chinese professors unique conditions for dream girl ridiculed on social media
बीजिंग : चीनमधील एका ३५ वर्षीय प्राध्यापकाने आपल्या भविष्यातील प्रेयसीसाठी ठेवलेल्या विचित्र अटींमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. झेजियांग विद्यापीठातील मार्क्सिझम स्कूलच्या सहयोगी प्राध्यापक लू यांनी एका मॅट्रिमोनिअल चॅट रूममध्ये त्यांच्या ‘ड्रीम गर्ल’साठी तपशीलवार मागण्या जाहीर केल्या. या अटी पाहून लोकांना आश्चर्याचा धक्का बसला, कारण या अटी लग्नासाठी नाही तर एखाद्या शाही हॅरेमसाठी राणी शोधण्यासारख्या वाटत आहेत, असे अनेकांनी टोलेबाजी केली आहे.
प्राध्यापक लू यांनी आपल्या वैयक्तिक तपशीलांसह भविष्यातील जोडीदारासाठीच्या अटीही नमूद केल्या. त्यांनी सांगितले की, त्यांचे वय ३५ वर्षे, उंची १७५ सेमी आणि वजन ७० किलो आहे. ते चीनमधील सर्वोच्च विद्यापीठातून पीएचडीधारक आहेत आणि त्यांचे वार्षिक उत्पन्न १ दशलक्ष युआन (सुमारे १.१६ कोटी रुपये) पेक्षा अधिक आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 55 Cancri e: पृथ्वीपेक्षा 5 पट मोठा… हिऱ्यांनी भरलेला ग्रह सापडला! नासाच्या ‘या’ नव्या शोधामुळे जगात खळबळ
आपल्या जोडीदाराबद्दल त्यांनी पुढील अटी ठेवल्या आहेत:
या अजब अटी पाहून सोशल मीडियावर प्रचंड प्रतिक्रिया उमटल्या. काहींनी हे लग्नाचे प्रस्तावपत्र नसून उच्चविद्याविभूषित तरुणींसाठीचा “लिलाव” आहे, अशी टीका केली. तर काहींनी म्हणलं की, “हे प्रेम नाही, ही मुलाखत आहे!”
एका युजरने लिहिले, “अभ्यास करूनही काही लोक मूर्खच राहतात.” तर दुसऱ्या एका युजरने खिल्ली उडवत लिहिले, “याला बायको नकोय, राजवाड्यातील एक परिपूर्ण राणी हवी आहे.”
या प्रकरणाने एवढा पेट घेतला की झेजियांग विद्यापीठालाही स्पष्टीकरण द्यावे लागले. विद्यापीठाच्या प्रशासनाने सांगितले की, पोस्टमध्ये काही चुकीची माहिती होती आणि संबंधित प्राध्यापकाने या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : प्राचीन इजिप्शियन संस्कृती करणार हजारो रहस्यांचा उलगडा; गिझा पिरामिडच्या खाली 6500 फूट खाली सापडला ‘खजिना’
सोशल मीडियावरील चर्चेनंतर प्राध्यापक लू यांना त्यांची “ड्रीम गर्ल” सापडली की नाही, हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. मात्र, त्यांच्या या अटींनी सोशल मीडियावर पुरेसे मनोरंजन केले आहे, हे मात्र निश्चित!