Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Top International Headlines Today : पंतप्रधान मोदींना पुतिन यांच्याकडून आमंत्रण; रशियाच्या ‘विजय दिन’ परेडमध्ये होणार सहभागी?

International Breaking news live: आज 08 एप्रिल 2025 रोजी परदेशात घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडी इथे मिळतील. जगाशी संबंधित सर्व ब्रेकिंग न्यूजसाठी हे पेज रिफ्रेश करत रहा...

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Apr 09, 2025 | 06:38 PM
Breaking Latest World News International News Headlines Live updates News in marathi

Breaking Latest World News International News Headlines Live updates News in marathi

Follow Us
Close
Follow Us:

International breaking Live News Marathi : चीनमधून येणाऱ्या सर्व वस्तूंवर 104% कर लादण्याच्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयावर चीनचे पंतप्रधान ली केकियांग यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, चीन अशा परिस्थितींना तोंड देण्यासाठी पूर्णपणे तयार आहे आणि देश कोणत्याही प्रकारच्या नकारात्मक बाह्य प्रभावांना तोंड देण्यास सक्षम आहे. ली कियांग म्हणाले की, चीनच्या सध्याच्या आर्थिक धोरणांमध्ये या वर्षी उद्भवू शकणाऱ्या विविध अनिश्चितता पूर्णपणे लक्षात घेतल्या आहेत. ते म्हणतात की चीनने आपल्या आर्थिक योजनांमध्ये प्रत्येक परिस्थितीसाठी तयारी केली आहे, जेणेकरून कोणत्याही बाह्य संकटाचा किंवा आर्थिक धक्क्याचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार नाही. दिवसभरातील सर्व अपडेट्स खाली वाचा…

 

 

The liveblog has ended.
  • 09 Apr 2025 05:28 PM (IST)

    09 Apr 2025 05:28 PM (IST)

    पंतप्रधान मोदींना पुतिन यांच्याकडून आमंत्रण; रशियाच्या ‘विजय दिन’ परेडमध्ये होणार सहभागी?

    भारत-रशियामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून चांगले संबंध प्रस्थापित झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यात देखील मैत्रीचे दृढ संबंध आहेत. दरम्यान पंतप्रधान मोदींना रशियाकडून 80व्या विजय दिनाच्या परेडमध्ये सहभागी होण्याचे आमंत्रण मिळाले आहे. 1945च्या दुसऱ्या महायुद्धातील जर्मनीवरील विजयाच्या निमित्ताने हा दिवस रशियात साजारा केला जातो. यासाठी अनेक शेजारी आणि मित्र देशांच्या नेत्यांना आमंत्रण देण्यात आले आहे. ही माहिती रशियाचे उपपरराष्ट्र मंत्री आंद्रे रुडेन्को यांनी दिली. त्यांनी म्हटले की, मॉस्कोला आशा आहे की भारतीय पंतप्रधान 9 मे च्या परेडसाठी उपस्थित राहतील. दरम्यान भारताकडून यासंबंधित अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

  • 09 Apr 2025 04:05 PM (IST)

    09 Apr 2025 04:05 PM (IST)

    ट्रम्प यांच्या टॅरिफमुळे बाजार भुईसपाट; जागतिक व्यापारात मोठ्या मंदीची भीती

    1987 मध्ये ज्याप्रमाणे काळा सोमवार पहायला मिळाला होता तशाच काळा सोमवारचा इशारा समीक्षक जीम क्रॅमर यांनी दिला होता. त्यावेळी डाऊ जोन्स २२.६ टक्क्यांनी घसरला होता. तथापि सोमवार ७ एप्रिल रोजी टोकियो ते लंडन आणि न्यूयॉर्क ते मुंबई पर्यंतचे शेअर बाजार ज्याप्रकारे कोसळले ते भयावह होते. सेन्सेक्स आणि निफ्टी ३ टक्क्यांनी घसरले, परंतु हँगसेग १३.२ टक्के आणि निक्केईने त्यांचे बाजार भांडवल ८ टक्के गमावले. युरोपीयन स्टॉक आणि अमेरिकन फ्यूचर्सचीही वाईट अवस्था झाली.

    संपूर्ण प्रकरण वाचण्यासाठी येथे क्लिक करा

  • 09 Apr 2025 03:24 PM (IST)

    09 Apr 2025 03:24 PM (IST)

    नेतन्याहू यांना अटकेची भिती? 400 किमी प्रवास करुन पोहोचले अमेरिकेत

    डोनाल्ड ट्रम्प यांच्या परस्पर करांच्या निर्णयाचा परिणाम जगभरातील बाजारपेठांमध्ये दिसून येत आहे. भारतासह आशिया आणि अमेरिकेतील शेअर बाजार कोसळले आहेत. ५० हून अधिक देशांनी ट्रम्प यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे. दरम्यान इस्त्रायलचे पंतप्रधानही शुल्काच्या मुद्द्यांवर दिलासा मिळविण्यासाठी सोमवारी अमेरिकेत पोहोचले. दरम्यान, हंगेरीहून अमेरिकेला जाणाऱ्या उड्डाणादरम्यान नेतान्याहू यांचे विमान आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाच्या अटक वॉरंट लागू करू शकणाऱ्या देशांच्या हवाई हद्दीतून बाहेर पडण्यासाठी त्याच्या सामान्य मार्गापासून सुमारे ४०० किलोमीटर दूर गेले. यामुळे नेतन्याहू अटक वॉरंटला घाबरल्याची अटकळ बांधली जात आहे.

  • 09 Apr 2025 02:45 PM (IST)

    09 Apr 2025 02:45 PM (IST)

    भारतीय फार्मा सेक्टरला अमेरिकेचा झटका; ट्रम्प यांचा टॅरिफ सवलती रद्द करण्याचा इशारा

    सध्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफच्या मनमानी कारभारामुळे मोठा गोंधळ उडाला आहे. जगभरात व्यापार युद्ध सुरु झाले आहे. याच दरम्यान चीनवर देखील अतिरिक्त कर लादल 104% कर लागू केला आहे. दरम्यान ट्रम्प यांनी फार्मास्यूटिकल कंपन्यांना दिलेली सवलत लवकरच संपेल असे म्हटले आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयाचा फटाका सर्वात जास्त भारताला बसण्याची शक्यता आहे. कारण भारत मोठ्या प्रमाणात औषधे निर्यात करतो.

  • 09 Apr 2025 02:28 PM (IST)

    09 Apr 2025 02:28 PM (IST)

    ‘Kissing my ass..’, ट्रम्प यांचे वादग्रस्त वक्तव्य, काय आहे कारण?

    अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा आपल्या वादग्रस्त विधानांमुळे जागतिक राजकारणात खळबळ उडवली आहे. त्यांच्या टॅरिफ धोरणामुळे अनेक देश अडचणीत आले आहेत, आणि आता त्यांनी थेट अमेरिकेसोबत व्यापार करार करू इच्छिणाऱ्या देशांबद्दल अपमानास्पद वक्तव्य केले आहे. ट्रम्प म्हणाले, “जेव्हापासून मी टॅरिफची घोषणा केली आहे, तेव्हापासून अनेक देशांचे प्रमुख ‘किसिंग माय अस’ करण्यात व्यस्त आहेत.”

    संपूर्ण प्रकरण वाचण्यासाठी येथे क्लिक करा

  • 09 Apr 2025 01:12 PM (IST)

    09 Apr 2025 01:12 PM (IST)

    ‘Men Will Be Men… ‘ पीटर नवारो आणि एलोन मस्क यांच्यातील वादावर व्हाईट हाऊसची प्रतिक्रिया Viral

    अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणावरून टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलोन मस्क आणि त्यांचे माजी आर्थिक सल्लागार पीटर नवारो यांच्यात जोरदार वाद सुरू आहे. हा वाद इतका तीव्र झाला की मस्कने नवारोला थेट “मूर्ख” म्हटले, ज्यामुळे राजकीय आणि व्यावसायिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणावर व्हाईट हाऊसनेही प्रतिक्रिया दिली असून, “Men Will Be Men…” असे म्हणत या वादाकडे दुर्लक्ष करण्याचा सल्ला दिला आहे. व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या कॅरोलिन लॅविट यांनी हा वाद म्हणजे दोन व्यक्तींच्या वैयक्तिक मतभेदांचा मुद्दा असल्याचे स्पष्ट केले आहे.

    The White House is reacting to the feud between Elon Musk and President Trump's trade advisor Peter Navarro.

    “Obviously these are two individuals who have very different views on trade and tariffs. Boys will be boys and we will let their public sparring continue.”

    Musk in a X… pic.twitter.com/pPpe9LzTU2

    — Breanna Morello (@BreannaMorello) April 8, 2025

  • 09 Apr 2025 12:34 PM (IST)

    09 Apr 2025 12:34 PM (IST)

    चिनी सैन्याच्या हालचालीने जागतिक गोंधळ, VIDEO व्हायरल

    युक्रेन-रशिया युद्धाने आता नवे वळण घेतले असून, चीनही प्रत्यक्ष युद्धात सहभागी झाल्याचा धक्कादायक दावा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी केला आहे. त्यांनी पुरावा म्हणून डोनेत्स्क प्रदेशातून दोन चिनी सैनिकांना ताब्यात घेतल्याचे जाहीर केले आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी खळबळ उडाली असून, चीनच्या भूमिकेवर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

    Our military has captured two Chinese citizens who were fighting as part of the Russian army. This happened on Ukrainian territory—in the Donetsk region. Identification documents, bank cards, and personal data were found in their possession.

    We have information suggesting that… pic.twitter.com/ekBr6hCkQL

    — Volodymyr Zelenskyy / Володимир Зеленський (@ZelenskyyUa) April 8, 2025

    credit : social media

  • 09 Apr 2025 11:18 AM (IST)

    09 Apr 2025 11:18 AM (IST)

    टॅरिफवॉरमुळे ट्रम्प यांचा 'खास मित्र' नाराज

    जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आणि अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे मित्र एलोन मस्क यांच्यासाठी गेल्या आठवड्यातील घटना भयंकर ठरल्या. त्यांच्या इलेक्ट्रिक वाहन कंपनी टेस्लाच्या विक्रीत मोठी घट झाली, ट्रम्प प्रशासनाने नव्या टॅरिफची घोषणा केली, आणि त्यांच्या राजकीय गुंतवणुकीलाही मोठा धक्का बसला. या सर्व घटनांमुळे मस्क यांना एका आठवड्यात तब्बल ११ अब्ज डॉलर्सचे नुकसान सोसावे लागले.

  • 09 Apr 2025 10:44 AM (IST)

    09 Apr 2025 10:44 AM (IST)

    दुबईमध्ये दिसला जगातील दुर्मिळ निळा हिरा, तो घालणारी भाग्यवान महिला कोण?

    दुबईतील सोथेबीजमध्ये 10 कॅरेटचा एक अद्भुत निळा हिरा प्रदर्शनात ठेवण्यात आला आहे, ज्याची अंदाजे किंमत 20 दशलक्ष डॉलर्स आहे. हा हिरा दक्षिण आफ्रिकेचा आहे आणि तो सोथेबीज मिडल ईस्ट दुबईच्या उपाध्यक्षा कातिया नूनौ बोईस यांनी परिधान केला होता. अबू धाबी येथे हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते कारण या प्रदेशात हिऱ्यांमध्ये खूप रस आहे. कातिया 2008 पासून सोथेबीजमध्ये आहेत आणि त्यांनी कंपनीच्या अमिरातीमधील विस्तारात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

    🔴While Muslims starve all through the Arab & African world

    🔴While Jews desecrate and beat women in the blessed Al Aqsa Mosque

    🔴While israeli are beheading children

    🔴The uae is showcasing a 20 million dollar blue diamond stolen from South Africa pic.twitter.com/jEkmKfaYdo

    — shameen suleman (@shameensuleman) April 8, 2025

    credit : social media

  • 09 Apr 2025 10:30 AM (IST)

    09 Apr 2025 10:30 AM (IST)

    26/11 चा दोषी तहव्वुर राणाला आज भारतात आणण्याची तयारी

    मुंबईवरील 26/11 च्या भीषण दहशतवादी हल्ल्यातील प्रमुख आरोपी तहव्वुर हुसेन राणा याला अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पित करण्याच्या हालचाली अंतिम टप्प्यात पोहोचल्या आहेत. अमेरिकेतील न्यायालयाने त्याच्या प्रत्यार्पणाला मान्यता दिली असून, त्याला लवकरच भारतात आणण्यात येणार आहे. दिल्ली आणि मुंबईतील तुरुंगांमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

    #FPNews: On Wednesday, 26/11 mastermind Tahawwur Rana is expected to arrive in India, prompting two prisons—one in Delhi and another in Mumbai—to make specific arrangements in secret, in accordance with directives from the US judiciary regarding extradited individuals.… pic.twitter.com/9KvmqJoT8I

    — Firstpost (@firstpost) April 9, 2025

    credit : social media

  • 09 Apr 2025 09:59 AM (IST)

    09 Apr 2025 09:59 AM (IST)

    Donald Trump Tariffs: टॅरिफ तीन भागात विभागलेला आहे

    अमेरिकेने आता चीनमधून येणाऱ्या वस्तूंवर एकूण १०४ टक्के कर लादला आहे, जो तीन भागात विभागला गेला आहे. प्रथम, या वर्षाच्या सुरुवातीला २० टक्के कर लादण्यात आला. त्यानंतर, २ एप्रिल रोजी, 'परस्पर शुल्क' अंतर्गत आणखी ३४ टक्के कर लादण्यात आला. आता, डोनाल्ड ट्रम्प यांनी ५० टक्के नवीन कर जोडला आहे. या तिन्ही करांना एकत्रित करून एकूण कर १०४ टक्के झाला आहे, जो चीनमधून आयात केलेल्या वस्तूंवर लागू होईल.

    🚨Karoline Leavitt: "It was a mistake for China to retaliate. When America is punched, he punches back harder. That’s why there will be 104% tariffs going into effect on China tonight at midnight."

    LFG💪🔥 pic.twitter.com/ATFEJ0Z3cA

    — Derrick Evans (@DerrickEvans4WV) April 8, 2025

    credit : social media

Web Title: Breaking latest world news international news headlines live updates news in marathi nrhp 19

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2025 | 09:47 AM

Topics:  

  • Donald Trump
  • international news
  • World news

संबंधित बातम्या

Fact Check : निमिषा प्रियाला वाचवण्यासाठी जनतेकडून पैसा गोळा करतंय सरकार? परराष्ट्र मंत्रालयाने दिला धोक्याचा इशारा
1

Fact Check : निमिषा प्रियाला वाचवण्यासाठी जनतेकडून पैसा गोळा करतंय सरकार? परराष्ट्र मंत्रालयाने दिला धोक्याचा इशारा

कोण आहेत मार्क वॉरेन? ज्यांना रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी गिफ्ट दिली महागडी बाईक
2

कोण आहेत मार्क वॉरेन? ज्यांना रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी गिफ्ट दिली महागडी बाईक

राजकीय दबावापुढे न झुकता भारताने साधले हित, रशियाकडून कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर ५% सूट; तर अमेरिकेची नाराजी
3

राजकीय दबावापुढे न झुकता भारताने साधले हित, रशियाकडून कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर ५% सूट; तर अमेरिकेची नाराजी

Israel Gaza Plan : गाझामध्ये इस्रायलची मोठी लष्करी हालचाल; हमासविरोधी ५० हजार सैनिक तैनात
4

Israel Gaza Plan : गाझामध्ये इस्रायलची मोठी लष्करी हालचाल; हमासविरोधी ५० हजार सैनिक तैनात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.