Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

World War 3 : इराणच्या जखमेवर मीठ की मुत्सद्देगिरी? Iranच्या इतिहासातील सर्वात काळ्या पर्वाला Chinaने म्हटले स्वतःसाठी ऐतिहासिक

Middle East War: मध्यपूर्वेत इराण अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यांना तोंड देत आहे. असे असूनही, चीन या वर्षाला अमेरिकेसोबतच्या संबंधांसाठी "ऐतिहासिक" वर्ष म्हणत आहे. जाणून घ्या यामागे नेमक कारण काय आहे ते?

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Mar 09, 2026 | 11:20 AM
china historic year us relations trump visit iran crisis explained marathi

china historic year us relations trump visit iran crisis explained marathi

Follow Us
Close
Follow Us:
  • चीनची मोठी खेळी
  • ट्रम्प यांचा बीजिंग दौरा
  • मध्यपूर्वेतील बदलतं समीकरण

Trump China Visit March 2026 : सध्या संपूर्ण मध्यपूर्व युद्धाच्या (US-Israel Iran War) ज्वाळांमध्ये होरपळून निघत आहे. हजारो निष्पाप लोकांचा बळी जात आहे आणि शांततेची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. इराणसाठी हा काळ त्यांच्या इतिहासातील सर्वात ‘काळा कालखंड’ मानला जात आहे, कारण अमेरिका आणि इस्रायलच्या भीषण हल्ल्यांमध्ये इराणने आपले सर्वोच्च नेते अली खामेनी यांना गमावले आहे. इराण हा चीनचा अत्यंत जवळचा मित्र देश आहे, तरीही आश्चर्याची गोष्ट म्हणजे चीन या वर्षाला स्वतःसाठी आणि अमेरिकेसोबतच्या संबंधांसाठी “ऐतिहासिक आणि महत्त्वाचे वर्ष” म्हणून संबोधत आहे.

चीनचा बदललेला पवित्रा आणि अमेरिकेशी जवळीक

चीनच्या नॅशनल पीपल्स काँग्रेसच्या वार्षिक बैठकीदरम्यान परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अत्यंत महत्त्वाची विधाने केली. त्यांनी स्पष्ट केले की, जरी चीन आणि अमेरिका यांच्यात अनेक मुद्द्यांवर गंभीर मतभेद असले, तरी दोन्ही देशांच्या प्रप्रमुखांनी वैयक्तिक पातळीवर संवाद सुरू ठेवला आहे. वांग यी यांच्या मते, ही ‘धोरणात्मक हमी’ आहे जी दोन्ही जागतिक महासत्तांना एकत्र ठेवण्यास मदत करत आहे. इराण संकटात असताना चीनने अमेरिकेशी हातमिळवणी करण्याचा हा प्रयत्न अनेकांच्या भुवया उंचावणारा ठरला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : World War 3: युद्धाच्या गदारोळात अमेरिकेची संसाधन शिकार! इराण युद्धामागे फक्त ‘डर्टी पॉलिटिक्स’; ट्रम्प यांच्या सहकाऱ्याची कबुली

डोनाल्ड ट्रम्प यांचा बीजिंग दौरा: चर्चा की समझोता?

सर्वात मोठी बातमी म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे मार्च अखेरीस बीजिंगच्या दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. तिथे ते चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतील. वांग यी यांनी या भेटीची अधिकृत पुष्टी केली नसली तरी, त्यांनी स्पष्ट संकेत दिले आहेत की ‘उच्चस्तरीय चर्चेचा अजेंडा’ तयार आहे. चीनला आता अमेरिकेसोबतचा तणाव कमी करायचा आहे. ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात सुरू झालेले व्यापार युद्ध (Trade War) आणि लादलेले प्रचंड शुल्क यामुळे चीनची अर्थव्यवस्था दबावाखाली आहे, हे यामागील प्रमुख कारण मानले जात आहे.

President Xi Jinping attends the plenary meeting during the National People’s Congress annual session.
Courtesy: CGTN #ChinaAgenda2026 pic.twitter.com/xKCA5xWAde
— Asia Fact-Check (@AsiaFactCheck) March 9, 2026

credit – social media and Twitter

व्यापार युद्धाचा इतिहास आणि भविष्यातील आव्हाने

ट्रम्प आणि शी जिनपिंग यांच्यातील संबंध नेहमीच चढ-उतारांचे राहिले आहेत. ट्रम्प यांनी चीनसोबतच्या व्यापारातील तूट भरून काढण्यासाठी गेल्या वर्षी जगातील सर्वात मोठे व्यापार शुल्क लादले होते. जरी ऑक्टोबरमध्ये तात्पुरत्या स्वरूपात युद्धबंदी झाली असली, तरी मूलभूत प्रश्न अजूनही सुटलेले नाहीत. आता जेव्हा मध्यपूर्वेमध्ये अस्थिरता आहे, तेव्हा चीनला वाटते की अमेरिकेशी संबंध सुधारण्याची हीच ती ‘ऐतिहासिक’ वेळ आहे, जेणेकरून जागतिक बाजारपेठेतील आपले स्थान अबाधित राहू शकेल.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : World War 3: आकाशात अग्निकहर! इराणच्या ड्रोन आर्मीला युएईने एका झटक्यात केलं उध्वस्त; पाहा ‘तो’ 40 सेकंदांचा थरारक VIDEO

इराणच्या ‘काळ्या पर्वा’चा चीनला फायदा?

इराण आज एका मोठ्या नेतृत्वाच्या पोकळीचा सामना करत आहे. चीन हा नेहमीच इराणचा आर्थिक भागीदार राहिला आहे, परंतु सध्याच्या परिस्थितीत चीन ‘इराण कार्ड’ वापरून अमेरिकेकडून व्यापार सवलती मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा जागतिक राजकारणात सुरू झाली आहे. इराणसाठी हे वर्ष विनाशाचे असले, तरी चीनसाठी ते ‘संधीचे वर्ष’ ठरत आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: चीनने या वर्षाला 'ऐतिहासिक वर्ष' का म्हटले आहे?

    Ans: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा संभाव्य चीन दौरा आणि दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्याच्या प्रयत्नांमुळे चीन या वर्षाला ऐतिहासिक मानत आहे.

  • Que: ट्रम्प आणि शी जिनपिंग यांच्यात कधी भेट होणार आहे?

    Ans: रिपोर्टनुसार, मार्च अखेरीस ही शिखर परिषद बीजिंगमध्ये होण्याची दाट शक्यता आहे.

  • Que: इराणच्या परिस्थितीचा या भेटीवर काय परिणाम होईल?

    Ans: इराण आणि इस्रायल संघर्षात चीन मध्यस्थीची भूमिका घेऊ शकतो, ज्यामुळे अमेरिकेसोबतच्या चर्चेत चीनचा हात वरचढ ठरेल.

Web Title: China historic year us relations trump visit iran crisis explained marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2026 | 11:20 AM

Topics:  

  • China
  • US-Israel Iran War
  • World War 3

संबंधित बातम्या

World War 3: आकाशात अग्निकहर! इराणच्या ड्रोन आर्मीला युएईने एका झटक्यात केलं उध्वस्त; पाहा ‘तो’ 40 सेकंदांचा थरारक VIDEO
1

World War 3: आकाशात अग्निकहर! इराणच्या ड्रोन आर्मीला युएईने एका झटक्यात केलं उध्वस्त; पाहा ‘तो’ 40 सेकंदांचा थरारक VIDEO

धक्कादायक! इराणमध्ये पडतोय ‘काळा विषारी पाऊस’? एका थेंबानेही शरीर होऊ शकते जळून खाक, थरारक VIDEO VIRAL
2

धक्कादायक! इराणमध्ये पडतोय ‘काळा विषारी पाऊस’? एका थेंबानेही शरीर होऊ शकते जळून खाक, थरारक VIDEO VIRAL

World War 3: युद्धाच्या गदारोळात अमेरिकेची संसाधन शिकार! इराण युद्धामागे फक्त ‘डर्टी पॉलिटिक्स’; ट्रम्प यांच्या सहकाऱ्याची कबुली
3

World War 3: युद्धाच्या गदारोळात अमेरिकेची संसाधन शिकार! इराण युद्धामागे फक्त ‘डर्टी पॉलिटिक्स’; ट्रम्प यांच्या सहकाऱ्याची कबुली

US Iran War : इराणमध्ये रक्ताचा सडा! मृतांचा आकडा १३०० पार ; १० व्या दिवशीही युद्धाने गाठली भीषण पातळी
4

US Iran War : इराणमध्ये रक्ताचा सडा! मृतांचा आकडा १३०० पार ; १० व्या दिवशीही युद्धाने गाठली भीषण पातळी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.