China Offers One-Month Leave to Encourage Childbirth
बिजिंग : सध्या चीनमध्ये मुसळधार पावसामुळे हाहा:कार माजला आहे. पूर आणि भूस्खलनामुळे परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. अनेक लोकांना स्थालांतर करावे लागत आहे, काही लोक बेपत्ता देखील झाले आहेत.याच वेळी चीनला देशाचा जन्मदर वाढवण्याची चिंता आहे. यासाठी चीन सतत नवे प्रयोग करत आहे. देशाच्या लोकसंख्येत घटन होत असल्याने चीन चिंतेत आहे. यासाठी चीन सर्व पातळीवर वेगवगळ्या योजना राबवत आहे.
चीनच्या सरकाने आता मुलांना जन्म घालण्यासाठी पालकांना १ लाख ३० हजार रुपयांचे अनुदान जाहीर केले आहे. ३ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना देखील हे अनुदान दिले जाणार आहे. यामध्ये ३ वर्षापूर्वी जन्मलेल्या मुलांना देखील सामील करण्याचा निर्णय चीन सरकारने घेतला आहे. सध्या चीनचा प्रजनन दर १.०९ आहे, मात्र चीने हा ३ पर्यंत नेण्याचा विचार केला आहे. यासाठी चीन वेगवेगळे प्रयोग करत आहेत.
चीनच्या नागरिकांना बाळाला जन्म दिल्यानंतर ५०० डॉलर्स आणि पालकंना १००० डॉलर्सची सध्या तरतूद ठेवली आहे. यामुळे मुलांना जन्म दिल्यानंतप संपूर्ण कुटुंबाला १५०० डॉलर्स मिळणार आहे. भारतीय रुपयांमध्ये १ लाख ३० हजार रुपये चीनी कुटुंबीयांना मिळतील. शिवाय सबसिडीसाठी नागरिक अर्ज करु शकतो. सराकर थेट कुटुंबीयांच्या खात्यात पैसे जमा करणार आहे. यामुळे चीना जन्मदर वाढण्याची शक्यता असल्याचे हॉंगकॉग विद्यापीठाने आणि फुदान विद्यापाठीच्या संशोधकांनी म्हटले आहे.
सध्या चीन देशाच्या १४ प्रांतातमध्ये वेगवेगळ्या प्रकारे जन्मदर वाढवण्याचा निर्णय घेत आहे. सर्वाधिक जनमदर चीनच्या सिचुआन प्रांतातमध्ये वाढवण्याचे लक्ष्य चीनने ठेवले आहे. यासाठी लोकांना २५ दिवसांच्या रजेचे देखील तरतूद करम्यात आली आहे. वडिलांना ही रजा दिली जाणार असून पगारही दिला जाणार आहे.
याशिवाय चीनच्या शेडोंगमध्येही १८ दिवसांच्या रजेची, तर शांक्सी आणि गांसु प्रांतात ३० दिवसांची रजेची परवानगी देण्यात आली आहे. यापूर्वी ३ दिवसांच्या रजा चीनी नागरिकांना मिळत होती. मात्र प्रजनन दर वाढवण्यासाठी चीनने हा नवा प्रयोग सुरु केला आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्या केंद्रीय पातळीवर देखील राबवला जाणार असल्याचे चीनच्या सरकारने म्हटले आहे.