
china succession xi jinping daughter xi mingze political career 2027 congress
Xi Jinping successor news 2027 : जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या चीनमध्ये(China) सध्या पडद्यामागे मोठ्या राजकीय हालचाली सुरू आहेत. निमित्त आहे २०२७ मध्ये होणाऱ्या चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या (CCP) २१ व्या राष्ट्रीय काँग्रेसचे. या अधिवेशनात केवळ शी जिनपिंग यांची सत्ताच अधिक मजबूत होणार नाही, तर त्यांच्या उत्तराधिकार्याची (Successor) पहिली झलक जगाला पाहायला मिळू शकते. यामध्ये सर्वात जास्त चर्चा होत आहे ती जिनपिंग यांची ३३ वर्षीय मुलगी शी मिंगझे हिची.
२०२७ हे वर्ष चीनसाठी ऐतिहासिक ठरणार आहे. याच वर्षी चिनी लष्कराला (PLA) १०० वर्षे पूर्ण होत आहेत आणि याच वेळी पक्षाचे नवे नेतृत्व ठरवले जाईल. शी जिनपिंग यांनी अलिकडच्या काळात पक्षातील भ्रष्ट आणि अनियंत्रित अधिकाऱ्यांवर मोठी कारवाई केली आहे. सेंट्रल कमिशन फॉर डिसिप्लिन इन्स्पेक्शन (CCDI) च्या बैठकीत त्यांनी स्पष्ट केले की, “पक्षाला केवळ अशाच नेत्यांची गरज आहे जे पूर्णपणे निष्ठावंत आणि चिकाटीचे आहेत.” अभ्यासकांच्या मते, जिनपिंग हे अशा ‘निष्ठावंतांची’ फळी तयार करत आहेत जी भविष्यात त्यांच्या कुटुंबाचा किंवा त्यांच्या विचारधारेचा वारसा सुरक्षित ठेवेल.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : India-EU FTA: भारत-ईयू व्यापार करारादरम्यान 27 देशांसाठी मोठी बातमी; उद्या होणार जगातील सर्वात मोठ्या करारावर स्वाक्षरी
शी जिनपिंग यांचे एकुलते एक अपत्य असलेल्या शी मिंगझे यांनी आजवर स्वतःला प्रसिद्धीपासून दूर ठेवले आहे. हार्वर्ड विद्यापीठात मानसशास्त्राचे शिक्षण घेतलेल्या मिंगझे यांनी तेथे आपली ओळख लपवण्यासाठी टोपणनाव वापरले होते. मात्र, जून २०२५ मध्ये बेलारूसच्या राष्ट्राध्यक्षांसाठी आयोजित मेजवानीत त्या दिसल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली. मिंगझे यांनी सध्या आपल्या वडिलांच्या ‘सोशल मीडिया’ आणि ‘ब्रँडिंग’ टीममध्ये महत्त्वाची भूमिका बजावल्याचे मानले जाते.
China is quietly preparing for a post-Xi future—but not by naming a single heir. This program analyzes insider reports of five potential successors, factional deadlock within the CCP, and why multiple “crown princes” signal instability, not strength. Watch the full video here:… pic.twitter.com/zFP58O2R3S — Lei’s Real Talk (@LeisRealTalk) January 23, 2026
credit – social media and Twitter
विशेष म्हणजे, मिंगझे यांचे शिक्षण अमेरिकेत झाले आहे. सध्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चिनी विद्यार्थ्यांच्या व्हिसावर कडक निर्बंध लादले आहेत. अशा वेळी जिनपिंग यांची मुलगी अमेरिकेत पुन्हा शैक्षणिक कार्यासाठी परतणार की वडिलांच्या खांद्याला खांदा लावून बीजिंगमध्ये सत्तेची सूत्रे हाती घेणार, हा मोठा प्रश्न आहे. जर मिंगझे यांना राजकारणात उतरवले गेले, तर तो चीनमधील ‘राजपुत्र’ (Princelings) संस्कृतीचा सर्वात मोठा विजय मानला जाईल.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Republic Day 2026: ड्रॅगन आणि हत्तीची जोडी पुन्हा एकत्र; शी जिनपिंग यांचा पंतप्रधान मोदींना संदेश, म्हटले, ‘दोन्ही देश…’
चीनच्या राज्य माध्यमांनी इशारा दिला आहे की, जे अधिकारी केवळ सत्ता बदलाची वाट पाहत निष्क्रिय बसले आहेत, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. जिनपिंग यांना असा वारसदार हवा आहे जो केवळ त्यांच्या रक्ताचा नसेल, तर त्यांच्या ‘चायनीज ड्रीम’ (Chinese Dream) या स्वप्नाला पुढे नेईल. २०२७ च्या काँग्रेसमध्ये मिंगझे यांना एखाद्या प्रांतीय समितीत किंवा युवक आघाडीत महत्त्वाचे पद देऊन त्यांच्या राजकीय प्रवासाची अधिकृत सुरुवात होऊ शकते, अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे.