अमेरिकेत दिवाळीचा उत्सव: न्यूयॉर्कच्या आयकॉनिक टाइम्स स्क्वेअरवर मोठ्या उत्साहात साजरी
न्यूयॉर्क: दिवाळी सण फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात मोठ्या धूमधडाक्यात साजरा करण्यात येतो. अमेरिकेतही भारतीय समुदाय हा सण अत्यंत उत्साहात साजरा करतात. या वर्षी न्यूयॉर्कच्या आयकॉनिक टाइम्स स्क्वेअरवर दिवाळी साजरी करण्यास प्रारंभ झाला आहे. यामध्ये भारतीय-अमेरिकन समुदाय आणि अमेरिकन मित्र मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. या सणाच्या निमित्ताने अमेरिकेत टाइम्स स्क्वेअर परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
भारतीय वाणिज्य दूतावासाने एक्सवर याबाबत एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये, न्यूयॉर्कमध्ये दिवाळी साजरी करताना अनेक भारतीय-अमेरिकन नागरिक एकत्र आल्याचे दिसत आहे. हा कार्यक्रम केवळ धार्मिकतेपुरता मर्यादित नसून सांस्कृतिक उत्सवाच्या रूपातही साजरा केला जात आहे. विशेषतः भारतीय गाण्यांवर नृत्य सादर करून आणि पारंपारिक खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत हा सण अमेरिकतही दिवाळी उत्साहात साजरी केली जात आहे.
हे देखील वाचा- इस्रायल इराणवर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत? अमेरिकेन गुप्तचर संस्थेचे कागदपत्रे लीक
अमेरिकेत वातावरण मंगलमय झाले आहे
टाइम्स स्क्वेअरवरील या दिवाळी उत्सवात बॉलीवूड गाण्यांवर नृत्य सादरीकरण, रंगीबेरंगी दिवे, आकर्षक रोषणाई यामुळे वातावरण मंगलमय झाले आहे. यासह, भारताचे काही प्रमुख राजकीय नेतेही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. अमेरिकेच्या आगामी राष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय-अमेरिकन समुदायाशी संपर्क साधण्यासाठी हा उत्सव राजकारण्यांसाठी महत्त्वाचा ठरत आहे. हॅरिस आणि ट्रम्प या राष्ट्रपतीपदाच्या प्रमुख स्पर्धकांनीही भारतीय समुदायासाठी त्यांच्या निवासस्थानी कार्यक्रम आयोजित करण्याची शक्यता आहे.
CG @binaysrikant76 joined friends from Indian-American Community & American friends to celebrate Diwali; Spl thanks to Senate Majority Leader Senator @SenSchumer , Mayor Eric Adams @NYCMayor , Assemblywoman @JeniferRajkumar for joining & to main organiser of the event Ms. Neeta… pic.twitter.com/Ul7gsLoiYb
— India in New York (@IndiainNewYork) October 20, 2024
राष्ट्राध्यक्ष बिडेन यांची देखील त्याच धर्तीवर दिवाळी साजरी करण्याची अपेक्षा आहे. गेल्या काही वर्षांमध्ये अमेरिकेत भारतीय सणांचा साजरा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कॅलिफोर्नियातील डिस्नेलँडपासून न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरपर्यंत विविध ठिकाणी दिवाळीचा उत्सव साजरा केला जात आहे. विशेषतः व्हाईट हाऊससारख्या प्रमुख स्थळी सुद्धा दिवाळी साजरी होते, ज्यामुळे अमेरिकन समाजात या सणाचे महत्त्व अधिक ठळक झाले आहे.