Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sainte Anne : ख्रिसमसच्या आनंदावर शोककळा! ग्वाडेलूपमध्ये कारने गर्दीला चिरडले, 10 जणांचा मृत्यू; दुर्घटनेचं नेमकं कारण काय?

Car Into Crowd : फ्रेंच परदेशी प्रदेश असलेल्या ग्वाडेलूपमधील सेंट-अ‍ॅन येथे ख्रिसमसच्या तयारीदरम्यान एक भयानक अपघात घडला. शोएलचर स्क्वेअरवर एका कारने उत्सवी गर्दीला चिरडले.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Dec 06, 2025 | 01:24 PM
Car crushes crowd in Guadeloupe 10 people lost their lives What is the real cause of the accident

Car crushes crowd in Guadeloupe 10 people lost their lives What is the real cause of the accident

Follow Us
Close
Follow Us:
  1. फ्रेंच परदेशी प्रदेश असलेल्या ग्वाडेलूपमधील सेंट-अ‍ॅन येथील शोएलचर स्क्वेअरवर ख्रिसमसच्या तयारीसाठी जमलेल्या गर्दीवर एका कारने धडक दिली.
  2. या अपघातात किमान १० जणांचा मृत्यू झाला असून, १९ हून अधिक लोक जखमी झाले आहेत, त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे.
  3. दुर्घटनेच्या कारणाचा शोध घेण्यासाठी तात्काळ चौकशी सुरू झाली आहे. चालकाला वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीचा सामना करावा लागला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

Driver Medical Emergency : फ्रान्सच्या (France) परदेशी प्रदेश असलेल्या ग्वाडेलूपमध्ये ख्रिसमसच्या तयारीचे आनंदी आणि उत्साहाचे वातावरण एका क्षणात भीषण शोकात बदलले. सेंट-अ‍ॅन येथील प्रसिद्ध शोएलचर स्क्वेअरवर ही अत्यंत दुःखद घटना घडली. ख्रिसमसच्या कार्यक्रमांची तयारी सुरू असताना, अचानक एका भरधाव कारने नियंत्रण गमावले आणि ती थेट उत्सवासाठी जमलेल्या लोकांच्या गर्दीत घुसली. या हृदयद्रावक अपघातात किमान १० निष्पाप लोकांचा मृत्यू झाला असून, १९ हून अधिक लोक जखमी झाले आहेत. रेडिओ कॅराइब्स इंटरनॅशनल (RCI) ग्वाडेलूपनुसार, जखमींपैकी तिघांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. ही घटना टाउन हॉल आणि चर्चसमोर असलेल्या गजबजलेल्या शोएलचर स्क्वेअरवर घडली. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान, पॅरामेडिक्स आणि पोलिसांची मोठी फौज तात्काळ घटनास्थळी दाखल झाली आणि युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केले.

 अपघातामागे वैद्यकीय आपत्कालीन स्थिती?

अपघाताचे नेमके आणि अधिकृत कारण अद्याप प्रशासनाने जाहीर केलेले नाही, मात्र स्थानिक अधिकाऱ्यांनी या घटनेच्या सखोल तपासाचे आदेश दिले आहेत. घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी (Eyewitnesses) स्थानिक माध्यमांना सांगितले की, “गाडी चालवत असताना चालकाला वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीचा (Medical Emergency) सामना करावा लागला असावा, ज्यामुळे त्याचे कारवरील नियंत्रण सुटले आणि ती गर्दीत घुसली.” मात्र, हे केवळ प्राथमिक अनुमान आहे, अधिकाऱ्यांनी याची अद्याप पुष्टी केलेली नाही. या घटनेतील एक दिलासादायक बाब म्हणजे, अपघातानंतर चालक घटनास्थळीच उपस्थित होता. त्याचा तातडीने जबाब नोंदवून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : India Russia : भारताचा ऊर्जा नकाशा बदलणार! पुतिन यांच्यासोबत ‘पोर्टेबल अणुऊर्जा’ करार; SMR तंत्रज्ञान देशासाठी फायदेशीर

 तातडीने बचावकार्य: जखमींना रुग्णालयात दाखल

या भयंकर अपघातानंतर, बचाव पथकांनी तत्परतेने काम केले. जखमींना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले. ग्वाडेलूप प्रशासनाने या घटनेतील पीडितांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मानसिक आणि वैद्यकीय मदत पुरवण्यासाठी एक विशेष पथक सक्रिय केले आहे. या दुर्घटनेमुळे संपूर्ण सेंट-अ‍ॅन शहरावर शोककळा पसरली आहे.

🚨🇫🇷 UPDATE: Sainte-Anne Car Ramming, Guadeloupe, France. Tragic crash during Christmas prep: Car rams food truck crowd on Place Schoelcher, injuring 19 pedestrians (7 kids). 3 in absolute emergency (incl. 10yo boy), no lives lost. Driver in custody: Alcohol + cannabis… pic.twitter.com/4xO9jRI8Pi — Terror Alarm (@Terror_Alarm) December 6, 2025

credit : social media and Twitter

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US Citizenship: अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात ‘आज’ भूकंपाची शक्यता; ट्रम्पच्या ‘त्या’ आदेशावर अंतिम सुनावणी

या घटनेने गतवर्षी जर्मनीतील मॅग्डेबर्ग येथे झालेल्या अशाच एका दुर्घटनेची आठवण करून दिली आहे. मॅग्डेबर्ग येथील गर्दीच्या ख्रिसमस मार्केटमध्ये एका कारने घुसून दोन जणांना ठार केले होते. त्यामुळे सणासुदीच्या काळात गर्दीच्या ठिकाणी नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत (Crowd Safety) पुन्हा एकदा मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. स्थानिक प्रशासन आता भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी गर्दी व्यवस्थापन आणि सुरक्षा नियमांची कठोर अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने पाऊले उचलण्याची शक्यता आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: ग्वाडेलूपमधील कार अपघात कोठे झाला?

    Ans: फ्रेंच परदेशी प्रदेश ग्वाडेलूपमधील सेंट-अ‍ॅन येथील शोएलचर स्क्वेअरवर हा अपघात झाला.

  • Que: अपघातात किती लोक मरण पावले आणि जखमी झाले?

    Ans: या दुर्घटनेत किमान १० जण ठार आणि १९ जण जखमी झाले आहेत.

  • Que: अपघाताचे नेमके कारण काय असल्याचे प्राथमिक अनुमान आहे?

    Ans: चालकाला वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीचा सामना करावा लागला असावा, ज्यामुळे कारवरील नियंत्रण सुटले, असे प्राथमिक अनुमान आहे.

Web Title: Car crushes crowd in guadeloupe 10 people lost their lives what is the real cause of the accident

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 06, 2025 | 01:24 PM

Topics:  

  • Accident News
  • France
  • international news

संबंधित बातम्या

रुपयाला कोणी तरी आडवा! डॉलरच्या तुलनेत लागलाय जोरदार कोसळू
1

रुपयाला कोणी तरी आडवा! डॉलरच्या तुलनेत लागलाय जोरदार कोसळू

China-France Ties : रशियाच्या कट्टर शत्रूकडे का झुकला चीन? शी जिनपिंग-मॅक्रॉन दुर्मिळ भेटीने जगाला दिला ‘हा’ ठाम संदेश
2

China-France Ties : रशियाच्या कट्टर शत्रूकडे का झुकला चीन? शी जिनपिंग-मॅक्रॉन दुर्मिळ भेटीने जगाला दिला ‘हा’ ठाम संदेश

Australia Burqa Ban: ‘संसदेत बुरख्याविरुद्ध निषेध…’ आणि सेलिब्रिटी बनली ‘ही’ ऑस्ट्रेलियन खासदार, काय आहे संपूर्ण प्रकरण?
3

Australia Burqa Ban: ‘संसदेत बुरख्याविरुद्ध निषेध…’ आणि सेलिब्रिटी बनली ‘ही’ ऑस्ट्रेलियन खासदार, काय आहे संपूर्ण प्रकरण?

स्कूल बसच्या धडकेत चिमुकल्याचा मृत्यू, आई गंभीर जखमी; संतप्त नातेवाईकांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या
4

स्कूल बसच्या धडकेत चिमुकल्याचा मृत्यू, आई गंभीर जखमी; संतप्त नातेवाईकांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.