Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

World War 3: आकाशात अग्निकहर! इराणच्या ड्रोन आर्मीला युएईने एका झटक्यात केलं उध्वस्त; पाहा ‘तो’ 40 सेकंदांचा थरारक VIDEO

Middle East Crisis: संयुक्त अरब अमिराती (यूएई) च्या संरक्षण मंत्रालयाने इराणी हल्ल्यांबाबत जोरदार दावा केला आहे. त्यांचे म्हणणे आहे की इराणने आतापर्यंत केलेले बहुतेक हल्ले हाणून पाडण्यात आले आहेत.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Mar 09, 2026 | 10:53 AM
uae iran war drone attack interception video indian embassy advisory marathi

uae iran war drone attack interception video indian embassy advisory marathi

Follow Us
Close
Follow Us:
  • UAE चे जोरदार प्रत्युत्तर
  • हल्ल्याचा थरार व्हिडिओमध्ये
  • भारतीयांसाठी सतर्कतेचा इशारा

Iran Drone Attack UAE Defense Ministry Video 2026 : मध्यपूर्वेतील (US-Israel Iran War) तणाव आता एका धोकादायक वळणावर येऊन पोहोचला आहे. इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील संघर्षाने आता शेजारील देशांनाही आपल्या कचाट्यात घेण्यास सुरुवात केली आहे. संयुक्त अरब अमिरातीच्या (UAE) संरक्षण मंत्रालयाने नुकताच एक खळबळजनक दावा केला असून, इराणकडून होणारे ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले रोखण्यासाठी आपली संरक्षण यंत्रणा पूर्ण ताकदीने काम करत असल्याचे सांगितले आहे.

इराणी हल्ल्यांचा थरार आणि UAE ची आक्रमकता

गेल्या काही दिवसांपासून इराणकडून UAE ला सातत्याने लक्ष्य केले जात आहे. मात्र, अमिरातीच्या संरक्षण मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या एका ४० सेकंदांच्या व्हिडिओने जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. या कृष्णधवल (Black and White) व्हिडिओमध्ये युएईची प्रगत हवाई संरक्षण प्रणाली (Air Defense System) इराणी ड्रोनचा पाठलाग करून त्यांना हवेतच कशी नष्ट करते, हे स्पष्टपणे दिसत आहे. “देशाची सुरक्षा आणि सार्वभौमत्व आमच्यासाठी सर्वोच्च आहे आणि आम्ही कोणत्याही धोक्याचा सामना करण्यास सज्ज आहोत,” असे अधिकृत निवेदन मंत्रालयाने जारी केले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : World War 3: युद्धाच्या गदारोळात अमेरिकेची संसाधन शिकार! इराण युद्धामागे फक्त ‘डर्टी पॉलिटिक्स’; ट्रम्प यांच्या सहकाऱ्याची कबुली

आकडेवारीतून समोर आलेलं भीषण वास्तव

युएईच्या दाव्यानुसार, इराणने आतापर्यंत युएईवर मोठ्या प्रमाणावर हल्ले केले आहेत. आकडेवारीनुसार, २३८ बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे, १,४२२ ड्रोन आणि ८ क्रूझ क्षेपणास्त्रे डागण्यात आली होती. यापैकी १,३४२ हल्ले युएईने यशस्वीरित्या हवेतच हाणून पाडले आहेत. रविवारी झालेल्या भीषण हल्ल्यात इराणने १७ बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि ११७ ड्रोन डागले होते, त्यातील १६ क्षेपणास्त्रे आणि ११३ ड्रोन युएईने पाडले, तर उरलेले काही समुद्रात जाऊन पडले. यावरून युएईच्या संरक्षण यंत्रणेची अचूकता जगासमोर आली आहे.

لقطات تظهر اعتراض وتدمير الدفاعات الجوية الإماراتية طائرات مسيّرة إيرانية حاولت استهداف الدولة. لا تهاون بأمن الوطن وسيادته… والقوات المسلحة الإماراتية جاهزة لردع أي تهديد. Footage showing the UAE’s air defences intercepting and destroying Iranian UAVs that attempted to… pic.twitter.com/vvHmZkcBri — وزارة الدفاع |MOD UAE (@modgovae) March 8, 2026

credit – social media and Twitter

हल्ल्यात निष्पाप नागरिकांचा बळी: मृतांमध्ये आशियाई नागरिकांचा समावेश

या युद्धाच्या झळा केवळ लष्करी तळांनाच नाही, तर सर्वसामान्यांनाही सोसाव्या लागत आहेत. रविवारी झालेल्या हल्ल्यात चार जणांचा मृत्यू झाला असून हे सर्वजण परदेशी नागरिक आहेत. मृतांमध्ये पाकिस्तान, नेपाळ आणि बांगलादेशच्या नागरिकांचा समावेश आहे. याशिवाय भारत, श्रीलंका, इजिप्त, सुदान आणि फिलिपिन्ससह अनेक देशांतील ११२ लोक जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण आशियाई समुदायात चिंतेचे वातावरण आहे.

UAE मधील भारतीयांसाठी विशेष नियमावली

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून युएईमधील भारतीय दूतावासाने तातडीने ‘ट्रॅव्हल ॲडव्हायझरी’ आणि सुरक्षा सूचना जारी केल्या आहेत. भारतीय नागरिकांना स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की, कोणत्याही हल्ल्याचे किंवा लष्करी कारवाईचे व्हिडिओ किंवा फोटो सोशल मीडियावर शेअर करू नका. युएई कायद्यानुसार अशा कृत्यांसाठी कठोर शिक्षा होऊ शकते. तसेच, जेव्हा चेतावणीचा सायरन वाजेल, तेव्हा फोटो काढण्यासाठी बाहेर न पडता सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : International Law: कायद्याची ऐशीतैशी! पुतिन यांच्या प्रवक्त्याने फुंकले धोक्याचे रणशिंग; UNSC च्या P5 महासत्तांची आपत्कालीन बैठक

का वाढतोय इराणचा संताप?

तज्ज्ञांच्या मते, अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांनंतर इराण आता अमेरिकेचे मित्र राष्ट्र असलेल्या युएईवर आपला राग काढत आहे. मध्यपूर्वेतील हा संघर्ष जर लवकर थांबला नाही, तर जागतिक अर्थव्यवस्थेवर आणि विशेषतः कच्च्या तेलाच्या किमतींवर याचा मोठा परिणाम होऊ शकतो.

💡

Frequently Asked Questions

  • Que: युएईने इराणचे किती ड्रोन पाडले?

    Ans: ताज्या आकडेवारीनुसार, युएईने १७ पैकी १६ बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि ११७ पैकी ११३ ड्रोन यशस्वीरित्या पाडले आहेत.

  • Que: भारतीय दूतावासाने व्हिडिओ काढण्यास का मनाई केली आहे?

    Ans: सुरक्षिततेच्या कारणास्तव आणि विमानतळ किंवा प्रतिबंधित क्षेत्रांची गोपनीय माहिती उघड होऊ नये म्हणून युएईमध्ये चित्रीकरण करण्यास सक्त मनाई आहे.

  • Que: या हल्ल्यांमध्ये किती भारतीय जखमी झाले आहेत?

    Ans: एकूण ११२ जखमींमध्ये काही भारतीय नागरिकांचाही समावेश आहे, मात्र जीवितहानीमध्ये अद्याप कोणत्याही भारतीयाचे नाव नाही.

Web Title: Uae iran war drone attack interception video indian embassy advisory marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2026 | 10:53 AM

Topics:  

  • iran
  • UAE
  • US-Israel Iran War
  • World War 3

संबंधित बातम्या

धक्कादायक! इराणमध्ये पडतोय ‘काळा विषारी पाऊस’? एका थेंबानेही शरीर होऊ शकते जळून खाक, थरारक VIDEO VIRAL
1

धक्कादायक! इराणमध्ये पडतोय ‘काळा विषारी पाऊस’? एका थेंबानेही शरीर होऊ शकते जळून खाक, थरारक VIDEO VIRAL

World War 3: युद्धाच्या गदारोळात अमेरिकेची संसाधन शिकार! इराण युद्धामागे फक्त ‘डर्टी पॉलिटिक्स’; ट्रम्प यांच्या सहकाऱ्याची कबुली
2

World War 3: युद्धाच्या गदारोळात अमेरिकेची संसाधन शिकार! इराण युद्धामागे फक्त ‘डर्टी पॉलिटिक्स’; ट्रम्प यांच्या सहकाऱ्याची कबुली

US Iran War : इराणमध्ये रक्ताचा सडा! मृतांचा आकडा १३०० पार ; १० व्या दिवशीही युद्धाने गाठली भीषण पातळी
3

US Iran War : इराणमध्ये रक्ताचा सडा! मृतांचा आकडा १३०० पार ; १० व्या दिवशीही युद्धाने गाठली भीषण पातळी

International Law: कायद्याची ऐशीतैशी! पुतिन यांच्या प्रवक्त्याने फुंकले धोक्याचे रणशिंग; UNSC च्या P5 महासत्तांची आपत्कालीन बैठक
4

International Law: कायद्याची ऐशीतैशी! पुतिन यांच्या प्रवक्त्याने फुंकले धोक्याचे रणशिंग; UNSC च्या P5 महासत्तांची आपत्कालीन बैठक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.