
फोटो सौजन्य AI
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी BRICS देशांनी AI क्षेत्रात अधिक सहकार्य करण्याची गरज असल्याचे सांगितले. त्यासाठी चीनच्या नेतृत्वाखाली AI साठी ओपन-सोर्स प्लॅटफॉर्म किंवा ‘Open Source Zone’ विकसित करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.
या माध्यमातून BRICS देशांमधील संशोधक, कंपन्या आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील संस्थांना AI विकासासाठी एकत्र काम करण्याची संधी मिळू शकते. AI मॉडेल्स, डिजिटल पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञानातील ज्ञानाची देवाणघेवाण वाढवण्यावर चीनचा भर आहे.
Strait of Hormuz : आखातात पुन्हा तणाव! जहाजावर हल्ला; एकाचा मृत्यू, तेलपुरवठ्याची चिंता वाढली
चीनचा हा प्रस्ताव केवळ AIपुरता मर्यादित नसून डिजिटल उद्योग, व्यापार, उत्पादन आणि विज्ञान-तंत्रज्ञान सहकार्याशी जोडलेला आहे. शी जिनपिंग यांनी BRICS देशांमधील पुरवठा साखळी स्थिर आणि सुरळीत ठेवण्यावरही भर दिला.
BRICSचा विस्तार झाल्यानंतर या समूहात मोठी लोकसंख्या आणि मोठी बाजारपेठ निर्माण झाली आहे. त्यामुळे AI, डिजिटल सेवा आणि तंत्रज्ञान क्षेत्रात परस्पर सहकार्य वाढल्यास सदस्य देशांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक संधी मिळू शकतात.
चीनच्या AI प्रस्तावाकडे केवळ तंत्रज्ञान सहकार्य म्हणून पाहिले जात नाही . अमेरिका आणि चीन यांच्यात AI आणि सेमीकंडक्टर तंत्रज्ञानावर सुरु असलेल्या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर BRICS चा हा उपक्रम महत्वाचा ठरू शकतो . मात्र हा प्रकल्प अमेरिकेला थेट आव्हान देण्यासाठी आहे . असे अधिकृतपणे सांगण्यात आलेले नाही . BRICS मध्ये AI चा वापर विकास , डिजिटल अर्थव्यवस्था आणि तंत्रज्ञान सहकार्य वाढवण्यासाठी करण्यावर भर दिला जात आहे .
भारतानेही BRICS च्या माध्यमातून AI , तंत्रज्ञान आणि Global south च्या हितासाठी सहकार्य वाढवण्याची भूमिका मांडली आहे . त्यामुळे चीनचा हा प्रस्ताव प्रत्यक्षात किती वेगाने आकार घेतो आणि भारतासह इतर सदस्य देश त्यात किती सक्रिय सहभाग घेतात , हे आगामी काळात महत्वाचे ठरणार आहे .