Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

China Ice Silk Road : आर्क्टिकमधून चीनचा नवा सागरी मार्ग; अमेरिकेसोबत तणाव वाढण्याची शक्यता

China Ice Silk Road : चीन आर्क्टिक प्रदेशातून जाणाऱ्या ‘Ice Silk Road’च्या माध्यमातून युरोपशी व्यापारासाठी नवा सागरी पर्याय विकसित करत आहे. हा मार्ग पारंपरिक समुद्री मार्गांच्या तुलनेत कमी अंतराचा ठरू शकतो मात्र आर्क्टिकमधील पर्यावरणीय धोके आणि चीन-रशिया-अमेरिका यांच्यातील रणनीतिक स्पर्धा यामुळे मार्गाचे महत्त्व अधिक वाढले आहे .

  • By Chaitanya Pisal
Updated On: Aug 19, 2026 | 05:17 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • चीन अमेरिकेमध्ये महासत्तेसाठी कुरघोडी
  • हा मार्ग शाश्वत पर्याय ठरू शकतो का ?
  • अमेरिकेसाठी हा मार्ग का महत्वाचा ?
China Ice Silk Road : ICE Silk Road म्हणजे मुख्यतः रशियाच्या उत्तरेकडील किनाऱ्यालगतचा Northern Sea Route ( NSR ) हा मार्ग चीन युरोप मधील समुद्री प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी करू शकतो . ऑगस्ट २०२६ मध्ये चीनच्या एका कंपनीने या मार्गावर नियमित व्यवसायिक सेवा सुरु केल्याचे समजते आहे .

चीन अमेरिकेमध्ये महासत्तेसाठी कुरघोडी

सुरवातीला रशिया आणि अमेरिके मध्ये महासत्ता होण्याची स्पर्धा लागली होती . अर्थात अजून ही स्पर्धा पूर्णपणे संपली आहे असे म्हणता येणार नाही . पण पूर्वी सारखा आता रशियाचा प्रभाव जगभरात राहिला नाही . खास करून सोव्हियेत संघाच्या विघटनानंतर , यानंतर अमेरिका मात्र आपले स्थान टिकवून ठेवायला यशस्वी झाली .

पण पुढील काही काळानंतर चीन हळूहळू सर्वच बाबतीत सुधारणा करत मार्गक्रमण करू लागला . आणि जगाच्या लक्षात यायला लागलं किंबहुना अमेरिकेच्या हे लक्षात यायला लागला कि रशिया , भारत हा सध्या आणि भविष्यातील आपला महासत्तेच्या दृष्टीने विरोधक नसून चीन आहे . विज्ञान , तंत्रज्ञान , गरिबी , बांधकाम , विविध वस्तू उत्पादन , शिक्षण , आरोग्य व्यवस्था इत्यादी अनेक सर्वच पातळीवर चीन प्रगती करू लागला .

अर्थात अमेरिकेने त्यात अडथळे आणण्याचे प्रयत्न केले नाही असे नाही . पण प्रत्यक्षात अमेरिका चीन ठळकपणे विरोध करू शकत नसला तरी दोन्ही देशांमध्ये आता एक सुप्त संघर्ष सुरु झाला आहे . याचे उदाहरण द्यायचे झाले तर बऱ्याच गोष्टी आहेत . जसं कि चीन ला सेमीकंडक्टर बनवण्यासाठी लागणारी मशीन ही नेदरलँड मधील जगप्रसिद्ध कंपनीकडून मिळू न देणे , त्यावर निर्बंध लादणे इत्यादी आपल्याला सांगता येतील . तेव्हा चीन आणि अमेरिका यांच्यात येणाऱ्या काळात एकमेकांवर कुरघोड्या करणं आणि आपला स्वार्थ साधनं हे सुरूच राहणार आहे . असे जाणकार सांगत असल्याचे समजते .

Russia Ukraine War : युक्रेन युद्धात रशियाला सर्वात मोठा धक्का; 14.7 लाखांहून अधिक सैनिकांसह लष्करी साधनसामग्रीचा महाविनाश

हा मार्ग शाश्वत पर्याय ठरू शकतो का ?

या मार्गाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे अंतर आणि वेळ कमी होणे . चीनहून युरोपला जाण्यासाठी पारंपरिक मार्गापेक्षा Arctic Route काही प्रवासांमध्ये जवळपास निम्मा वेळ घेऊ शकतो . त्यामुळे इंधनाचा वापर आणि काही वाहतूक खर्च कमी होण्याची शक्यता आहे . मात्र या यामागे एक मोठी विसंगती आहे .

हा मार्ग अधिक खुला होत आहे कारण Arctic मधील बर्फ वेगाने वितळत आहे . म्हणजेच हवामान बदलामुळे निर्माण झालेल्या परिस्थीचा फायदा घेऊन नवीन व्यापार मार्ग तयार होत आहे . त्यामुळे त्याला आपोआप ग्रीन किंवा पर्यावरणपूरक मार्ग म्हणता येणार नाही .

Major Singh: पंजाब ते अमेरिका गँगस्टर नेटवर्क! जगू भगवानपुरिया टोळीचा 29 वर्षीय गुंड मेजर सिंग FBIच्या ‘रडारवर’, अटक वॉरंट जारी

अमेरिकेसाठी हा मार्ग का महत्वाचा ?

चीनला या मार्गामुळे Suez canal , Red Sea आणि इतर महत्वाच्या समुद्री Chokepoints वरील अवलंबित्व काही प्रमाणात कमी करता येऊ शकते . त्यामुळे हा केवळ व्यापाराचा मार्ग न राहता चीनच्या दीर्घकालीन रणनीतीक धोरणाचा भाग बनू शकतो . चीनने २०१८ मध्येच Arctic shipping विकसित करण्यासाठी Polar silk road उभारण्याची भूमिका मांडली होती .

त्यामुळे Arctic मध्ये चीन रशिया आणि अमेरिका यांच्यातील रणनीतीक सर्प[स्पर्धा आणखी वाढण्याची शक्यता आहे . विशेषतः रशियाच्या नियंत्रणाखालील NSR चा वापर वाढल्यास व्यापाराबरोबरच ऊर्जा , संसाधने ,या आणि लष्करी रणनीतीक उपस्थितीचे महत्वही वाढेल .

 

 

Web Title: Chinas ice silk road a new maritime route through the arctic potential for rising tensions with the us

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 19, 2026 | 05:17 PM

Topics:  

  • China
  • Russia
  • USA

संबंधित बातम्या

Plague Alert: ‘हे एक बायोवेपण…’ रशियातील ‘त्या’ घटनेवर ट्रम्प यांचे मोठे विधान; WHO कडून स्पष्टीकरणाची मागणी
1

Plague Alert: ‘हे एक बायोवेपण…’ रशियातील ‘त्या’ घटनेवर ट्रम्प यांचे मोठे विधान; WHO कडून स्पष्टीकरणाची मागणी

Taiwan-China : तैवानजवळ चीनची लष्करी हालचाल; १४ लढाऊ विमानांसह ८ जहाजांची घुसखोरी, तणाव वाढला
2

Taiwan-China : तैवानजवळ चीनची लष्करी हालचाल; १४ लढाऊ विमानांसह ८ जहाजांची घुसखोरी, तणाव वाढला

Pechora S125 : F-35 ला पाडणारे रशियन क्षेपणास्त्र आता मोबाईल लाँचरवर; जाणून घ्या भारताला कसा होणार मोठा फायदा
3

Pechora S125 : F-35 ला पाडणारे रशियन क्षेपणास्त्र आता मोबाईल लाँचरवर; जाणून घ्या भारताला कसा होणार मोठा फायदा

World News :युरोपच्या कार बाजाराला चीनचा धक्का;व्यापारयुद्धासाठी नवा डाव
4

World News :युरोपच्या कार बाजाराला चीनचा धक्का;व्यापारयुद्धासाठी नवा डाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.