China along with Japan and South Korea has prepared a solution to Trump's tariffs
बिजिंग: आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जगभरात परस्पर शुल्क लागू करण्याची घोषणा करतील. ट्रम्प यांनी बुधवारी स्थानिक वेळेनुसार दुपारी 4 वाजता रोज गार्डनर येथे मेक अमेरिका वेल्धी अमेरिका अहेन कार्यक्रमात टॅरिफची घोषणा करणार असल्याची माहिती व्हाईट हाइउस ने दिली आहे. दरम्यान भारतासह, चीन, कॅनडा यांसारख्या अनेक देशांवर परस्पर शुल्क लागू होणार आहे. याच वेळी चीन अमेरिकेच्या नव्या टॅरिफ धोरणाला उत्तर देण्यासाठी नवा डाव रचत असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
चीनच्या सरकारी माध्यांनी दावा केला आहे की, चीन, जपा आणि दक्षिण कोरिया ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाला प्रत्युत्तर देण्यासाठी एकत्र येणार आहे. मात्र दक्षिण कोरियाने या दाव्याला अतिशयोक्ती म्हटले आहे तर जपानने अशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचे म्हटले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- भारत-अमेरिका अणुशक्ती बळकट होणार; १८ वर्षांनंतर करारला अंतिम मंजूरी
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी 30 मार्च रोजी जपान, दक्षिण कोरिया आणि चीन मध्ये पाच वर्षांनंतर झालेल्या चर्चेमुळे करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार या तीन्ही देशांच्या या भेटीदरम्यान व्यापर संबंध सुलभ करण्यावर भर देण्यात आला. मिडिया रिपोर्टनुसार, जपान आणि दक्षिण कोरिया चीनकडून सेमीकंडक्टरच्या कच्चा मालाचे आयात करणार आहे, तर चीननेही जपान व दक्षिण कोरियाकडून चिप उत्पादन घेण्यास आपली इच्छा दर्शवली आहे, तीनीही देशांनी सप्लाय चेनमध्ये एकमेकांना सहकार्य करण्यावर भर दिला आहे.
दक्षिण कोरियाच्या वाणिज्य मंत्रायाने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकन टॅरिफबद्दल संयुक्त उत्तराची योजाना तयार केली जात आहे”. हा दावा पोकळ असल्याचे म्हटले जात आहे. तसेच जपानचे व्यापर मंत्री योजी मुटो यांनीही हा दावा फेटाळून लावला आहे. त्यांनी म्हटले आहे की, अशा कोणत्याही गोष्टीवर चर्चा करण्यात आलेली नाही. ही बैठक केवळ परस्पर विचारांची देवाणघेवाणीसाठी होती.
बैठकीत झालेल्या चर्चेनुसार, तीन देशांनी आशियाई आणि जागतिक व्यापर वाढवण्यावर एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. दक्षिण कोरिया, जपान , चीन मुक्त व्यापर कराराबाबत वाटाघटी करण्यास तिन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आजपासून (02 एप्रिल) यांनी रेसिप्रोकल टॅक्स लागू करम्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय आजपासून अंमलात येणार आहे. या नव्या धोरणानुसार, अमेरिका इतर देशांवर तितकाच कर उत्पादनांवर लादणार आहेत जितका इतर देश अमेरिकेन उत्पादनांवर लादतील. यामुळे जागतिक स्तरावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. विशेष करुन जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम होऊन अनेक छोट्या-मोठ्या उद्योगांना फटका बसण्याची शक्यता आहे.