
अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाला (Ram mandir Inaguration)अवघे सात दिवस उरले आहेत. अयोध्येत रामलल्लाच्या आगमनासाठी जोरदार तयारी करण्यात येत आहे. जितरा उत्साह भारतात आहे तितकाचं उत्साह शेजारी राष्ट्र नेपाळमध्येही पाहायला मिळत आहे. 22 जानेवारीला नेपाळमधील जनकपूरमध्ये उत्सव होणार आहे. येथील जानकी मंदिरात (Janaki Mandir Nepal) 1.25 लाख दिवे प्रज्वलित करण्यात येणार आहेत. याशिवाय तिथून तीन हजारांहून अधिक भेटवस्तू अयोध्येला पाठवण्यात आल्या आहेत.
[read_also content=”पत्नी पाचव्यांदा बोहल्यावर चढली, निराश झालेल्या पतीनं स्वत:ला पेटवून घेत केली आत्महत्या! https://www.navarashtra.com/crime/husband-commits-suicide-over-his-wife-fifth-wedding-nrps-498179.html”]
नेपाळमधील जनकपूर हे माता सीतेचे जन्मस्थान मानलं जातं.सीतेचे दुसरे नाव जानकी आहे, जी जनकपूरच्या राजा जनकाची मुलगी होती. हे ठिकाण काठमांडूच्या दक्षिण-पूर्वेस 220 किलोमीटर आणि अयोध्येच्या पूर्वेस सुमारे 500 किलोमीटर अंतरावर आहे.
22 जानेवारीला अयोध्येत रामललाच्या प्राणप्रतिष्ठा होणार असून, त्यादृष्टीने अयोध्या नगरी सजवली जात आहे. अयोध्येत राम मंदिराच्या उद्घाटनाची जय्यत तयारी सुरू आहे. या पार्श्वभुमीवर नेपाळच्या जनकपूरमध्येही राम मंदिराबाबत लोकांना खुप उत्साह आहे. या दिवशी जनकपूरच्या जानकी मंदिरात १.२५ लाख दिवे प्रज्वलित करण्यात येणार आहेत. माता सीतेच्या मातृगृहातूनही तीन हजारांहून अधिक भेटवस्तू अयोध्येला पाठवण्यात आल्या आहेत.
नेपाळचे माजी पंतप्रधान बिमलेंद्र निधी यांनी शनिवारी सांगितले की, “आमची मुलगी, माता जानकी हिचा विवाह भगवान श्री राम यांच्याशी झाला होता. अयोध्येत राम लल्लाला पावन होईल याचा आम्हाला खूप आनंद आणि अभिमान आहे.” ते म्हणाले की, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या प्रकरणी निकाल दिला तेव्हा जनकपूरच्या लोकांना खूप आनंद झाला होता.
राम आशिष यादव म्हणाले की, राम मंदिराच्या अभिषेकनंतर जनकपूरमध्ये धार्मिक पर्यटन वाढेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या भेटीनंतर जनकपूर धामला नवसंजीवनी मिळाली. आता येथे मोठ्या प्रमाणात भारतीय पर्यटक येऊ लागले आहेत. राम मंदिराच्या उद्घाटनानंतर येथे आणखी धार्मिक पर्यटक येतील, याची आम्हाला खात्री आहे.