'ते मुर्खासारखे वागत आहेत'; इस्रायलच्या सीरियावरील हल्ल्याने संतापला अमेरिका (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचे मित्र इस्रायलचे पंतप्रधान यांच्या वर्तनावर नाराजी व्यक्त केली आहे. इस्रायलने सीरियावर केलेल्या हल्ल्यावर प्रतिक्रिया देत ट्रम्प यांनी नेतन्याहू वेड्यासारखे वागत असल्याचे म्हटले आहे. नुकतेच इस्रायलने सीरियावर काही दिवसांपूर्वी हल्ला केला होता. यामध्ये सीरियाच्या मुख्यालयाला लक्ष्य करण्यात आले होते. सीरियातील ड्रुझ समुदायच्या संरक्षणासाठी हल्ला केल्याचे इस्रायलने म्हटले होते.
दरम्यान व्हाइट हाऊसने इस्रायलच्या या हल्ल्यावर नाराजी व्यक्त केली आहे. व्हाईट हाऊन म्हटले आहे की, नेतन्याहू नियंत्रणाबाहेर गेले आहेत. सतत राजकीय अजेंड्यामागे वेड्यासारखे असल्यासारखे वागत आहेत. व्हाईट हाईसच्या अधिकाऱ्याने ॲक्सिओम वृत्तसंस्थेला ही प्रतिक्रिया दिली आहे. व्हाइट हाऊसने म्हटले आहे की, ट्रम्प शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत असताना इस्रायलच्या या कृत्यांमुळे प्रयत्न असफल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सीरियातमध्ये ड्रुझ समुदायाच्या एका स्थानिक नागरिकाची हत्या करण्यात आली होती. यानंतर ड्रुझ समुदायाने स्वेडा शहरात सीरियाच्या लष्करावर हल्ला केला. यानंततर इस्रायलने बुधवारी १६ जुलै रोजी सीरियाची राजधानी दमास्कमधील अनेक इमारतींवर हल्ला केला. यामध्ये सीरियाच्या मुख्यालयालाही लक्ष्य करण्यात आले होते. सीरियातील ड्रुझ अल्पसंख्यांक समुदायाचे रक्षण करण्याच्या उद्देशाने हल्ला केला असल्याचे इस्रायलने म्हटले होते. यानंतर अमेरिकेने यामध्ये हस्तक्षेप करत सीरियामध्ये युद्धबंदी झाल्याचा दावा केला होता. तसेच हिंसाचाराचे गैरसमज म्हणून वर्णन केले होते.
दरम्यान गाझामध्ये देखील इस्रायली सैन्याच्या कारवाया सुरु आहेत. नुकतेचे इस्रायलमने गाझातील एका कॅथोलिक चर्चवर बॉम्ब हल्ला केला होता. यावर इस्रायलने हा हल्ला चूकुन झाला असल्याचे म्हटसले होते. शिवाय इस्रायलने गाझालीत पॅलेस्टिनी लोकांवर देखील अन्न वाटपादरम्यान गोळ्या झाडल्या होत्या. यामुळेही अमेरिकन प्रशासनात संतापाचे वातावरण आहे. यावर प्रतिक्रिया देताना एका अमेरिकन अधिकाऱ्याने काय मुर्खपणा सुरु आहे, असे म्हटले होते. रोज अशा घटना घडत असल्याचे त्यांनी सांगितले.
अमेरिकेच्या व्हाइट हाऊसच्या अधिकाऱ्याने सांगितले की, सीरियावरील इस्रायलचा हल्ला ट्रम्पसाठी धक्का होता. तसेच गाझातील चर्चवरील हल्लाचेही उत्तर मागीतले होते. ट्रम्प यांनी नेतन्याहूंना माफा मागायला लावली होती. व्हाइट हाईसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी ट्रम्प या घटनांवर नाराज असल्याचे म्हटले आहे.
सीरियातील हल्ला ट्रम्प साठी मोठी समस्या बनला आहे. ट्रम्प यांना सीरियामध्ये शांतता प्रस्थापित करायची आहे. यासाठी त्यांनी सीरियाचे अंतरिम अध्यक्ष अल-जुलानी यांच्या भेटही घेतली होती. तसेच सीरियावरील निर्बंध देखील हटवले होते.