SMR म्हणजे स्मॉल मॉड्यूलर रिॲक्टर्स (Small Modular Reactors), जे लहान आणि पोर्टेबल अणुभट्ट्या आहेत. ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
याच चर्चेदरम्यान, रशियाने भारताला स्मॉल मॉड्यूलर रिॲक्टर्स (SMRs) नावाचे लहान, पोर्टेबल अणुऊर्जा तंत्रज्ञान पुरवण्याची तयारी दर्शवली आहे. हा करार केवळ ऊर्जा भागीदारीचे दरवाजे उघडत नाही, तर भारताच्या वेगाने वाढणाऱ्या विजेच्या मागणीवर मात करण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा धोरणात्मक बदल (Strategic Shift) ठरणार आहे.
SMR, अर्थात स्मॉल मॉड्यूलर रिॲक्टर, हे एक लहान, पोर्टेबल आणि उच्च-तंत्रज्ञानाचा अणुऊर्जा प्रकल्प आहेत. पारंपारिक मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पांपेक्षा हे पूर्णपणे वेगळे आहेत.
Breaking : Russia will continue to invest & provide assistance to India in Energy domain specially Nuclear with all kind of core fuel tech says Putin. Russia doing its best to finish construction of 6 Reactor in India mainly at Kudankulam Power Plant currently in making by L&T. pic.twitter.com/pjhU7MmJEx — Vivek Singh (@VivekSi85847001) December 5, 2025
credit : social media and Twitter
हे तंत्रज्ञान मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पांच्या तुलनेत कमी गुंतवणुकीत आणि कमी वेळेत वीज निर्माण करण्याची क्षमता ठेवते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Putin on Taliban : मोदींचे परममित्र पुतिन यांनी केली पाकिस्तानची कोंडी; अफगाण तालिबानच्या भविष्यरेषेवर पडणार रशियन रणनीतीची छाप
भारत वेगाने औद्योगिकीकरण (Industrialization) आणि शहरीकरण (Urbanization) अनुभवत आहे. परिणामी, विजेची मागणी वाढत आहे. त्याच वेळी, अक्षय ऊर्जेवर (Renewable Energy) अवलंबून असताना वीज पुरवठ्यात होणारे चढउतार (Fluctuations) ही मोठी समस्या आहे. SMRs येथे निर्णायक भूमिका बजावू शकतात:
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Strategic Shift : अमेरिकेचा पुन्हा एकदा ‘भूराजकीय स्फोट’; रशियाशी वैर चुकीचे, भारत इंडो-पॅसिफिकचा ‘किंगमेकर’ पण चीनला मात्र….
अणुऊर्जा तंत्रज्ञानामध्ये रशिया जागतिक स्तरावर आघाडीवर आहे. त्यांच्या ‘अकादमिक लोमोनोसोव्ह’ नावाच्या तरंगत्या अणुऊर्जा केंद्राने (Floating Nuclear Power Plant) २०२० मध्येच वीज निर्मिती सुरू केली. हे जगातील पहिले तरंगते अणुऊर्जा केंद्र आहे, जे समुद्रात तरंगून जमिनीला वीज आणि उष्णता पुरवते. रशियन कंपनी रोसाटॉमने भारताला याच तरंगत्या मॉडेलची शक्यताही दाखवली आहे. दरम्यान, रशिया आणि भारत संयुक्तपणे तामिळनाडूमध्ये आशियातील सर्वात मोठ्या कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पाची उभारणी करत आहेत. पुतिन यांनी सांगितले की, या ६,००० मेगावॅट क्षमतेच्या प्रकल्पातील सहापैकी तीन अणुभट्ट्या आधीच भारताच्या ऊर्जा नेटवर्कशी जोडल्या गेल्या आहेत, तर उर्वरित तीन अणुभट्ट्या बांधकाम पूर्णत्वाच्या विविध टप्प्यात आहेत. SMR कराराने दोन्ही देशांमधील अणुऊर्जा सहकार्याला एक नवी दिशा दिली आहे.
Ans: SMR म्हणजे स्मॉल मॉड्यूलर रिॲक्टर्स (Small Modular Reactors), जे लहान आणि पोर्टेबल अणुभट्ट्या आहेत.
Ans: हे तंत्रज्ञान दुर्गम आणि डोंगराळ भागांमध्ये स्वच्छ, बेसलोड वीज पुरवठा करण्यासाठी उपयुक्त ठरेल.
Ans: तामिळनाडूमध्ये आशियातील सर्वात मोठा कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्प (६,००० मेगावॅट) संयुक्तपणे उभारला जात आहे.






