Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

US-China Tariff War: चीनची अमेरिकेच्या टॅरिफ प्रत्युत्तरात ‘इतका’ कर लादण्याची घोषणा

डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडा, मेक्सिकोमधून होणाऱ्या आयातींवर 25 टक्के कर आणि चीनमधून होणाऱ्या आयातींवर 20 टक्के कर आजपासून (04 मार्च) लागू केला आहे. यामुळे अमेरिका आणि चीनमध्ये तीव्र व्यापर युद्ध सुरु झाले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 04, 2025 | 01:12 PM
China imposes retaliatory tariffs of up to 15% in response to US tariffs

China imposes retaliatory tariffs of up to 15% in response to US tariffs

Follow Us
Close
Follow Us:

बिजिंग: डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडा, मेक्सिकोमधून होणाऱ्या आयातींवर 25 टक्के कर आणि चीनमधून होणाऱ्या आयातींवर 20 टक्के कर आजपासून (04 मार्च) लागू केला आहे. यामुळे अमेरिका आणि चीनमध्ये तीव्र व्यापर युद्ध सुरु झाले आहे. अमेरिका सरकारने चीनी वस्तूंवरील कर 10% वरुन 20% केला आहे. यामुळे या कराच्या प्रत्युत्तरात चीनने काही अमेरिकन उत्पादनांवर 10% ते 15 % पर्यंत अतिरिक्त कराची घोणा केली आहे. यात सोयाबीन, ज्वारी, पोर्क गोमांस, जल उत्पादने, फळे, भाजीपाला आणि दुग्धजन्य पदार्थांचा समावेश आहे.

अमेरिकन शेतकऱ्यांवर परिणाम

या नव्या टॅरिफमुळे अमेरिकन कृषी क्षेत्रांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. चीन हा अमेरिकन उत्पादनांचा मोठा ग्राहक आहे. विशेषत: सोयाबीन आणि पोर्कसाठी चीन मोठा ग्राहक असून यावर प्रभाव पडण्याची शक्यता आहे. चीनकडून आयात होणाऱ्या वस्तूंमध्ये घट झाल्यास याचा मोठा फटका अमेरिकन शेतकऱ्यांना बसणार आहे. यामुळे उत्पादनांच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना मोठा तोटा होईल. शिवाय हा तणाव दिर्घकाळ राहिला तर अमेरिकन शेतकऱ्यांना उत्पादन निर्मितीसाठी नवीन बाजारपेठांची गरज भासेल. अमेरिकेच्या कृषी क्षेत्रावर मोठे संकट निर्माण होईल.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- ट्रम्प यांना कॅनडाचे जोरदार प्रत्युत्तर, अमेरिकन वस्तूंवर लादला २५ टक्के कर, अमेरिकन शेअर बाजार २ टक्के घसरला

चीनवरील परिणाम 

अमेरिकेने लागून केलेल्या टॅरिफमुळे चीनच्या ग्राहकांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. अमेरिकन उत्पादने महाग झाल्यास त्याचा थेट परिणाम ग्राहकांच्या खरेदीवर होईल. चीनला देखील पर्यायी बाजारपेठा शोधाव्या लागतील. ब्राझील आणि अर्जेंटिना हे देश चीनला मोठ्या प्रमाणावर कृषी उत्पादने पुरवू शकतात. त्यामुळे अमेरिकेच्या जागी हे देश चीनच्या प्रमुख पुरवठादारांपैकी एक बनू शकतात.

जागतिक अर्थव्यवस्थवर परिणाम 

अमेरिका आणि चीनमधील व्यापर युद्धाचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर देखील होईल.  दोन्ही देश जागतिक बाजारपेठांमध्ये मोठी भूमिका बजावतात. मात्र या व्यापर युद्धामुळे जागतिक पुरवठा साखळी विस्ळीत होण्याची शक्यता आहे.  यामुळे उत्पादन खर्च वाढून महागाई वाढेल. केवळ कृषी क्षेत्रच नव्हे तर उत्पादन, तंत्रज्ञान आणि वाहन उद्योगाला मोठा फटका बसू शकतो. या व्यापर युद्धामुळे जागतिक आर्थिक मंदीचाही धोका वाढू शकतो. अनेक देशांसाठी अमेरिका आणि चीन मोठी बाजारपेठ असून या वादाचा धक्का इतर देशांनाही बसू शकतो.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- ‘जर निर्णय मागे घेतला नाही तर…’; डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘या’ निर्णयावर जस्टिन ट्रूडोंचा इशारा

Web Title: China imposes retaliatory tariffs of up to 15 in response to us tariffs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2025 | 01:12 PM

Topics:  

  • America
  • China
  • World news

संबंधित बातम्या

Explainer : नेपाळने भारतात नोट छपाई का बंद केली? श्रीलंका, मलेशियासह ‘या’ शेजारी देशांनीही चीनला दिली डील, काय आहे कारण?
1

Explainer : नेपाळने भारतात नोट छपाई का बंद केली? श्रीलंका, मलेशियासह ‘या’ शेजारी देशांनीही चीनला दिली डील, काय आहे कारण?

Bihar Elections: ‘गांधी गुंडांनी आता…’अमेरिकन सेलेब्रिटीची ‘ती’ पोस्ट VIRAL; काँग्रेसवर आंतरराष्ट्रीय टीकेचे झोड
2

Bihar Elections: ‘गांधी गुंडांनी आता…’अमेरिकन सेलेब्रिटीची ‘ती’ पोस्ट VIRAL; काँग्रेसवर आंतरराष्ट्रीय टीकेचे झोड

Trump Tariff : जनतेच्या दबावापुढे झुकले ट्रम्प? वाढत्या महागाईच्या तक्रारींमुळे कॉफी, चहासह या वस्तूंवरील टॅरिफ कमी करण्याची घोषणा
3

Trump Tariff : जनतेच्या दबावापुढे झुकले ट्रम्प? वाढत्या महागाईच्या तक्रारींमुळे कॉफी, चहासह या वस्तूंवरील टॅरिफ कमी करण्याची घोषणा

Saudi-US : सौदीचा अमेरिकेकडे इतिहासातील सर्वात मोठा आग्रह; क्राउन प्रिन्सच्या ‘या’ चार अटींमुळे संपूर्ण जगाचे लक्ष खिळले
4

Saudi-US : सौदीचा अमेरिकेकडे इतिहासातील सर्वात मोठा आग्रह; क्राउन प्रिन्सच्या ‘या’ चार अटींमुळे संपूर्ण जगाचे लक्ष खिळले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.