतीय तरुणीही पडली Epstein च्या छळाला बळी? नव्या कागदपत्रांमधील खुलाशाने जगभरात खळबळ
Follow Us
Follow Us:
  • भारतीय मुली देखील पडल्या Epstein च्या छळाला बळी
  • करोडोंमध्ये झाला सौदा
  • जागतिक स्तरावर खळबळ
Epstein Files Indian Victim :अमेरिकेतील कुख्यात लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टीन (Jeffrey Epstein) त्याच्या मृत्यूनंतरही चर्चेचा विषय ठरत आहे. त्याच्या लैंगिक तस्करीच्या काळ्या कृत्यांनी संपूर्ण जगाला हादरवून टाकले आहे. सध्या या कागपत्रांमधून एक नवा धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. या नव्या कागदपत्रांनुसार, एक भारतीय तरुणी देखील जेफ्रीच्या छळाला बळी पडली आहे. या खुलाशाने जगभरात खळबळ उडाली आहे.

आत्महत्या की राजकीय कट? Jeffrey Epstein च्या मृत्यूचं गूढ अखेर जगासमोर; नेमकं काय घडलं ‘त्या’ रात्री

भारतीय मुलीच्या शोधात अमेरिकन अधिकारी

नव्या कागदपत्रांनुसार, एपस्टीनच्या लैंगिक गुन्हेगारीला एक भारतीय तरुणी देखील बळी पडली होती. कागपत्रांनुसार, १३ जानेवारी २०२० मध्ये झालेल्या एका ई-मेलमधून, अमेरिकन अधिकारी या भारतीय मुलीचा शोध घेत असल्याचे दिसून आले. अमेरिकन अधिकारी व्हिक्टिम्स फंड द्वारे तरुणीचा शोध घेत होते.

या ई-मेलमध्ये भारतातील अमेरिकन दूतावासाला तरुणीचा पत्ता आणि संपर्क माहिती मिळवण्याचे आदेश देण्यात आले होते. न्यूयॉर्क क्राइम व्हिक्टिम्स कॉम्पेन्शनच्या माध्यमातून या तरुणीला नूकसान भरपाई आणि थेरपीच्या मदत करण्याचा प्रयत्न अमेरिकन अधिकारी करत होते. हा ई-मेल भारतातील अमेरिकन दूतावासाला २०१९ मध्ये एपस्टीनच्या मृत्यूनंतर पाठवण्यात आला होता.

ई-मेलमध्ये भारतीयांची नावे

ई-मेलमध्ये केवळ अमेरिकसह भारतातील अधिकाऱ्यांचीही नावे समोर आली आहे. बिल गेट्स (Bill Gates) आणि एपस्टीनमध्ये झालेल्या ५ जून २०१४ मधील ई-मेलनुसार भारतीय केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांच्या एपस्टीनशी भेटीचाही उल्लेख आहे. तसेच केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांच्याही एपस्टीनशी भेटीचा उल्लेख यामध्ये आढळून आला आहे.

याशिवाय भारतातील मोठ्या PR कंपनीचे प्रमोटर दिलीप चेरियन यांचेही या फाइल्समधझ्ये नाव समोर आले आहेत. एपस्टीनने दिलिप चेरियन याला भेटण्यासाठी २ एप्रिल २०१७ रोजी एक ई-मेल पाठवला होता. या ई-मेलमध्ये दिलीप पॅरिसमध्ये असताना जेफ्रीची भेट घेणार असल्याचा संदर्भ होता.

इतर काही मोठे खुलासे

याच वेळी १० जून २०१८ रोजीच्या एका ईमेलमध्ये झैद जेटलिने एपस्टीनशी भारतातील फेक न्यूज बद्दल चर्चा केली होती. तसेच भारतातील काही व्यक्ती परदेशी निधी असलेल्या कंपनींला ब्लॅकमेल करत असल्याचाही उल्लेख यामध्ये होता. याशिवाय ८ जुलै २०१० च्या ई-मेलमध्ये एका महिलेने प्रवासादरम्यान भारतीय व्यक्तीने तिच्यासोबत केलेल्या गैर आणि अश्लील वर्तनाची माहिती एपस्टीनला दिली असल्याचे दिसून आले आहे.  जेफ्री एफस्टीनच्या प्रकरणातील या खुलाशाने भारताच्या राजकीय वर्तुळात आणि जागतिक राजकारणातही सध्या मोठा गोंधळ सुरु आहे.

Jeffrey Epstein च्या काळ्या साम्राज्याची खरी ‘मास्टरमाईंड’? फाइल्स उघडताच ‘या’ महिलेच्या नावाने खळबळ

💡

Frequently Asked Questions

  • Que: एपस्टीन फाइल्समधून कोणता नवा खुलास झाला आहे?

    Ans: एपस्टीन फाइल्सअंतर्गत खुल्या झालेल्या नव्या कागपत्रांनुसार, एक भारतीय तरुणी देखील एपस्टीनच्या लैंगिक गुन्ह्याच्या जाळ्यात अडकली होती.

  • Que: अमेरिकन अधिकाऱ्यांनी भारतीय पीडितेच्या शोधासाठी काय पावले उचलली होती?

    Ans: अमेरिकन अधिकाऱ्यांनी व्हिक्टिम फंड द्वारे तरुणीला मदत करण्यासाठी भारतातील अमेरिकन दूतावासाला तिचा पत्ता आणि संपर्क मिळवण्याचे आदेश दिले होते.

Web Title: Jeffrey epstein files indian victim new documents revelation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 16, 2026 | 01:05 PM

Topics:  

  • America
  • Jeffrey Epstein
  • World news

संबंधित बातम्या

Sahara: सहारा वाळवंटात पुन्हा वाहणार नद्या? शास्त्रज्ञांनी शोधले 20,000 वर्षांचे रहस्य; वाळूच्या ढिगाऱ्यांखाली दडलंय साम्राज्य
1

Sahara: सहारा वाळवंटात पुन्हा वाहणार नद्या? शास्त्रज्ञांनी शोधले 20,000 वर्षांचे रहस्य; वाळूच्या ढिगाऱ्यांखाली दडलंय साम्राज्य

PoK Tension: शांततेच्या नावाखाली ISI चा भयंकर डाव; शांतता शिष्टमंडळात जैश-ए-मोहम्मदचा कमांडर इलियास काश्मिरी झाला सामील
2

PoK Tension: शांततेच्या नावाखाली ISI चा भयंकर डाव; शांतता शिष्टमंडळात जैश-ए-मोहम्मदचा कमांडर इलियास काश्मिरी झाला सामील

FCRA Amendment Bill: भारताच्या FCRA कायद्यातील बदलांवर अमेरिकेचा आक्षेप; ‘हा ख्रिश्चनांवर हल्ला’ म्हणत खासदाराचा इशारा
3

FCRA Amendment Bill: भारताच्या FCRA कायद्यातील बदलांवर अमेरिकेचा आक्षेप; ‘हा ख्रिश्चनांवर हल्ला’ म्हणत खासदाराचा इशारा

Brazil Quema Quimica : ब्राझीलमध्ये रासायनिक कारखान्यात भयानक स्फोट; आकाशात काळ्या धुराचे लोट, 30 गाड्या घटनास्थळी दाखल
4

Brazil Quema Quimica : ब्राझीलमध्ये रासायनिक कारखान्यात भयानक स्फोट; आकाशात काळ्या धुराचे लोट, 30 गाड्या घटनास्थळी दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.