
china oic meeting wang yi trump tariffs law of the jungle 2026
China OIC meeting Beijing 2026 news : जगातील दोन महासत्तांमधील व्यापार युद्ध आता केवळ पैशांपुरते मर्यादित राहिले नसून, त्याला आता धोरणात्मक युतीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी जगभरातील अनेक देशांवर, विशेषतः चीनवर ५०% पर्यंत आयात शुल्क लादण्याचे संकेत दिल्यानंतर चीनने आपली नवी रणनीती आखली आहे. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी ५७ मुस्लिम देशांचा समावेश असलेल्या ‘ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन’ (OIC) चे सरचिटणीस हुसेन इब्राहिम ताहा यांची बीजिंगमध्ये भेट घेऊन जगाला एक मोठा संदेश दिला आहे.
या महत्त्वाच्या बैठकीत वांग यी यांनी थेट अमेरिकेचे नाव न घेता ट्रम्प प्रशासनावर निशाणा साधला. ते म्हणाले की, “आज जग एका अशा वळणावर आहे जिथे एकाधिकारशाही आणि दडपशाही वाढत आहे. चीन इस्लामिक देशांसोबत अशा पद्धतीने काम करण्यास तयार आहे, जेणेकरून जगाला पुन्हा एकदा ‘जंगलाच्या कायद्याकडे’ (ज्यामध्ये शक्तीशाली देश कमकुवत देशांवर अन्याय करतात) जाण्यापासून रोखता येईल.” ट्रम्प यांच्या टॅरिफ धमक्यांकडे चीन ‘व्यापारी गुंडगिरी’ म्हणून पाहत असून, त्याविरुद्ध ग्लोबल साउथ आणि मुस्लिम देशांची एकजूट उभी करण्याचा हा चीनचा प्रयत्न आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Xi Mingze : चीनची ‘राजकुमारी’ सांभाळणार सत्तासूत्रे? शी जिनपिंग यांच्या मुलीच्या राजकीय प्रवेशाची संपूर्ण जगभरात जोरदार चर्चा
या चर्चेचा सर्वात धक्कादायक पैलू म्हणजे शिनजियांगमधील मुस्लिम अल्पसंख्याकांचा मुद्दा. अमेरिका आणि युरोपीय देश नेहमीच चीनवर शिनजियांगमध्ये मानवाधिकारांचे उल्लंघन केल्याचा आरोप करतात. मात्र, या बैठकीत ओआयसीचे सरचिटणीस हुसेन इब्राहिम ताहा यांनी स्पष्ट केले की, “ओआयसी ‘एक चीन’ (One China Policy) धोरणाचे ठामपणे पालन करते आणि चीनच्या अंतर्गत बाबींमध्ये बाह्य शक्तींच्या हस्तक्षेपाला आमचा विरोध आहे.” शिनजियांगमधील विकासाचे ओआयसीने कौतुक केल्यामुळे अमेरिकेच्या आरोपांची धार कमी झाली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Republic Day 2026: प्रजासत्ताकदिनी कर्तव्यपथावर अमेरिकन ‘अपाचे’चा थरार; ट्रम्प म्हणाले, ‘आमचे भारताशी ऐतिहासिक बंध’
चीनने केवळ राजकीयच नाही तर आर्थिक आघाडीवरही मुस्लिम देशांना गळाला लावले आहे. वांग यी यांनी ‘बेल्ट अँड रोड’ प्रकल्पांतर्गत पायाभूत सुविधांच्या विकासावर भर देण्याचे आवाहन केले. मध्य पूर्वेतील वाढता तणाव, विशेषतः इराण आणि इस्रायलमधील संघर्ष पाहता, चीनने शांतता प्रस्थापित करण्यासाठी पुढाकार घेण्याची तयारी दर्शवली आहे. इराणवर हल्ला झाल्यास त्याचे रूपांतर महायुद्धात होईल, अशा परिस्थितीत चीनची भूमिका निर्णायक ठरणार आहे.
ट्रम्प यांनी नुकताच अमेरिकन नौदल ताफा इराणकडे रवाना करण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्याच वेळी चीनने इस्लामिक देशांशी संवाद साधून अमेरिकेची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. कॅनडा आणि युरोपीय देश आधीच अमेरिकेच्या व्यापार धोरणामुळे नाराज आहेत; आता मुस्लिम देशही चीनच्या बाजूने झुकल्यास ट्रम्प यांचे ‘अमेरिका फर्स्ट’ धोरण जागतिक स्तरावर एकटे पडू शकते.
Ans: अमेरिकेने लादलेल्या एकतर्फी टॅरिफ आणि आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन करून इतर देशांवर दबाव आणण्याच्या धोरणाला चीनने 'जंगली कायदा' म्हटले आहे.
Ans: ओआयसीने चीनच्या भूमिकेला पाठिंबा दिला असून, या मुद्द्यावर बाहेरील देशांनी (विशेषतः अमेरिकेने) हस्तक्षेप करू नये, असे म्हटले आहे.
Ans: यामुळे मध्य पूर्वेतील अमेरिकेचा प्रभाव कमी होऊ शकतो आणि चीनला एक मोठी जागतिक बाजारपेठ व राजकीय पाठबळ मिळण्याची शक्यता आहे.