Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

India Canada संबंधाचे नवे पर्व! पंतप्रधान कार्नी उद्यापासून भारत दौऱ्यावर; भारतासोबत ७० अब्ज डॉलर्स व्यापाराचे लक्ष्य

India Canada Relations : कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी भारत दौऱ्यावर येत आहे. यामुळे दोन्ही देशांतील बिघडलेले संबंध पुन्हा एकदा रुळावर येणार आहे. दोन्ही देशांत व्यापार आणि द्विपक्षीय संबंध बळकट करण्याचा हेतू आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 26, 2026 | 07:20 PM
canada pm mark carney to visit india on 27 february

canada pm mark carney to visit india on 27 february

Follow Us
Follow Us:
  • India Canada संबंधाचे नवे पर्व
  • पंतप्रधान कार्नी उद्यापासून भारत दौऱ्यावर
  • भारतासोबत ७० अब्ज डॉलर्स व्यापाराचे लक्ष्य
Canda PM Mark Carney on India Visit : नवी दिल्ली/ओटावा : भारत आणि कॅनडा संबंधामध्ये एक नवा अध्याय सुरु होताना दिसत आहे. कॅनडाचे नवे पंतप्रधान मार्क कार्नी उद्या, शुक्रवारी (२७ फेब्रुवारी २०२६) रोजी भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत. हा त्यांचा पहिला अधिकृत भारत दौरा असून ही भेट दोन्ही देशांसाठी राजनैतिक दृष्टीकोनातून अत्यंत महत्वाची मानली जात आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांची जोहान्सबर्ग येथे जी-२० दरम्यान भेट झाली होती. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय व्यापारावर स्वतंत्र चर्चा झाली. यावेळी पंतप्रधान मोदींनी त्यांना भारत दौऱ्याचे आमंत्रण दिले होते.

कॅनडा सरकार ॲक्शन मोडमध्ये! PM कार्नी यांच्या भारत भेटीपूर्वी मोठी कारवाई; ‘या’ दहशतवाद्याचे नागरिकत्व रद्द

मुंबईतून होणार दौऱ्याची सुरुवात

कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या दौऱ्याची सुरुवात भारताची आर्थिक राजधानी मुंबई येथून होणार आहे. यावेळी त्यांच्यासोबत कॅनेडियन सीईओ, उद्योजक, आर्थिक तज्ञ आणि गुंतवणूकदारही येणार आहेत. यावेळी मुंबईतील कॅनेडियन पेन्शन फंड आणि भारतीय पायाभूत सुविधा क्षेत्रात गुंतवणूकीच्या संधीवर चर्चा होईल. तेसच नवोपक्रमात आणि शिक्षणाच्या क्षेत्रातील करारांवरही चर्चा होण्याची अपेक्षा आहे.

पंतप्रधान मोदींसोबत द्विपक्षीय चर्चा

तसेच मुंबईतील दोन दिवसीय दौऱ्यानंतर मार्क कार्नी १ मार्च रोजी नवी दिल्लीत पोहोचतील. यावेळी २ मार्च रोजी हैदराबाद हाऊस येथे पंतप्रधान मोदी यांची ते भेट घेतील. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय व्यापार करारांवर चर्चा होईल. दोन्ही देशांनी २०३० पर्यंत ७० अब्ज डॉलर्सपर्यंत द्विपक्षीय व्यापाराचे लक्ष्य ठेवले आहे.  याशिवाय व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा, महत्त्वाची खनिजे, शेती आणि संरक्षण यांसारख्या क्षेत्रातही सहकार्याचा आढावा घेतला जाणार आहे.

भारत-कॅनडा संबंध का बिघडले होते?

खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जर यांची १८ जून २०२३ रोजी हत्या करण्यात आली होती. कॅनडातील एका गुरुद्वाराबाहेर त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. दरम्यान निज्जरच्या हत्येप्रकरणी कॅनडाचे माजी पंतप्रधान जस्टिन ट्रुडो (Justin Trudeau) यांनी भारताच्या सहभागाचा आरोप केला होता. ज्यामुळे दोन्ही देशातील संबंध ताणले गेले. परंतु कॅनडाचे नवे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या दोन्ही देशांतील संबंध सुधारण्याच्या सकारात्मक दृष्टीकोनाने संबंधामध्ये पुन्हा सुधारणा होताना दिसत आहे. कार्नी यांचा हा दौरा दोन्ही देशांतील संबंधासाठी अत्यंत महत्वाचा मानला जात आहे.

भारत-कॅनडा संबंधामध्ये नव्या पर्वाची सुरुवात? पंतप्रधान मार्क कार्नी लवकरच भारत दौऱ्यावर येणार

Web Title: India canada relations pm mark carney to visit india on 27 february

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2026 | 07:20 PM

Topics:  

  • Canada
  • India-Canada Relation
  • World news

संबंधित बातम्या

UNGA: ‘दहशतवादी देश मला प्रश्न विचारणार?’, पाकिस्तानी पत्रकाराला S. Jaishankar यांनी दाखवला आरसा
1

UNGA: ‘दहशतवादी देश मला प्रश्न विचारणार?’, पाकिस्तानी पत्रकाराला S. Jaishankar यांनी दाखवला आरसा

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या
2

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला
3

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला

World News : ट्रम्प-शी भेटीला तिबेटचा ‘ट्विस्ट’; कॅपिटॉलसमोर आंदोलकांचा जोरदार आवाज!
4

World News : ट्रम्प-शी भेटीला तिबेटचा ‘ट्विस्ट’; कॅपिटॉलसमोर आंदोलकांचा जोरदार आवाज!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.