पहलगाम हल्ल्यानंतर भारताची आक्रमक भूमिका, पाकिस्तान हाय अलर्टवर; अरबी समुद्रात क्षेपणास्त्रांचा सराव सुरू ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या निर्घृण हल्ल्यात २६ निष्पाप नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले. या पार्श्वभूमीवर भारताने तातडीने कडक कारवाईचे संकेत दिले असून, त्यानंतर पाकिस्तानने आपल्या युद्धनौकांना अरबी समुद्रात क्षेपणास्त्र सरावासाठी सज्ज केले आहे.
भारताच्या तात्काळ हालचालींमुळे पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली असून, पाक नौदलाने २४ एप्रिलच्या सकाळपासून २५ एप्रिलच्या दुपारी ४ वाजेपर्यंत अरबी समुद्रात क्षेपणास्त्र डागण्याचा सराव सुरू केला आहे. पाकिस्तानने याची माहिती आंतरराष्ट्रीय सागरी सुरक्षा संस्था UKMTO (United Kingdom Maritime Trade Operations) ला दिली आहे.
जम्मू-काश्मीरमधील पर्यटकांचे आवडते ठिकाण असलेल्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याने देशाला हादरवून सोडले आहे. अज्ञात दहशतवाद्यांनी २६ नागरिकांवर अंदाधुंद गोळीबार करत त्यांची हत्या केली. या घटनेने देशभरात संतापाची लाट उसळली आहे. हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ‘अर्जन सिंह स्मृती व्याख्यानात’ बोलताना या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला. ते म्हणाले, “भारत हे सहन करणार नाही. आम्ही योग्य वेळेवर योग्य उत्तर देऊ. दोषींना शिक्षा होईलच.”
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : भारताच्या कारवाईच्या संकेताने पाकिस्तान हादरला; संरक्षण मंत्र्यांचा इशारा, सिंधू पाणी करारावरही चिंता
#BREAKING Pakistan announces live-fire naval drills for tomorrow, in the Arabian Sea, near its maritime border with India.@rwac48@arunp2810@SPS_Shahid@LancerFlying @goldenarcher @reportersujan @VishnuNDTV @ParthSatam pic.twitter.com/3rwADW3Nvo
— Sandeep Mukherjee (@Libertarian196) April 24, 2025
credit : social media
भारताने पहलगाम हल्ल्यानंतर तातडीने केंद्रीय सुरक्षा समितीची (CCS) उच्चस्तरीय बैठक बोलावली. या बैठकीत देशाच्या सुरक्षा यंत्रणांनी संभाव्य प्रतिसादाबाबत चर्चा केली. यानंतर, पाकिस्तानने देखील घाईघाईने आपली राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक बोलावली आहे, जी २४ एप्रिल रोजी होणार आहे. पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी ही माहिती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वर शेअर केली. त्यांनी सांगितले की, भारताच्या कारवाईच्या संभाव्यतेमुळे ही बैठक आयोजित केली जात आहे.
दरम्यान, पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी या हल्ल्याशी इस्लामाबादचा काहीही संबंध नसल्याचे वक्तव्य केले. परंतु त्यांनी या हल्ल्याचा निषेध करण्याचे टाळले. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी करत हल्ल्यात झालेल्या जीवितहानीबद्दल चिंता व्यक्त केली, मात्र त्यास ‘दहशतवादी हल्ला’ म्हणणे टाळले. भारताने या दुहेरी भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, पाकिस्तानवर हल्ल्याला पाठिंबा देणाऱ्या गटांचे समर्थन केल्याचा आरोप केला आहे.
पाकिस्तानच्या युद्धनौकांनी सुरू केलेला सराव, विशेषतः अत्याधुनिक क्षेपणास्त्र डागण्याचा सराव, हा भारताच्या हालचालींना उत्तर देण्यासाठी असल्याचे लष्करी विश्लेषकांचे म्हणणे आहे. हा सराव सामान्य सराव नसून, भारताला संदेश देण्याचा एक प्रयत्न असल्याचे मानले जाते. मात्र भारत या प्रकारच्या दडपणांना भीक घालणार नाही, असे स्पष्ट संकेत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिले आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2025: पंचायती राज म्हणजे काय? पंतप्रधान मोदी आज ‘या’ व्यक्तींना करणार पुरस्कार प्रदान
पहलगाममधील निर्दोष नागरिकांच्या हत्येमुळे भारत आता निर्णायक भूमिका घेण्याच्या मार्गावर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरक्षा यंत्रणा सज्ज आहेत, आणि दहशतवाद्यांना, तसेच त्यांच्या पाठराखण करणाऱ्यांना याची मोठी किंमत मोजावी लागणार आहे. पाकिस्तानचा क्षेपणास्त्र सराव आणि राजकीय बचावात्मक पवित्रा हे फक्त घबराटीचे लक्षण आहेत, पण भारताची कारवाई केवळ सुरक्षेची गरज नाही, तर राष्ट्राच्या आत्मसन्मानाशी जोडलेली आहे – आणि ती लवकरच प्रत्यक्षात दिसू शकते.