Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चीनमध्ये 7.9 तीव्रतेचा विनाशकारी भूकंप; नागरिकांमध्ये भीती, मोठ्या नुकसानाची शक्यता

चीनच्या दक्षिण-पश्चिम युनान प्रांतात मंगळवारी रात्री भूकंपाचे प्रचंड धक्के जाणवले. चीनच्या भूकंप नेटवर्क केंद्रानुसार (CENC), या भूकंपाची तीव्रता 7.9 रिश्टर स्केल इतकी होती.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Mar 28, 2025 | 03:21 PM
Devastating 7.9 magnitude earthquake hits China Fear among citizens possibility of major damage

Devastating 7.9 magnitude earthquake hits China Fear among citizens possibility of major damage

Follow Us
Close
Follow Us:

बीजिंग : चीनच्या दक्षिण-पश्चिम युनान प्रांतात मंगळवारी रात्री भूकंपाचे प्रचंड धक्के जाणवले. चीनच्या भूकंप नेटवर्क केंद्रानुसार (CENC), या भूकंपाची तीव्रता ७.९ रिश्टर स्केल इतकी होती. या भूकंपामुळे चीनसह शेजारील देशांमध्येही भीतीचे वातावरण पसरले आहे. विशेषतः म्यानमार, थायलंड आणि बँकॉक येथेही याचे तीव्र परिणाम जाणवले.

भूकंपानंतर नागरिक घराबाहेर पळाले. युनानमध्ये भूकंपाच्या धक्क्यांमुळे लोक मोठ्या प्रमाणावर घराबाहेर पडले आणि सुरक्षित ठिकाणांच्या शोधात धावपळ सुरू झाली. सीसीटीव्ही ब्रॉडकास्टरच्या माहितीनुसार, या भूकंपाचा प्रभाव गुइझोउ आणि गुआंग्शीच्या काही भागांतही जाणवला असून, त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : म्यानमार आणि बँकॉकमध्ये भूकंपामुळे अत्यंत भयावह स्थिती; पाहा ‘हे’ अंगावर शहारे आणणारे VIDEO

म्यानमारमध्येही जोरदार भूकंपाचे धक्के

चीनमध्ये भूकंप जाणवण्याच्या काही तास आधी म्यानमारमध्येही ७.७ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. या भूकंपाचा परिणाम इतका मोठा होता की, दक्षिण थायलंडपर्यंत याचे धक्के जाणवले. राजधानी बँकॉकमध्ये अनेक इमारती हादरल्या, त्यामुळे लोक रस्त्यावर येऊन प्रचंड गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. यूएस जिओलॉजिकल सर्व्हेनुसार (USGS), हा भूकंप म्यानमारच्या सागाइंग शहराच्या वायव्येस सुमारे १६ किलोमीटर अंतरावर झाला. या भूकंपाचा प्रभाव चीनच्या युनान प्रांतालाही जाणवला, तसेच एझोऊ आणि गुआंगशीच्या काही भागांतही धक्के बसले.

बँकॉकमध्ये ३० मजली इमारत कोसळली

सिन्हुआ न्यूज एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाच्या धक्क्यांमुळे बँकॉकमध्ये एक ३० मजली निर्माणाधीन इमारत कोसळली. या दुर्घटनेत अनेक लोक अडकले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. आपत्कालीन पथके घटनास्थळी पोहोचली असून मदतकार्य वेगाने सुरू आहे.

म्यानमारमधील चिनी दूतावासाची प्रतिक्रिया

म्यानमारमधील चिनी दूतावासाने निवेदन जारी करून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात असल्याचे सांगितले. सुदैवाने, सध्या कोणत्याही मोठ्या जीवितहानीची माहिती मिळालेली नाही. मात्र, आधीच संकटात सापडलेल्या म्यानमारसाठी ही आणखी एक कठीण परिस्थिती असल्याचे दूतावासाने म्हटले आहे. यांगूनमध्ये कार्यरत वू युटोंग नावाच्या चिनी व्यावसायिकाने सांगितले की, भूकंप झाला तेव्हा ते त्यांच्या कार्यालयात होते. त्यावेळी संपूर्ण डेस्क थरथर कापत होते, आणि जोरदार हादरे जाणवत होते. घाबरून कार्यालयातील १५ हून अधिक कर्मचारी तात्काळ बाहेर धावत गेले.

A 7.9-magnitude earthquake struck Myanmar at 2:20 p.m. Friday (Beijing Time), according to the China Earthquake Networks Center (CENC). Tremors were felt in many areas in southwest China’s Yunnan Province, which borders Myanmar. pic.twitter.com/Xvue3xkuwH

— China Xinhua News (@XHNews) March 28, 2025

credit : social media

परिस्थिती गंभीर, आपत्कालीन मदतकार्य सुरू

युनान प्रांतातील अनेक ठिकाणी भूकंपामुळे मोठ्या इमारतींना तडे गेले आहेत, तसेच काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला आहे. अग्निशमन आणि बचाव पथके घटनास्थळी तैनात करण्यात आली असून, लढाऊ पथकांनाही सतर्क ठेवण्यात आले आहे. भूकंपाच्या धक्क्यांमुळे परिसरात नद्यांच्या प्रवाहात बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे पूरस्थिती उद्भवू नये म्हणून प्रशासन सज्ज आहे. चीनमधील भूकंपविषयक संस्थांनी नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : राजेशाहीसाठी सुरू होणार गृहयुद्ध? नेपाळ सरकारला एका आठवड्याचा अल्टिमेटम

आणखी धक्के बसण्याची शक्यता?

भूकंपाच्या या मालिकेमुळे पूर्ण दक्षिण-आशियाई प्रदेश धोक्यात आला आहे. भूकंपशास्त्रज्ञांच्या मते, पुढील काही दिवसांत अधिक आफ्टरशॉक्स (पश्चात धक्के) जाणवण्याची शक्यता आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, परंतु सतर्क राहावे, असे प्रशासनाने सांगितले आहे. या भूकंपामुळे चीन आणि म्यानमारच्या सीमावर्ती भागांत मोठे नुकसान झाल्याची शक्यता असून, सरकारी यंत्रणा मदतकार्यात गुंतली आहे. पुढील काही तासांत परिस्थिती अधिक स्पष्ट होईल.

Web Title: Devastating 79 magnitude earthquake hits china fear among citizens possibility of major damage nrhp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 28, 2025 | 03:21 PM

Topics:  

  • China
  • Earthquake
  • international news

संबंधित बातम्या

राजकीय दबावापुढे न झुकता भारताने साधले हित, रशियाकडून कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर ५% सूट; तर अमेरिकेची नाराजी
1

राजकीय दबावापुढे न झुकता भारताने साधले हित, रशियाकडून कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर ५% सूट; तर अमेरिकेची नाराजी

400% नफा आणि 200% महसूल…Labubu Doll च्या कंपनीला लॉटरी, 6 महिन्यात पैशांचा पाऊस
2

400% नफा आणि 200% महसूल…Labubu Doll च्या कंपनीला लॉटरी, 6 महिन्यात पैशांचा पाऊस

चीनचे परराष्ट्र मंत्री आज पंतप्रधान मोदींना भेटणार; दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यावर देणार भर
3

चीनचे परराष्ट्र मंत्री आज पंतप्रधान मोदींना भेटणार; दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यावर देणार भर

डॉलर कोपऱ्यात रडणार? डोनाल्ड ट्रम्पच्या टॅरिफविरुद्ध ‘BRICS’ बनले भक्कम भिंत; ‘India-China-Russia’ ची नवी जुगलबंदी
4

डॉलर कोपऱ्यात रडणार? डोनाल्ड ट्रम्पच्या टॅरिफविरुद्ध ‘BRICS’ बनले भक्कम भिंत; ‘India-China-Russia’ ची नवी जुगलबंदी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.