Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

UN मध्ये भारताची खुर्ची निश्चित? चीन करणार बॅटिंग ; दिल्लीतील हाय-लेव्हल बैठकीत गेमचेंजर निर्णय

India China Relations : भारत आणि चीनमधील संबंध आता हळूहळू सुधारताना दिसत आहे. दोन्ही देशांमध्ये सततच्या द्विपक्षीय बैठकांमुळे संबंधांना अधिक बळकटी मिळत आहे. चीनचा भारताला जागतिक स्तरावरही पाठिंबा मिळत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 11, 2026 | 09:36 AM
India China Relations

India China Relations

Follow Us
Follow Us:
  • संयुक्त राष्ट्रात भारताचे स्थान निश्चित?
  • चीन करणार मदत
  • दिल्लीत हाय-लेव्हल बैठकी गेमचेंजर निर्णय
India China Relations : नवी दिल्ली : भारत आणि चीनमधील सीमावादानंतर दोन्ही देशातील संबंध निवळताना दिसत आहेत. गेल्या काही काळापासून दोन्ही देशांनी या संबंधांना अधिक बळकट करण्यासाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. नुकतेच भारताला संयुक्त राष्ट्रात कायमस्वरुपी सदस्यत्व मिळवून देण्यासाठी चीनने (China) पाठिंबा दिला आहे. सध्या चीनचे कार्यवाहक उप-राष्ट्रमंत्री मा झाओक्सू भारताच्या दौऱ्यावर असून त्यांनी नवी दिल्ली येथे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांची मंगळवारी(१० फेब्रुवारी २०२६) भेट घेतली. यावेळी झालेल्या रणनीतिक चर्चेमुळे भारताचे जागतिक राजकारणातील महत्व वाढणार आहे.

भारत-चीन संबंधांना नवी दिशा! दिल्ली-शांघाय थेट उड्डाणे सुरु, अमेरिकेची धाकधूक वाढली

संयुक्त राष्ट्रात भारताच्या भूमिकेचा सन्मान

भारत-चीनच्या या रणनीतिक बैठकीत संयुक्त राष्ट्रातील सुधारणांचा मुद्दा सर्वात महत्वाचा आणि लक्षवेधी ठरला. यावेळी मा झाओक्सू यांनी चीनच्या वतीने स्पष्ट केले की, UNSC स्थायी सदस्यत्वासाठी भारताच्या महत्वकाक्षेंला चीन समजून घेतो आणि त्याचा आदरही करतो. या शब्दांमधून चीनचा थेट पाठिंबा नसला तरी भारतासाठी हे विधान जागतिक राजकाराणातील भूमिकेसाठी सकारात्मक आणि महत्वपूर्ण मानले जात आहे.

सीमावाद आणि प्रादेशिक शांतता सोडवण्यावर भर

दरम्यान दिल्लीतील या बैठकी भारत आणि चीनने द्विपक्षीय संबंध (India China Realations) अधिक मजबूत करण्यावर भर दिला. यामध्ये दोन्ही देशांनी भारत-चीन सीमांवर शांतता प्रस्थापित करणे, स्थिर द्विपक्षीय संबंध राखण्याच्या मुद्यांवर चर्चा केली. दोन्ही देशांमध्ये जागतिक स्थिरतेसाठी सीमा वाद सोडवण्यावर सहमती झाली. यासाठी संतुलित आणि स्थिर संबंध आवश्यक असल्याचे दोन्ही देशांनी मान्य केले.

 कैलास मानसरोवर यात्रा आणि विमान सेवा

या बैठकीत विक्रम मिस्री यांनी दोन्ही देशांतील मानसोरवर यात्रेच्या पुनररांभाचे स्वागत केले आणि भविष्यात यात्रेचा आवाका अधिक वाढविण्यासाठीही भर दिला. तसेच भारत आणि चीनमधील विमान सेवा सुरळित करण्यासाठी पुन्हा एकदा व्हिसा प्रक्रिया सुलक्ष करण्यावर ठोस निर्णय घेण्यावर भर दिला. याशिवाय पर्यटन, व्यापार आणि शैक्षणिक देवाण-घेवाणीच्या मुद्यांवरही सकारात्मक पावले उचलण्यावर चर्चा झाली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग (Xi Jinping) यांच्यात झालेल्या जुन्या करारांच्या अंमलबजावणीवरही या बैठकीत चर्चा करण्यात आली.

भारत आणि चीन सुधारते संबंध

भारत आणि चीनमधील संबंध गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर निवळताना दिसत असून हा एक सकारात्मक बदल आहे. दोन्ही देशांमधील सततच्या द्विपक्षीय बैठकांमुळे अनेक सेवा पुन्हा सुरु झाल्या आहेत. द्विपक्षीय बैठकांमध्ये संबंधांचा व्यापक आढावा घेण्यात आला आहे. लोक-ते-लोक संवाद वाढवण्यासाठी महत्वाची पाउले उचलली गेली आहे. तसेच संवेदनशील मुद्यांवर परस्पर संवादातून चिंता दूर केली जात आहे.

भारत जगातील चौथी अर्थव्यवस्था ठरताच चीनला झोंबली मिरची; 16 वर्षे अजूनही मागे असल्याचा दावा, जपानवरही हल्ला

💡

Frequently Asked Questions

  • Que: चीनने भारताच्या UNSC सदस्यत्वाबाबत काय म्हटले?

    Ans: चीनने दिल्ली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत स्पष्ट केले की, UNSC स्थायी सदस्यत्वासाठी भारताच्या महत्त्वाकांक्षेला चीन समजून घेतो आणि तिचा आदर करतो.

  • Que: दिल्लीतील उच्चस्तरीय बैठकीत कोणत्या मुद्यांवर चर्चा करण्यात आली?

    Ans: सीमावादावर शांतता प्रस्थापित करणे, द्विपक्षीय संबंध स्थिर ठेवणे, संयुक्त राष्ट्रातील सुधारणा, कैलास मानसरोवर यात्रेचा पुनरारंभ, व्हिसा प्रक्रिया सुलभ करणे, तसेच व्यापार-पर्यटन-शैक्षणिक देवाणघेवाण, लोक-ते-लोक संवाद यांसारख्या मुद्यांवर दिल्लीती भारत-चीन उच्चस्तरीय बैठकीत चर्चा झाली.

Web Title: Indias un seat almost secured china signals support after high level talks in delhi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2026 | 09:36 AM

Topics:  

  • China
  • India China Relation
  • narendra modi
  • World news
  • Xi Jinping

संबंधित बातम्या

Hormuz Crisis:तेलाच्या मार्गावर पुन्हा हल्ला; Hormuzजवळ जहाजाला आग, 11 भारतीय जखमी
1

Hormuz Crisis:तेलाच्या मार्गावर पुन्हा हल्ला; Hormuzजवळ जहाजाला आग, 11 भारतीय जखमी

World News:तेलाचा भाव १०० डॉलरपार,जगाला महागाईचा झटका; पेट्रोल-डिझेलपासून वाहतुकीपर्यंत वाढणार दबाव
2

World News:तेलाचा भाव १०० डॉलरपार,जगाला महागाईचा झटका; पेट्रोल-डिझेलपासून वाहतुकीपर्यंत वाढणार दबाव

Taiwan-China : तैवानजवळ चीनची लष्करी हालचाल; १४ लढाऊ विमानांसह ८ जहाजांची घुसखोरी, तणाव वाढला
3

Taiwan-China : तैवानजवळ चीनची लष्करी हालचाल; १४ लढाऊ विमानांसह ८ जहाजांची घुसखोरी, तणाव वाढला

West Bank News : ऑलिव्हच्या शेतात रक्तपात; वसाहतवाद्यांच्या हल्ल्यात पॅलेस्टिनी नागरिक ठार
4

West Bank News : ऑलिव्हच्या शेतात रक्तपात; वसाहतवाद्यांच्या हल्ल्यात पॅलेस्टिनी नागरिक ठार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.