Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 24 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

China Tick Virus : चीनमध्ये सापडला नवा धोकादायक ‘टिक नोरोव्हायरस’; तीव्र ताप आणि डोकेदुखीने नागरिक त्रस्त

China Tick Virus : चिनी शास्त्रज्ञांच्या मते, उंदरांवरील प्रयोगांदरम्यान या विषाणूचा शोध लागला आणि त्यानंतर सर्वसामान्य लोकांवर त्याची चाचणी करण्यात आली. मात्र, हा विषाणू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरत नाही.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Sep 10, 2026 | 03:58 PM
Asian Longhorned Tick Nairovirus China New tick borne virus China 2026

Asian Longhorned Tick Nairovirus China New tick borne virus China 2026

Follow Us
Follow Us:
  • नवीन विषाणूचा शोध
  • संसर्गाची लक्षणे
  • मानवाकडून मानवाला संसर्ग नाही

जागतिक आरोग्य जगताचे लक्ष पुन्हा एकदा चीनमधील (China Tick Virus) एका वैद्यकीय संशोधनाकडे वेधले गेले आहे. प्रसिद्ध वैद्यकीय मासिक ‘द न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन’ (The New England Journal of Medicine) मध्ये नुकत्याच प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, चिनी शास्त्रज्ञांनी ‘एशियन लाँगहॉर्नड टिक नोरोव्हायरस’ (Asian Longhorned Tick Nairovirus – ALTNV) नावाच्या एका नवीन विषाणूचा शोध लावला आहे. बीजिंगमधील ‘स्टेट की लॅबोरेटरी ऑफ पॅथोजेन्स अँड बायोसिक्युरिटी’ येथील संशोधकांनी केलेल्या तपासात हा विषाणू मुख्यत्वे प्राण्यांच्या शरीरावर आढळणाऱ्या विशिष्ट गोचिडीच्या (Ticks) माध्यमातून माणसांमध्ये पसरत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

२०१९ च्या शेवटी चीनमध्ये कोरोना विषाणूचा उद्रेक झाला होता आणि त्यानंतर संपूर्ण जगाला भीषण महामारीचा सामना करावा लागला होता. त्यामुळे चीनमध्ये कोणत्याही नवीन विषाणूचा शोध लागताच आंतरराष्ट्रीय आरोग्य संघटना आणि जगभरातील वैद्यकीय तज्ज्ञ सतर्क होतात. या नवीन गोचिडजन्य विषाणूची लागण झाल्यानंतर रुग्णांमध्ये तीव्र ताप, सतत डोकेदुखी, थकवा, आम्लपित्त, मळमळ आणि पचनाशी संबंधित गंभीर समस्या दिसून येत आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Philippines Ferry Fire: फिलीपिन्समध्ये समुद्रात मोठी दुर्घटना! ‘MV June Aster’ फेरीला भीषण आग लागून 5 मृत, 87 बेपत्ता, VIDEO

चीनमधील प्रांतांमध्ये प्रसार आणि वैद्यकीय चाचण्यांचे निष्कर्ष

संशोधकांनी चीनमधील १५ हून अधिक प्रांतांमध्ये या विषाणूचा प्रभाव पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वैद्यकीय चाचण्या घेतल्या. सुमारे ३,१६३ अशा लोकांचे नमुने तपासण्यात आले ज्यांना गोचिड चावल्याचा इतिहास होता किंवा ज्यांच्यामध्ये तीव्र तापाची लक्षणे दिसून येत होती. या चाचण्यांमध्ये सुमारे १०.४ टक्के लोकांमध्ये या नवीन विषाणूच्या संसर्गाची पुष्टी झाली आहे.

प्राथमिक टप्प्यात उंदरांसारख्या प्राण्यांवर केलेल्या प्रयोगांनंतर शास्त्रज्ञांनी मानवी रुग्णांमधील रक्ताचे नमुने तपासून या विषाणूच्या संरचनेचा अभ्यास केला. हा विषाणू शरीरात प्रवेश केल्यानंतर रक्तातील प्लेटलेट्सची (Platelets) संख्या झपाट्याने कमी करतो आणि यकृताच्या कार्यावर वाईट परिणाम करतो.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Trump911Claim : ‘दोन अग्निशामकांनी मला उचलून…’ 9/11 बाबत ट्रम्प यांनी मारल्या थापा; अमेरिकन मीडियाने केला ‘असा’ पर्दाफाश

हा विषाणू किती धोकादायक आहे? संसर्गाची पद्धत काय?

या आजाराबाबत दिलासादायक आणि चिंतेची अशी दोन्ही अंगे समोर आली आहेत. मुख्य दिलासा म्हणजे हा विषाणू कोरोनासारखा हवेतून पसरत नाही किंवा संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने लगेच एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे संक्रमित होत नाही. गोचिड चावल्यामुळेच हा विषाणू मानवी शरीरात प्रवेश करतो. यामुळे जागतिक पातळीवर त्वरित महामारी पसरण्याची शक्यता कमी मानली जात आहे.

तथापि, धोकादायक बाब म्हणजे, जर या विषाणूचा संसर्ग एखाद्या रुग्णाला आधीपासूनच असलेल्या दुसऱ्या विषाणूसोबत (जसे की डाबी बांडाव्हायरस किंवा SFTS संबंधित विषाणू) झाला, तर परिस्थिती अत्यंत गंभीर बनते. अशा दुहेरी संसर्गाच्या (Coinfection) प्रकरणांमध्ये रुग्णांना श्वसनाचा त्रास आणि मूत्रपिंडाच्या (Kidney) समस्या निर्माण होतात. संशोधकांच्या मते, अशा संयुक्त संसर्गाच्या स्थितीत मृत्यूदर १० ते ३० टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतो.

अमेरिकन तज्ज्ञांचे मत आणि खबरदारीचे उपाय

अमेरिकेतील संसर्गजन्य रोग तज्ज्ञ डॉ. टायलर इव्हान्स आणि इतर आंतरराष्ट्रीय वैद्यकीय तज्ज्ञांनी या संशोधनावर चिंता व्यक्त केली आहे. त्यांच्या मते, ही गोचिड अंडी घालण्याची क्षमता वेगाने वाढवते, ज्यामुळे ग्रामीण व शेतीशी संबंधित भागात हा विषाणू वेगाने पसरू शकतो. अमेरिकेतही काही रुग्णांमध्ये अशीच लक्षणे आढळल्याची चर्चा असून तिथल्या आरोग्य संस्था यावर बारीक लक्ष ठेवून आहेत.

वैज्ञानिक सध्या या विषाणूला निष्प्रभ करण्यासाठी आणि संसर्ग रोखण्यासाठी लस (Vaccine) व योग्य औषधोपचार विकसित करण्याच्या कामात व्यस्त आहेत. गोचिड चावण्यापासून बचाव करणे, शेतात किंवा जंगलात जाताना पूर्ण कपडे घालणे आणि कीटकरोधक क्रीमचा वापर करणे हे या आजारापासून वाचण्याचे सध्यातरी प्रभावी मार्ग मानले जात आहेत.

Web Title: China scientists discover new asian longhorned tick borne virus symptoms

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2026 | 03:58 PM

Topics:  

  • China
  • virus
  • World news

संबंधित बातम्या

UNGA2026: संयुक्त राष्ट्र महासभेत भारताची मोठी घोषणा; भारताच्या अणुतंत्रज्ञानाचा जगाला होईल फायदा, अनेक देशांनी मानले आभार
1

UNGA2026: संयुक्त राष्ट्र महासभेत भारताची मोठी घोषणा; भारताच्या अणुतंत्रज्ञानाचा जगाला होईल फायदा, अनेक देशांनी मानले आभार

Defense News: सौदीनंतर आफ्रिकेतही भारतीय लष्कराचा डंका; 600 नायजेरियन सैनिकांना भारतात मिळणार जंगल अन् पर्वतीय युद्धाचे धडे
2

Defense News: सौदीनंतर आफ्रिकेतही भारतीय लष्कराचा डंका; 600 नायजेरियन सैनिकांना भारतात मिळणार जंगल अन् पर्वतीय युद्धाचे धडे

Be Ready UK : ब्रिटनमध्ये 2026 साठी महासंकटाची चाहूल? तीन दिवस पुरेल इतका साठा घरी ठेवण्याचा सरकारी सल्ला
3

Be Ready UK : ब्रिटनमध्ये 2026 साठी महासंकटाची चाहूल? तीन दिवस पुरेल इतका साठा घरी ठेवण्याचा सरकारी सल्ला

Manuel Otto: वयाच्या 14 व्या वर्षी बनवली 4 कोटींची गेम; पण ‘या’ प्रसिद्ध डेव्हलपरने लाईव्ह स्ट्रीमदरम्यान का उचलले टोकाचे पाऊल?
4

Manuel Otto: वयाच्या 14 व्या वर्षी बनवली 4 कोटींची गेम; पण ‘या’ प्रसिद्ध डेव्हलपरने लाईव्ह स्ट्रीमदरम्यान का उचलले टोकाचे पाऊल?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.