Chinese aircraft and naval forces intrude into Taiwan's territory; Army on alert, possibility of conflict
तैपेई : सध्या तैवान आणि चीनमधील तणाव पुन्हा वाढताना दिसत आहे. दोन्ही देशांमध्ये वाढत्या संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंतेचे वातावरकण निर्माण झाले आहे. याच वेळी एक मोठी माहिती समोर आली आहे. चिनी विमान आणि नौदलाच्या जहाजांनी तैवानच्या समुद्री क्षेत्रात प्रवेश केला असल्याचे तैवानने म्हटले आहे. तसेच तैवानचे लष्कर सध्या हाय अलर्टवर असून योग्य त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने (एमएनडी) दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (२१ जुलै) सकाळी ६च्या सुमारास तैवानच्या हद्दीत एक चिनी युद्धविमान आणि पाच नौदलाची जहाजे घुसखोरी करताना सापडली आहे. यामुळे मोठा गोंधळ उडाला होता. दरम्यान संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार चिनी विमानानचे तैवानच्या सामुद्रधुनीत प्रवेश केला आहे. तसेच तैवानच्या उत्तर हवाऊ सरक्षण क्षेत्रातही घुसखोरी करण्यात आली आहे. यामुळे सध्या तैवानचे लष्कर प्रत्युत्तरात्मक कारवाई केली आहे.
तैवानच्या संरक्षण मंत्रालयाचेन याची माहिती देकाना सांगितले की, ” सोमवारी सकाळी ६ वाजेपर्यंत तैवानभोवती चिनी लष्कराच्या एका लढाऊ विमानाच्या आणि पाच नौदल जहाजांच्या हालचालींची नोंद झाली. सध्या यावर कारवाई करण्यात आली आहे. संरक्षण मंत्रालयाने म्हटले की, सध्या त्यांचे लष्कर परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे, तसेच योग्य त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
तैवानच्या हवाई आणि समुद्री हद्दीत चीनची घुसखोरी तैवानच्या सुरक्षेसाठी धोकादायक मानली जात आहे. यापूर्वी १५ जुलै रोजी देखील तैवानच्या सीमेच चीनची २६ लढाऊ विमाने आणि सात युद्धनौका पाहिल्या होत्या. आतापर्यंत २१ विमानांनी तैवानची सीमारेषा ओलांडली आहे. चीन गेल्या काही काळापासून तैवानवर लष्करी दबाव वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. या पार्श्वभूमीवर तैवानने देखील युद्ध सरावाला सुरुवात केली आहे. कारण चीनच्या या हालचाली युद्धाचे संकेत देत आहेत.
२० जून रोजी देखील चीनने तैवानच्या दिशेने ७४ लढाऊ विमाने पाठवली होती. चीन येत्या सहा महिन्यात तैवानवर मोठा हल्ला करण्याची योजना आखत असल्याची गुप्त माहिती देखील समोर आली आहे. परंतु चीनच्या हल्ल्याने जागितक अर्थव्यवस्थेवर मोठा परिणा होण्याची शक्यता आहे.
चीनच्या सततच्या तैवानच्या हद्दीतील घुसखोरीने अमेरिकेचीही चिंता वाढली आहे. चीन सध्या आपली लष्करी क्षमता मजबूत करण्यात व्यस्त आहे. यामुळे चीन कधीही तैवानवर हल्ला करु शकतो असे म्हटले जात आहे.