
Finger On Trigger
इराणने अमेरिकेला या पोस्टरमधून एक महत्वपूर्ण आणि चिथावणीखोर संदेश दिला आहे. यातून इराणने म्हटले आहे की, जर अमेरिकेने इराणवर लष्करी हल्ला केला तर त्यांना विनाशकारी प्रत्युत्तराचा सामना करावा लागेल. या पोस्टरमध्ये एक अमेरिकन नैदलाची युद्धनौका उद्ध्वस्त होताना दाखवण्यात आली आहे. युद्धाच्या आगीत विमाने डेकवर पडली आहे, हजारो मृतदेह पडले आहे. समुद्रामध्ये रक्त ओसांडून वाहत आहे, असे दाखवण्यात आले आहे. समुद्रातील लाल रंग अमेरिकेतील ध्वजाचा आणि पांढऱ्या पट्ट्यांसारखी आकृती तयार करत आहे. तसेच इंग्रजी आणि फारसी भाषेत यावर अमेरिकेला थेट इशारा देणार संदेश लिहिण्यात आला आहे.
गेल्या काही आठवड्यांपासून अमेरिका आणि इराणमधील तणाव प्रचंड वाढला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी अलीकडेच इराणला कडक इशारा दिला होता. तसेच त्यांनी अमेरिकन नौदलाच्या युद्धनौकांचा मोठा ताफा इराणच्या दिशेनेही रवाना झाले होते. यावर इराणने देखील अमेरिकेने हल्ला केल्यास त्यांना प्रत्युत्तर दिले जाईल अशी चिथावणी दिली होती.
इराणमध्ये गेल्या महिन्यात डिसेंबर २०२५ च्या अखेरीस खामेनेई सरकाविरोधात आंदोलन सुरु झाले होते. वाढती महागाई, आणि कोसळलेल्या अर्थव्यवस्थेमुळे हे आंदोलन छिडले होते. याचा इराण सरकारने क्रूरपणे बीमोड केल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला आहे. परंतु हे आरोप इराणच्या सरकारने फेटाळले असून त्यांच्यावर हल्ला झाल्यास योग्य प्रत्युत्तर देण्यात येईल असे म्हटले आहे. इराणने म्हटले आहे की, आमचे सैन्य कोणत्याही क्षणा हल्ला करण्यास तयार आहे, आमचे बोट आता ट्रिगरवर आहे. असा इशारा इराणने अमेरिकेला दिला आहे.
इराणने अमेरिकेला त्यांच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप न करण्याचा इशारा दिला आहे. परंतु यामुळे अमेरिका अधिक आक्रमक झाली असून मध्यपूर्वेत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या नेमका कुठून हल्ला होईल हे सांगणे कठीण असून इराणमधील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. शिवाय इराणमध्ये इंटरनेट ब्लॅकआउट असल्याने तेथील नेमकी परिस्थिती समजणे कठीण आहे.
President Trump @realDonaldTrump, @POTUS the IRGC has just unveiled a new mural in Tehran’s Enqelab Square, explicitly depicting attacks on US aircraft carriers.
The IRGC and the Regime’s Leader continue to mock and threaten you personally.
While they lie about “peace,” their… pic.twitter.com/7tcNCBztN5 — Behnam Gholipour (@beehnam) January 25, 2026
काय आहे इराणचे Nuclear गुपित? अमेरिकेच्या ‘त्या’ गुप्त अहवालाने जगभरात खळबळ, इस्रायलही हादरला
Ans: इराणने अमेरिकेला राजधानी तेहरानच्या मध्यभागी एक मोठा पोस्टर लावत युद्धाची चिथावणी दिली आहे.
Ans: इराणने लावलेल्या पोस्टमध्ये एक अमेरिकन एअरक्राफ्ट, जळमणारी विमाने, स्फोट, मृतदेह आणि समुद्रात वाहणारे रक्त दाखवण्यात आले असून यावर इंग्रजी आणि फारसी भाषेत Ir you sow the wind, you shall real the whirlwind असे लिहिले आहे.