China unveils 40,000-ton warship with deadly weapons to public Type 076 amphibious assault ship
Type 076 amphibious assault ship : चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी (PLA) नौदलाच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित भव्य कार्यक्रमांमध्ये चीनने आपल्या सर्वात प्रगत आणि प्रचंड क्षमतेच्या युद्धनौकांपैकी एक ‘Type 076 amphibious assault ship’ प्रथमच जनतेसाठी खुले केले आहे. सुमारे ४०,००० टन वजनाची, आधुनिक शस्त्रांनी सज्ज ही युद्धनौका चीनच्या नौदल शक्तीचे प्रदर्शन करणारा एक महत्त्वाचा भाग ठरत आहे.
हे जहाज २०१९ मध्ये लाँच करण्यात आले होते आणि एप्रिल २०२१ मध्ये नौदलात सामील झाले. या युद्धनौकेचे यावर्षी हैनान प्रांतातील चेंगमाई काउंटी येथील माकुन पोर्ट टर्मिनलवर प्रथमच जनतेसाठी दरवाजे खुले झाले. गुरुवारपासून शनिवारपर्यंत या युद्धनौकेला भेट देण्यासाठी सर्वसामान्यांना संधी देण्यात आली आहे.
युद्धनौका जनतेसाठी खुली करण्याचा हा निर्णय लष्करी आत्मविश्वास, पारदर्शकता आणि जनतेशी नातं मजबूत करण्याचा प्रयत्न असल्याचे चीनचे म्हणणे आहे. माजी पीएलए प्रशिक्षक सॉन्ग झोंगपिंग यांनी म्हटले की, “ही जनतेसाठी उघडलेली प्रदर्शने चीनच्या वाढत्या लष्करी शक्तीचा आणि राष्ट्रीय हितसंपत्तीच्या रक्षणाच्या निर्धाराचा पुरावा आहे.”
या प्रदर्शनात ३० हून अधिक युद्धनौका सहभागी असून त्या चीनच्या विविध किनारी शहरांमध्ये उत्तरेकडील किनहुआंगदाओ, पूर्वेकडील शांघाय, आणि दक्षिणेकडील ग्वांगझू येथे मांडण्यात आल्या आहेत. त्यातल्या अनेक जहाजांनी आंतरराष्ट्रीय मोहिमांमध्ये भाग घेतला आहे – जसे की एडन आखातातील चाचणी मोहिमा, परदेशी बंदरांना भेटी आणि बहुराष्ट्रीय सराव.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : पहलगाम हल्ल्यानंतर भारताची आक्रमक भूमिका; पाकिस्तान सतर्क, अरबी समुद्रात क्षेपणास्त्रांचा सराव सुरू
‘टाइप ०७५’ ला ‘लँडिंग हेलिकॉप्टर डॉक’ म्हणूनही ओळखले जाते. हे २३० मीटर लांब आणि ३६ मीटर रुंद असून त्यावर ६ हेलिकॉप्टर लँडिंग स्पॉट्स आहेत. याशिवाय, ड्रोनसाठी स्वतंत्र विभाग, शक्तिशाली लिफ्ट्स आणि हँगर ते डेकवर हेलिकॉप्टर हलवण्याची क्षमता हे याचे खास वैशिष्ट्य आहे.
🚨 China launches world’s largest amphibious assault warship
The first Type 076 landing helicopter dock (LHD), CNS Sichuan (51), made its debut in Shanghai on Friday and features “significant technological upgrades that place it in a class above its peers.”
Here’s what we know: pic.twitter.com/wNf4OC0C9b
— Ian Ellis (@ianellisjones) December 27, 2024
credit : social media
हे जहाज ३० रोटरी-विंग विमाने वाहून नेऊ शकते, ज्यात Z-8, Z-18, Z-20 हेलिकॉप्टर, मानवरहित हवाई वाहने (UAV) आणि संभाव्य आक्रमक हेलिकॉप्टरचा समावेश आहे. ११०० पेक्षा अधिक खलाशी असलेल्या या नौकेला तैवानसंबंधी संभाव्य संघर्षात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणारी युद्धनौका म्हणून मानले जात आहे.
या कार्यक्रमात PLA चे हॉस्पिटल जहाज ‘पीस आर्क’ यावेळी प्रथमच टियांजिन बंदरात दाखल झाले. तसेच टाइप ०५२डी गाईडेड-मिसाइल डिस्ट्रॉयर ‘नानजिंग’ आणि टाइप ०५६ए गाईडेड-मिसाइल कॉर्व्हेट ‘लुआन’ या नौका ताईझोऊ येथे ‘ओपन हाऊस’ कार्यक्रमासाठी पोहोचल्या आहेत. याव्यतिरिक्त, टाइप ०७१ ट्रान्सपोर्ट डॉक, टाइप ०५४ए फ्रिगेट, टाइप २२ मिसाइल बोट यांसारख्या जहाजाही जनतेसाठी खुल्या करण्यात आल्या आहेत. काही नौदल तळ व लष्करी बंदरेही पर्यटकांसाठी खुले करण्यात आले असून, तेथील नागरिक नौदल संस्कृतीचा प्रत्यक्ष अनुभव घेऊ शकतात.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : भारताच्या कारवाईच्या संकेताने पाकिस्तान हादरला; संरक्षण मंत्र्यांचा इशारा, सिंधू पाणी करारावरही चिंता
विश्लेषकांच्या मते, चीनची ही रणनीती केवळ लष्करी ताकद दाखवण्यापुरती मर्यादित नाही, तर ती जनतेशी भावनिक नातं जोडण्याचा प्रयत्न आणि जागतिक पातळीवर सामर्थ्याचं सूचक प्रदर्शन आहे. तैवानवरचा दबाव, दक्षिण चीन समुद्रातील तणाव, आणि अमेरिका-जपानसारख्या देशांच्या कृतीच्या पार्श्वभूमीवर ही योजना चीनचा नवीन लष्करी जनसंपर्क मॉडेल ठरू शकते. एकूणच, ‘टाइप ०७५’सारख्या युद्धनौका जनतेसाठी खुल्या करणे हे केवळ प्रदर्शन नव्हे, तर चीनचा संयुक्त लष्करी, सामाजिक आणि राजकीय संदेश असल्याचे स्पष्ट होते.