Colombia government declares health emergency due to increase in yellow fever cases
वॉशिंग्टन: कोरोनानंतर आता अमेरिकेच्या कोलंबियामध्ये येलो फीव्हरसारखा संसर्गजन्य आजाराचा धोका निर्माण झाला आहे. ग्रामीण भांगामध्ये येलो फीव्हरच्या रोगाचे प्रमाणा वाढत चालले आहे. यामुळे कोलंबिया सरकारने देशभरता आरोग्य आणीबीणी लागू केली आहे. कोलंबियाच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंंबर 2024 पासून एप्रिल 2025 पर्यंत येलो फीव्हरचे 75 रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये 34 जणांना मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोलंबियात 32 विभागांपैकी 9 विभागांमझध्ये येलो फीव्हरचे रुग्ण आढळून आले आहेत. टोलिमा, मेटा, अमेझॉन बेसिन आणि मागदालेना नदी परिसराच्या भागात येलो फीव्हरचा प्रभाव प्रचंड वाढला आहे. कोलंबियाच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वी येलो फीव्हर आजाराचे कोणतेही रुग्ण नोंदवले गेले नव्हते. मात्र, सध्या या रोगाने कॉफी उत्पादक क्षेत्रातही प्रवेश केला आहे. यामुळे रोगाचा प्रादुर्भाव प्रचंड वेगाने पसरत आहे.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, येलो फीव्हर हा एक व्हायरल आजार आहे. हा आजार संक्रमित डासांमधून पसरतो. या आजाराची लक्षणे सुरुवातील ताप, अंगदुखी, डोकेदुखी, भूक मंदावणे आणि उलची होणे आहेत. काही प्रकरणांमध्ये आजार दुसऱ्या स्टेजवर गेल्यास रुग्णाला जॉंडिस, पोटदुखी आणि अंतर्गत रक्तस्त्राव होतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, आजार दुसऱ्या स्टेजवर पोहोचल्यास 50% रुग्णांचा 7 ते 10 दिवसांत मृत्यू होतो.
कोलंबियाचे अध्यक्ष गुस्तावो पेट्रो यांनी या संकटावर मात करण्यासाठी दोन महिन्यांत संपूर्ण देशातील नागिरकांना येलो फीव्हर प्रतिबंध लसीची योजना जाहीर केली आहे. ही लस 9 महिन्याच्या पूढील सर्व व्यक्तींना एकदाच दिली जाते. कोलंबिया सरकारने ही लस मोफत उपलब्ध करुन दिली आहे. आतापर्यंत 20 हून अधिक आरोग्य पथक ग्रामीण भागांमध्ये तैनात करण्यात आले आहे. या पथकाचे लोकांच्या घरोघरी जाऊन तपासणी व लसीकरणाचे काम आहे.
याच दरम्यान विरोधकांनी कोलंबिया सरकारवर वेळेवर पावले न उचलण्याचा आरोप केला आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचे सिनेटर पालोमा व्हॅलेन्सिया यांनी, सहा महिन्यांपूर्वी येलो फीव्हरच्या संकटाची उत्पत्ती झाल्याचे म्हटले. त्यांनी म्हटले की, त्यावेळी सरकारने योग्य ती कारवाई केली नाही, जे अस्वीकार्य आहे. तसचे सोमवारी, अध्यक्ष पेट्रो मंत्रिमंडळ बैठकीत परिस्थितीचा आढावा घेतील. तसेच आजाराशी लढण्यासाठी उपाययोजना जाहीर करतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.