China's 14th space launch Galactic Energy sets record with 18 rockets and 77 satellites
बीजिंग : जागतिक अंतराळ क्षेत्रात चीनने पुन्हा एकदा आपल्या सामर्थ्याचा ठसा उमटवला आहे. अवघ्या पाच दिवसांत दोन यशस्वी रॉकेट प्रक्षेपण करत चीनने सहा उपग्रह कक्षेत स्थिर केले आहेत. चीनच्या गॅलेक्टिक एनर्जी या एरोस्पेस कंपनीने हे प्रक्षेपण यशस्वीपणे पार पाडले असून, यामुळे चीनच्या अंतराळ मोहिमांमध्ये नवा विक्रम प्रस्थापित झाला आहे. चीनच्या या यशस्वी मोहिमेमुळे या वर्षातील चीनच्या 14 व्या अंतराळ प्रक्षेपणाची नोंद झाली आहे. आतापर्यंत गॅलेक्टिक एनर्जीने 18 यशस्वी प्रक्षेपण करून 77 उपग्रह कक्षेत पाठवण्याचा विक्रम केला आहे. चीनने अंतराळ क्षेत्रातील आपली पकड आणखी मजबूत केली असून, भविष्यातील मोहिमांसाठी स्वतःला सिद्ध केले आहे.
शुक्रवारी, CERES-1 Y17 रॉकेटचे प्रक्षेपण चीनच्या वायव्य भागातील जिउक्वान उपग्रह प्रक्षेपण केंद्रातून करण्यात आले. या मोहिमेअंतर्गत, सहा उपग्रह 535 किलोमीटर उंचीच्या सूर्य-समकालिक कक्षेत (SSO) ठेवण्यात आले. हे उपग्रह युन्याओ अंतराळ-आधारित हवामान निरीक्षण नेटवर्कचा भाग आहेत. या मोहिमेचा मुख्य उद्देश तापमान, आर्द्रता आणि दाबासारख्या हवामानासंबंधी महत्त्वाच्या डेटा गोळा करणे आणि अचूक हवामान अंदाज तयार करणे हा आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : T Coronae Borealis: ब्रह्मांडात होणार मोठा स्फोट, पृथ्वीवरूनही दिसणार ‘हे’ विलोभनीय दृश्य; जाणून घ्या दिवस आणि वेळ
या मोहिमेअंतर्गत कक्षेत पाठवण्यात आलेले उपग्रह युन्याओ 43-48 उपग्रहांच्या श्रेणीत मोडतात. हे उपग्रह युन्याओ नक्षत्राचा एक भाग आहेत, ज्याचे उद्दिष्ट कक्षेत 90 व्यावसायिक हवामान उपग्रहांचे जागतिक नेटवर्क तयार करणे आहे. या उपग्रह प्रणालीच्या मदतीने जागतिक स्तरावर रिअल-टाइम वातावरण आणि आयनोस्फेरिक ओळख प्रणाली विकसित केली जाणार आहे. विशेषतः चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हमध्ये सहभागी असलेल्या देशांना जलद आणि अचूक हवामान अंदाज देण्यासाठी ही प्रणाली अत्यंत उपयुक्त ठरेल.
गॅलेक्टिक एनर्जीच्या CERES-1 रॉकेट मॉडेलने आतापर्यंत 18 यशस्वी प्रक्षेपण पार पाडले असून, 77 उपग्रहांना त्यांच्या पूर्वनिश्चित कक्षेत स्थापित केले आहे. ही कंपनी चीनच्या खाजगी एरोस्पेस क्षेत्रात सर्वाधिक रॉकेट प्रक्षेपण आणि उपग्रह वितरण करणारी कंपनी म्हणून ओळखली जात आहे. तिच्या यशस्वी प्रक्षेपण दराने ती चीनमधील आघाडीची खाजगी एरोस्पेस कंपनी ठरली आहे.
चीनने मागील काही वर्षांत अंतराळ क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. अमेरिका आणि रशियासोबत स्पर्धा करत चीनने आपल्या उपग्रह तंत्रज्ञानाला मोठे बळ दिले आहे. चीनने याआधीही चंद्र आणि मंगळ मोहिमांमध्ये आपली क्षमता सिद्ध केली आहे. या नवीन उपग्रह नेटवर्कमुळे हवामान अंदाज प्रणाली अधिक प्रगत होईल, जी जागतिक पातळीवर हवामान नियंत्रण आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी अत्यंत महत्त्वाची ठरेल.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ऐकावं ते नवलच! इलॉन मस्क यांची कन्या विवियनचा मोठा गौप्यस्फोट; भाऊ बहिणींबद्दल केले ‘असे’ भाष्य
चीनच्या अंतराळ मोहिमांचा वेग आणि प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. अवघ्या पाच दिवसांत दोन यशस्वी प्रक्षेपण करून सहा उपग्रह कक्षेत पाठवणे ही चीनसाठी एक मोठी उपलब्धी मानली जात आहे. या यशस्वी मोहिमांमुळे चीनचे जागतिक अंतराळ क्षेत्रातील वर्चस्व आणखी बळकट होत असून, भविष्यात अमेरिका आणि रशियाला टक्कर देण्यास चीन पूर्णपणे सक्षम आहे.