Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 29 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चीनची तैवानविरोधात उकसवणारी कारवाई; लष्करी हालचालींवर तणाव वाढला

तैवानवर आपला हक्क सांगणाऱ्या चीनने पुन्हा एकदा उकसावणाऱ्या कारवाया केल्या आहेत. तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, चीनने तैवानच्या आसपास 14 युद्धनौका, 7 लष्करी विमाने पाठवले आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 08, 2024 | 04:41 PM
चीनची तैवानविरोधात उकसवणारी कारवाई; लष्करी हालचालींवर तणाव वाढला

चीनची तैवानविरोधात उकसवणारी कारवाई; लष्करी हालचालींवर तणाव वाढला

Follow Us
Follow Us:

ताइपे: तैवानवर आपला हक्क सांगणाऱ्या चीनने पुन्हा एकदा उकसावणाऱ्या कारवाया केल्या आहेत. तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, चीनने तैवानच्या आसपास 14 युद्धनौका, 7 लष्करी विमाने पाठवले आहेत. हे सर्व प्रकरण अशा वेळी घडले आहे जेव्हा तैवानचे राष्ट्रपती लाई चिंग-ते यांनी अमेरिकेसह प्रशांत क्षेत्रातील सहकारी देशांचा दौरा केला. या दौऱ्याच्या प्रतिक्रियेत चीनकडून लष्करी सरावाची शक्यता वर्तवली जात होती.

याच दरम्यान आपल्या शेवटच्या दौर्यावर असताना लाई चिंग-ते यांनी चीनला शांततेचा मार्गाने शेजारी देशांशी मैत्री करण्याचा सल्ला दिला होता. मिळालेल्या माहितीनुसार, चीनने तैवानच्या जलडमरूमध्यातील मध्य रेषा ओलांडणाऱ्या विमानांची हालचाल केली आहे. त्यातील एक लष्करी हवाई बलून तैवानच्या उत्तरेकडून गेला असल्याची नोंद करण्यात आली आहे. चीन तैवानला आपला भाग मानतो आणि तैवानच्या परराष्ट्र संबंधांवर आक्षेप घेतो. तैवान हा स्वायत्त प्रदेश असून 2.3 कोटी लोकसंख्या असलेला हा देश चीनच्या ताब्यात जाण्यास तयार नाही.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- रशियाविरुद्धच्या युद्धात युक्रेनला मोठा दिलासा; अमेरिका पुन्हा करणार एक अब्ज डॉलर्सची मदत

चीनची आक्रमक भूमिका

चीनने तैवानवर नियंत्रण मिळवण्यासाठी लष्करी शक्तीचा वापर करण्याची धमकी दिली आहे. यामुळे मागील काही वर्षांत तैवानच्या हवाई आणि सागरी क्षेत्रात चीनच्या लष्करी हालचाली वाढल्या आहेत. यामध्ये युद्धनौका, लढाऊ विमाने आणि इतर लष्करी संसाधनांचा वापर करून चीन सतत दबाव वाढवत आहे. चीनच्या तट रक्षकांनीही या प्रदेशात गस्त वाढवली आहे.

फोटो सौजन्य: सोशल मीडिया

तैवानचे समर्थन करणारा अमेरिका

तैवानला स्वतंत्र मान्यता देण्यास नकार देत अमेरिका त्याचा महत्त्वाचा अनौपचारिक पाठीराखा आहे. अमेरिकेकडून तैवानला शस्त्रास्त्र पुरवठा केला जातो, यामुळे तैवानची लष्करी क्षमता वाढत आहे. चीन यावर तीव्र नाराजी व्यक्त करत असून तैवानला इतर देशांपासून अलग करण्याचा प्रयत्न करीत आहे. चीन-अमेरिका संबंध बिघडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर, तैवान व अमेरिका यांचे संबंध अधिक दृढ होत आहेत, तर चीनने आपली नाराजी व्यक्त करत प्रतिकाराची भूमिका घेतली आहे.

तणाव वाढण्याची शक्यता

तैवानच्या संरक्षण मंत्रालयाच्या अहवालानुसार, चीनच्या या हालचाली तैवानच्या सुरक्षेसाठी मोठा धोका निर्माण करत आहेत. चीनच्या वाढत्या हालचालींमुळे तणाव वाढत असून तैवाननेही आपल्या संरक्षणासाठी सतर्कता वाढवली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर या प्रश्नावर चर्चा सुरू असून शांतता राखण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे. सध्याच्या परिस्थितीत तैवान आणि चीनमधील संघर्षाचे रूपांतर मोठ्या संघर्षात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जागतिक समुदायाने या परिस्थितीकडे गांभीर्याने पाहून हस्तक्षेप करणे आवश्यक आहे.

जागतिक घडामोडी संबंधित  बातम्या- ‘धमकी देऊ नका….’; तैवानच्या राष्ट्राध्यक्षांचा चीनला सल्ला; संबंध आणखी ताणावपूर्ण

Web Title: China warships and military aircraft near taiwan island nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 08, 2024 | 04:41 PM

Topics:  

  • America
  • China
  • world

संबंधित बातम्या

Shivali Parab: अमेरिकेत फिरतेय शिवाली परब; गुलाबी फ्रॉकमधील क्यूट लूक पाहून चाहते घायाळ!
1

Shivali Parab: अमेरिकेत फिरतेय शिवाली परब; गुलाबी फ्रॉकमधील क्यूट लूक पाहून चाहते घायाळ!

US Iran war : इराणचा अण्वस्त्र इशारा अन् अमेरिकेची मोठी लष्करी तयारी; होर्मुझच्या सामुद्रधुनीत महायुद्धाची ठिणगी?
2

US Iran war : इराणचा अण्वस्त्र इशारा अन् अमेरिकेची मोठी लष्करी तयारी; होर्मुझच्या सामुद्रधुनीत महायुद्धाची ठिणगी?

Brazil Election: ‘मीच ब्राझीलचा खरा नेता, निवडणुकीत हेराफेरी झाली’ अमेरिकेत पोहोचताच फ्लॅव्हिओ बोल्सोनारो यांचा खळबळजनक दावा
3

Brazil Election: ‘मीच ब्राझीलचा खरा नेता, निवडणुकीत हेराफेरी झाली’ अमेरिकेत पोहोचताच फ्लॅव्हिओ बोल्सोनारो यांचा खळबळजनक दावा

US Nuclear Lab : अमेरिकेच्या प्रमुख अणुप्रयोगशाळेत अचानक भीषण आग; आणीबाणी जाहीर, जाणून घ्या नक्की काय घडले?
4

US Nuclear Lab : अमेरिकेच्या प्रमुख अणुप्रयोगशाळेत अचानक भीषण आग; आणीबाणी जाहीर, जाणून घ्या नक्की काय घडले?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.